Breaking News
  • बदलापुरात तुकाराम मुंडे यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक
  • देशाची शिक्षणव्यवस्था बदलावी लागेल- राहुल गांधी
  • मंत्री धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसकडून सांगलीत जल्लोष
  • आषाढी निमित्त काढण्यात आलेल्या रथ उत्सवात प्रयास मित्र मंडळाने देखाव्यातून मांडले 'नीट' पेपर फुटीचे दाहक वास्तव
  • युवकांनी सरकारला नैतिक जबाबदारी स्वीकारायला भाग पाडलं - शरद पवार
  • TET पेपर फुटी प्रकरणातील मास्टर माईंड बिजेदरं कुमार गुप्ता सह इंद्रजित सिंग ला 30 जुलै पर्यंत पोलीस कोठडी
  • केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनाम्यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये विद्यार्थ्यांसह विविध संघटनेचा जल्लोष....
  • छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज भागातील प्रति पंढरपूर येथे विठ्ठल भक्तांची गर्दी
  • संभाजीनगरच्या प्रति पंढरपूर येथे मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते सुरू विठ्ठल रुक्माईची पूजा

होम > आपले शहर > विदर्भ > वाशिम

वरोली चक्रीवादळी नुकसान

वरोली- सेवादासनगर परिसरात चक्रीवादळ; अनेकांची घरावरील टिनपत्रे उडाली!

Varoli cyclone damage: वरोली-सेवादासनगर येथे चक्रीवादळाने घरांची टिनपत्रे उडवले, फळबाग आणि भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले. शेतकऱ्यांनी प्रशासनाला आर्थिक मदत मागितली.


वरोली- सेवादासनगर परिसरात चक्रीवादळ अनेकांची घरावरील टिनपत्रे उडाली 

Varoli cyclone damage |

मानोरा (Varoli cyclone damage) : तालुक्यातील वरोली - सेवादासनगर परिसरात दि. १३ मे रोजी दुपारच्या सुमारास सुसाट्याच्या वाऱ्यासह चक्रीवादळाने तांडव माजविल्याने अनेकांच्या घरावरील टिनपत्रे उडून अतोनात नुकसान झाले आहे. 
 
सविस्तर असे की, बुधवारी सकाळपासून वरोली - सेवादासनगर परिसरात आभाळ दाटून आले होते. दुपारी २.३५ वाजताच्या सुमारास अचानकच अवकाळी पावसासह वादळी वाऱ्याने सुरुवात केली. सुसाट्याचा चक्रीवादळाच्या वाऱ्याने अनेक नागरिकांच्या घरावरील टिनपत्रे उडून अतोनात नुकसान झाले आहे. तर या (Varoli cyclone damage) भागातील फळबाग व भाजीपाला पिकांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान होऊन अनेकांच्या घरांची पडझड झाली आहे. या चक्रीवादळाच्या तांडवात काही वेळातच होत्याचे नव्हते झाल्याने प्रशासनाने पाहणी व पंचनामे करून शासनाची आर्थिक मदत मिळवून देण्याची मागणी बाधीत नुकसानग्रस्त नागरिकांनी केली आहे.
  
सेवादासनगर येथील अत्यल्प भूधारक शेतकरी मनोहर बाबाराव राठोड यांच्या घरावरील टिनपत्रे उडून घरांचीही अतोनात नुकसान झाले आहे. प्रशासनाने पंचनामा करून नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे.