Breaking News
  • बदलापुरात तुकाराम मुंडे यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक
  • देशाची शिक्षणव्यवस्था बदलावी लागेल- राहुल गांधी
  • मंत्री धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसकडून सांगलीत जल्लोष
  • आषाढी निमित्त काढण्यात आलेल्या रथ उत्सवात प्रयास मित्र मंडळाने देखाव्यातून मांडले 'नीट' पेपर फुटीचे दाहक वास्तव
  • युवकांनी सरकारला नैतिक जबाबदारी स्वीकारायला भाग पाडलं - शरद पवार
  • TET पेपर फुटी प्रकरणातील मास्टर माईंड बिजेदरं कुमार गुप्ता सह इंद्रजित सिंग ला 30 जुलै पर्यंत पोलीस कोठडी
  • केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनाम्यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये विद्यार्थ्यांसह विविध संघटनेचा जल्लोष....
  • छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज भागातील प्रति पंढरपूर येथे विठ्ठल भक्तांची गर्दी
  • संभाजीनगरच्या प्रति पंढरपूर येथे मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते सुरू विठ्ठल रुक्माईची पूजा

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

भामट्याकडून मोबाईल हॅक करून डॉक्टरांची फसवणूक करण्याचा प्रयत्न; पोलीस व सायबर सेलच्या दक्षतेमुळे आर्थिक फसवणूक टळलीआखाडा

दिवसेंदिवस मोबाईल आणि ऑनलाइन वापर वाढत आहे, त्याचबरोबर फसवणुकीचे प्रकारही वाढत आहेत.


भामट्याकडून मोबाईल हॅक करून डॉक्टरांची फसवणूक करण्याचा प्रयत्न पोलीस व सायबर सेलच्या दक्षतेमुळे आर्थिक फसवणूक टळलीआखाडा

Cyber Fraud |

आखाडा बाळापूर (Cyber Fraud) : दिवसेंदिवस मोबाईल आणि ऑनलाइन वापर वाढत आहे, त्याचबरोबर फसवणुकीचे प्रकारही वाढत आहेत. येथील एका डॉक्टरचा मोबाईल भामट्यांनी हॅक करून आर्थिक फसवणूक करण्याचा आटोकाट प्रयत्न केला. परंतु पोलीस व सायबर सेलच्या वेळीच केलेल्या दक्षता उपाययोजनांमुळे ही फसवणूक टळली.

मिळालेल्या माहितीनुसार, आखाडा बाळापूर येथील शिंदे स्पाईन/जॉईंट पेन रिलीफ सेंटरचे डॉ. नितीन शिंदे यांना शनिवारी एक फोन आला. “आपले ऑनलाइन पार्सल आले आहे, तुमचा पत्ता माहीत नाही, आमच्या माणसाला टेक्स्ट मेसेज करा” असे सांगून एक नंबर दिला. तो नंबर क्लिक करताच डॉ. शिंदे यांचा मोबाईल हॅक झाला. व्हॉट्सअॅप ओपन होत नव्हते. उलट त्यांच्या नंबरवरून अनेकांना “अर्जंट काम आहे, 47 हजार पाठवा, दोन तासांत परत करतो” आणि काहींना “5 हजार पाठवा” असे मेसेज गेले.

यानंतर डॉ. नितीन शिंदे यांनी तात्काळ पोलीस ठाण्यात धाव घेऊन प्रकार सांगितला. पोलीस निरीक्षक विष्णुकांत गुठ्ठे, शिवाजी पवार, प्रशांत शिंदे यांनी तात्काळ सायबर सेल, पोलीस अधीक्षक कार्यालयाशी संपर्क साधला. पोलीस कर्मचारी मारोती काकडे यांनी तातडीने आवश्यक तांत्रिक उपाययोजना केल्या. त्यामुळे डॉ. शिंदे व त्यांच्या मित्रपरिवाराची आर्थिक फसवणूक टळली.

आजकाल भामट्यांकडून ऑनलाइन फसवणुकीचे प्रकार नेहमी घडत आहेत. हे प्रकार टाळण्यासाठी अनोळखी नंबरवरून आलेल्या लिंक ओपन करू नयेत. तसेच “बँकेतून बोलतो” किंवा “इतर कार्यालयातून बोलतो” असे सांगून बँक डिटेल्स व इतर माहिती मागणाऱ्यांना माहिती देऊ नये. मोबाईल हॅक झाला असेल किंवा व्हॉट्सअॅप व इतर अॅपवर वेगवेगळ्या प्रकारचे संशयास्पद मेसेज येत असतील, तर तात्काळ आपल्या पोलीस ठाण्यात किंवा पोलीस अधीक्षक कार्यालयातील सायबर सेलशी संपर्क साधून फसवणूक टाळावी.- शिवसांब घेवारे , सहाय्यक पोलीस निरीक्षक, सायबर सेल, हिंगोली

Related to this topic: