Breaking News
  • तुकाराम मुंढे नांदेडला आल्याची अफवा, भीतीपोटी पान टपऱ्या बंद करून , टपरी चालक पसार
  • तुळजापुरात वाढत्या गुन्हेगारीविरोधात नागरिकांचे साखळी उपोषण; अधिकाऱ्यांच्या बदलीची मागणी
  • वाशिम शहरात आनंदाचे वातावरण... प्रचंड उकाड्यापासून वाशिमकरांना काहीसा दिलासा
  • अमरावती शहरात सलग तीसऱ्या दिवशी दमदार पावसाची हजेरी
  • आकाशवाणी पुणे केंद्राचा वृत्त विभाग बंद होणार असल्याच्या चर्चेमुळे चिंता वाढली
  • पवनराजे निंबाळकर हत्याकांड प्रकरणी न्यायालय 20 तारखेला देणार निकाल
  • नंदूरबारमध्ये सरसकट कर्जमाफीच्या मागणीसाठी शेतकऱ्याने मारली विहिरीत उडी
  • आय टी पार्क हिंजवडीत मद्यधुंद तरुणांच्या आलीशान कारने दुचाकीला उडवले
  • सफाई कर्मचाऱ्यांना आवश्यक सुरक्षा उपकरणांशिवाय आणि निर्धारित नियमांचे उल्लंघन करून नालेसफाईच्या कामावर तैनात केले जात असल्याची तक्रार दाखल झाल्याची दखल घेत राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाने (NCSC) पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आयुक्तांना नोटीस बजावली आहे.

होम > आपले शहर > मुंबई

FDAचा क्रॉफर्ड मार्केटमध्ये छापा; ‘ब्रेस्ट एन्लार्ज’ ते ‘फॅट बर्नर’ उत्पादनांचा साठा जप्त

राज्याच्या अन्न व औषध प्रशासन विभागाची सूत्रे तुकाराम मुंढे यांच्या हाती आल्यानंतर भेसळखोर आणि बनावट उत्पादन विक्रेत्यांविरोधात राज्यभरात कारवाईचा वेग वाढल्याचे चित्र दिसत आहे.


fdaचा क्रॉफर्ड मार्केटमध्ये छापा ‘ब्रेस्ट एन्लार्ज’ ते ‘फॅट बर्नर’ उत्पादनांचा साठा जप्त

Cosmetic Products Seized |

मुंबई, कांदिवली, कराड आणि लातूरमध्ये छापे; लाखोंचा मुद्देमाल जप्त, बनावट उत्पादनांवर कठोर कारवाई

मुंबई (Cosmetic Products Seized) : राज्याच्या अन्न व औषध प्रशासन विभागाची सूत्रे तुकाराम मुंढे यांच्या हाती आल्यानंतर भेसळखोर आणि बनावट उत्पादन विक्रेत्यांविरोधात राज्यभरात कारवाईचा वेग वाढल्याचे चित्र दिसत आहे. जवळपास दररोज विविध जिल्ह्यांमध्ये एफडीएच्या पथकांकडून धाडी टाकल्या जात असून, अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात अवैध साठा जप्त करण्यात येत आहे.

मुंबईतील क्रॉफर्ड मार्केट परिसरात अलीकडेच अन्न व औषध प्रशासनाने एका सौंदर्यप्रसाधन विक्री करणाऱ्या दुकानावर छापा टाकला. या कारवाईत भ्रामक दावे करणाऱ्या अनेक उत्पादनांचा मोठा साठा जप्त करण्यात आला. यामध्ये ‘ब्रेस्ट एन्लार्ज’, ‘बट एन्हान्समेंट’ आणि ‘फॅट बर्नर’ यांसारख्या शरीराच्या आकारात बदल होण्याचा दावा करणाऱ्या उत्पादनांचा समावेश होता. या उत्पादनांवर आवश्यक बॅच नंबर, उत्पादन परवाना क्रमांक तसेच उत्पादक कंपनीची माहिती नमूद नसल्याचे तपासात उघड झाले. तसेच उपचार व सौंदर्याशी संबंधित दावा करणाऱ्या तेलाचाही साठा जप्त करण्यात आला असून या कारवाईची किंमत सुमारे 1.02 लाख रुपये असल्याचे समोर आले आहे.

याशिवाय, मुंबईतील कांदिवली परिसरातही एफडीएच्या पथकाने मोठी कारवाई करत अवैध उत्पादन केंद्रावर छापा टाकला. येथे वैध परवाना नसताना सौंदर्यप्रसाधने आणि औषधांची निर्मिती सुरू असल्याचे आढळून आले. या कारवाईत औषधे, सौंदर्यप्रसाधने, कच्चा माल आणि यंत्रसामग्रीसह सुमारे 3.97 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

दरम्यान, साताऱ्यातील कराड येथेही अन्न व औषध प्रशासनाने मोठी कारवाई करत तब्बल 29.45 लाख रुपयांचा साठा जप्त केला. या ठिकाणी आढळलेल्या उत्पादनांवर बॅच नंबर, लेबलिंग आणि उत्पादन दिनांक यांसारखी आवश्यक माहिती नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

लातूरमध्येही अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने सात ते आठ खवा विक्री करणाऱ्या दुकानांची तपासणी केली. छत्रपती संभाजीनगर येथील विशेष पथकाने केलेल्या या कारवाईदरम्यान भेसळयुक्त अन्नपदार्थ आढळून आले नाहीत, अशी प्राथमिक माहिती देण्यात आली आहे. दुकानांमधील अन्नपदार्थांची तसेच आवश्यक कागदपत्रांची सविस्तर तपासणी करण्यात आली.

राज्यात भेसळयुक्त अन्नपदार्थ, बनावट औषधे आणि अवैध सौंदर्यप्रसाधनांविरोधात अन्न व औषध प्रशासनाने सुरू केलेली ही मोहीम अधिक तीव्र करण्यात आली असून, पुढील काळात आणखी मोठ्या कारवाया होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Related to this topic: