Breaking News
  • राजपाल यादव यांना तुरुंगवास; चेक बाऊन्स प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
  • 'मिमिक्री आर्टिस्ट' म्हणत फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला; 'भाडे के टट्टू'वरून सुरू झालेल्या वादाला विधानसभेत उत्तर
  • देशात पुन्हा कोरोनाची धास्ती! आंध्र प्रदेशात 46 वर्षीय कोरोनाबाधिताचा मृत्यू; उपचारांनंतरही प्रकृतीत सुधारणा नाही
  • तेलंगणात भात रोवणीसाठी गेलेल्या चंद्रपूरच्या मजुरांची पिकअप उलटली; 4 जणांचा जागीच मृत्यू , 27 जखमी
  • शूज कारखान्यात भीषण आग दुर्घटना; आगीत जळून 28 जणांचा मृत्यू
  • Stock Market Update : TCS च्या दमदार निकालांचा बाजाराला बूस्ट; सेन्सेक्स-निफ्टीत 1% पेक्षा अधिक उसळी
  • “…अन् चाललेत मिसिंग लिंकचा मुका घ्यायला”; जयंत पाटील यांच्या टीकेला गोपीचंद पडळकरांचे प्रत्युत्तर
  • काँगोत इबोलाचा कहर! १,७९२ बाधित, ६२५ जणांचा मृत्यू; संयुक्त राष्ट्रांकडून तातडीच्या जागतिक हस्तक्षेपाचे आवाहन
  • WhatsApp चे नवे Birthday Reminder फीचर लवकरच; मित्र-नातेवाईकांचे वाढदिवस विसरण्याची चिंता संपणार

होम > आपले शहर > विदर्भ > बुलडाणा

Corona Incentive

रखडलेला कोरोना भत्ता अदा करण्याच्या मागणीसाठी अंगणवाडी सेविकांचे बुलढाणा जिल्ह्यात ठिकठिकाणी धरणे आंदोलन

अंगणवाडी सेविका, मदतनीस व आशा वर्कर्स यांचे १ जुलैपासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू आहे.


रखडलेला कोरोना भत्ता अदा करण्याच्या मागणीसाठी अंगणवाडी सेविकांचे बुलढाणा जिल्ह्यात ठिकठिकाणी धरणे आंदोलन

Corona Incentive |

क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे नेते विनायक सरनाईक यांचा आंदोलनाला पाठिंबा; मागण्यांची दखल न घेतल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

चिखली (Corona Incentive) : शेलगाव जहागीर, पाटोदा, एकलारा, दिवठाणा, भोरसा, भोरसी, बोरगाव काकडे यासह चिखली तालुक्यातील विविध ग्रामपंचायतींसमोर तसेच बुलढाणा जिल्ह्यातील ठिकठिकाणी कोरोना प्रोत्साहन भत्ता आणि थकीत मानधनाच्या मागणीसाठी अंगणवाडी सेविका, मदतनीस व आशा वर्कर्स यांचे १ जुलैपासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू आहे. आंदोलनाचा आज तिसरा दिवस असून प्रशासनाने अद्यापही मागण्यांची दखल न घेतल्याने आंदोलनकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

दरम्यान, क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे नेते विनायक सरनाईक यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन आंदोलनकर्त्या महिलांशी चर्चा केली आणि त्यांच्या मागण्यांना पाठिंबा दर्शविला. यावेळी ते म्हणाले की, "तीन दिवसांपासून महिला आंदोलनावर बसल्या आहेत. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद बुलढाणा यांनी टप्प्याटप्प्याने रखडलेला कोरोना भत्ता देण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, प्रशासनाकडून त्याबाबत कोणतीही कार्यवाही होताना दिसत नाही. चिखली तालुक्यातील महिला आंदोलनकर्त्यांच्या मागण्या तात्काळ मान्य कराव्यात, अन्यथा क्रांतिकारी शेतकरी संघटनाही रस्त्यावर उतरेल."

अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून चर्चा

आंदोलनस्थळावरूनच विनायक सरनाईक यांनी जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री. भारसाखळे, तहसीलदार गायकवाड तसेच गटविकास अधिकारी यांच्याशी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधून आंदोलनातील मागण्यांवर तातडीने तोडगा काढण्याची विनंती केली. यावेळी संबंधित अधिकाऱ्यांनी "मागण्यांच्या अनुषंगाने लवकरच तोडगा काढू," असे आश्वासन दिल्याची माहिती देण्यात आली.

१० जुलै रोजी सीटूचे आंदोलन

प्रशासनाने केवळ आश्वासने न देता प्रत्यक्ष कार्यवाही करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे. तसेच 'सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन' (CITU) संघटनेच्या वतीने १० जुलै रोजी पंचायत समिती, चिखली येथील गटविकास अधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्यात येणार असल्याचा इशाराही देण्यात आला आहे.

​​​​​​​

काय आहेत प्रमुख मागण्या?

कोरोना काळात जीव धोक्यात घालून सेवा बजावणाऱ्या अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि आशा वर्कर्स यांना शासनाने जाहीर केलेला कोरोना प्रोत्साहन भत्ता तात्काळ अदा करावा, तसेच थकीत मानधनाची रक्कम तत्काळ देण्यात यावी, या प्रमुख मागण्यांसाठी १ जुलैपासून शेलगाव जहागीर येथे बेमुदत धरणे आंदोलन सुरू आहे. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, अशी ठाम भूमिका चिखली तालुक्यातील आंदोलनकर्त्या महिलांनी घेतली आहे.

Related to this topic: