Breaking News
  • राजपाल यादव यांना तुरुंगवास; चेक बाऊन्स प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
  • 'मिमिक्री आर्टिस्ट' म्हणत फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला; 'भाडे के टट्टू'वरून सुरू झालेल्या वादाला विधानसभेत उत्तर
  • देशात पुन्हा कोरोनाची धास्ती! आंध्र प्रदेशात 46 वर्षीय कोरोनाबाधिताचा मृत्यू; उपचारांनंतरही प्रकृतीत सुधारणा नाही
  • तेलंगणात भात रोवणीसाठी गेलेल्या चंद्रपूरच्या मजुरांची पिकअप उलटली; 4 जणांचा जागीच मृत्यू , 27 जखमी
  • शूज कारखान्यात भीषण आग दुर्घटना; आगीत जळून 28 जणांचा मृत्यू
  • Stock Market Update : TCS च्या दमदार निकालांचा बाजाराला बूस्ट; सेन्सेक्स-निफ्टीत 1% पेक्षा अधिक उसळी
  • “…अन् चाललेत मिसिंग लिंकचा मुका घ्यायला”; जयंत पाटील यांच्या टीकेला गोपीचंद पडळकरांचे प्रत्युत्तर
  • काँगोत इबोलाचा कहर! १,७९२ बाधित, ६२५ जणांचा मृत्यू; संयुक्त राष्ट्रांकडून तातडीच्या जागतिक हस्तक्षेपाचे आवाहन
  • WhatsApp चे नवे Birthday Reminder फीचर लवकरच; मित्र-नातेवाईकांचे वाढदिवस विसरण्याची चिंता संपणार

होम > आपले शहर > पुणे

Death Sentence

नसरापूर अत्याचार-हत्या प्रकरणात आरोपी भीमराव कांबळेला फाशी; राज्यातील सर्वात जलदगतीने निकाली निघालेल्या खटल्यांपैकी एक

पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथे साडेतीन वर्षांच्या चिमुकलीवरील अत्याचार आणि निर्घृण हत्येप्रकरणी न्यायालयाने कठोर निर्णय दिला आहे.


नसरापूर अत्याचार-हत्या प्रकरणात आरोपी भीमराव कांबळेला फाशी राज्यातील सर्वात जलदगतीने निकाली निघालेल्या खटल्यांपैकी एक

Death Sentence |

१५ दिवसांत १२०० पानी आरोपपत्र, ५५ हून अधिक साक्षीदार आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे न्यायालयाने सुनावली मरेपर्यंत फाशीची शिक्षा

पुणे (Death Sentence) : पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथे साडेतीन वर्षांच्या चिमुकलीवरील अत्याचार आणि निर्घृण हत्येप्रकरणी न्यायालयाने कठोर निर्णय दिला आहे. या प्रकरणातील आरोपी भीमराव कांबळे (वय ६५) याला बलात्कार आणि हत्येच्या गुन्ह्यात दोषी ठरवत विशेष न्यायाधीश एस. आर. साळुंखे यांच्या न्यायालयाने मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली. यापूर्वी २५ जून रोजी न्यायालयाने आरोपीला दोषी घोषित केले होते.

ही घटना १ मे, महाराष्ट्र दिनी घडली होती. दुपारी सुमारे ४ वाजण्याच्या सुमारास चिमुकली बेपत्ता झाल्यानंतर कुटुंबीयांनी तातडीने पुणे ग्रामीण पोलिसांच्या राजगड पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ शोधमोहीम सुरू केली. शोधादरम्यान मुलीचा मृतदेह आढळून आला आणि अवघ्या दीड तासात संशयित आरोपीला ताब्यात घेण्यात आले.

या प्रकरणाच्या तपासासाठी पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक संदीपसिंग गिल यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष तपास पथकाची स्थापना करण्यात आली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजयमाला पवार यांनी तपासाची सूत्रे हाती घेत विविध तांत्रिक आणि वैज्ञानिक पुराव्यांच्या आधारे तपास पूर्ण केला.

तपासादरम्यान सीसीटीव्ही फुटेज, वैद्यकीय तपासणी अहवाल, न्यायवैद्यक पुरावे, प्रत्यक्षदर्शींची साक्ष तसेच अन्य परिस्थितीजन्य आणि तांत्रिक पुरावे गोळा करण्यात आले. गुन्हा घडल्यानंतर अवघ्या १५ दिवसांत पोलिसांनी १२०० पानी आरोपपत्र न्यायालयात सादर केले. त्यामध्ये ५५ हून अधिक साक्षीदारांचे जबाब आणि महत्त्वाचे पुरावे जोडण्यात आले होते.

विशेष न्यायाधीश एस. आर. साळुंखे यांच्या न्यायालयात २१ मेपासून या खटल्याची दैनंदिन सुनावणी सुरू झाली. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर २५ जून रोजी आरोपीला दोषी ठरवण्यात आले आणि शिक्षेबाबतचा निर्णय राखून ठेवण्यात आला होता. अखेर २९ जून रोजी न्यायालयाने आरोपीला मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावत या खटल्याचा निकाल दिला.

सरकारी पक्षाचे वकील अजय मिसार यांनी न्यायालयाकडे आरोपीस फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली होती. तर पीडित मुलीच्या वडिलांनीही समाजात कठोर संदेश जावा म्हणून आरोपीला सर्वाधिक कठोर शिक्षा देण्याची विनंती न्यायालयासमोर केली होती.

या प्रकरणातील तपासाची गती, अल्पावधीत दाखल झालेले आरोपपत्र आणि जलदगतीने पूर्ण झालेली सुनावणी यामुळे हा खून आणि अत्याचाराचा खटला राज्यातील सर्वात वेगाने निकाली लागलेल्या प्रकरणांपैकी एक मानला जात आहे.

नसरापूर प्रकरणाची कालानुक्रमिक घडामोडी

  • १ मे: नसरापूर येथे चिमुकलीचा मृतदेह आढळला; प्राथमिक तपासात लैंगिक अत्याचार झाल्याचे स्पष्ट झाले.
  • २ मे: पुरावे संकलित करून गुन्हा दाखल; संशयिताला ताब्यात घेतले.
  • १६ मे: पुणे पोलिसांनी अवघ्या १५ दिवसांत आरोपपत्र न्यायालयात दाखल केले.
  • २८ मे: न्यायालयाने आरोप निश्चित करून खटला जलदगतीने चालवण्यास मंजुरी दिली.
  • २० जून: दोन्ही बाजूंच्या अंतिम युक्तिवादाला सुरुवात झाली.
  • २५ जून: न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवत शिक्षेचा निर्णय राखून ठेवला.
  • २९ जून: न्यायालयाने आरोपी भीमराव कांबळे याला मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली.

Related to this topic: