Breaking News
  • राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत आज शेगाव खामगाव दौऱ्यावर
  • लोणावळा–देवले मार्गावर दरड कोसळून मोठ्या प्रमाणात माती आणि दगड रस्त्यावर
  • शाळेच्या प्रांगणात खेळताना विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू; बीडमध्ये खळबळ
  • डॉक्टरांना मारहाण प्रकरणी अटकेत असलेल्या नगरसेवक रमेश म्हात्रे यांना जामीन मंजूर
  • खामगाव ग्रामीण पोलिसांची जुगार अड्ड्यावर धाड; १३ जणांविरुद्ध गुन्हा
  • पाचगणी–महाबळेश्वर रस्त्याची दुरावस्था, खड्ड्यांमुळे रस्त्याची झाली चाळण
  • रत्नागिरी-शहरातील पटवणे फगरवठार रस्ता पुन्हा खचला
  • भंडाऱ्यात तीन वर्षीय बालिकेवरील अत्याचाराच्या घटनेने तीव्र संताप
  • एका दिवसात सोने ८०० रूपये तर चांदी तब्बल ₹ ५ हजारांनी महाग

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

परभणी बँक राजामती मुटकूळे

जिल्हा बँक संचालकपदी राजामती मुटकूळे यांच्या विजयाचा जल्लोष

Parbhani Bank Rajamati Mutkule: परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या  संचालकपदाच्या निवडणुकीत राजामती शिवाजी मुटकूळे यांनी ५९ मते मिळवून दणदणीत विजय संपादन


जिल्हा बँक संचालकपदी राजामती मुटकूळे यांच्या विजयाचा जल्लोष

Parbhani Bank Rajamati Mutkule |

हिंगोली (Parbhani Bank Rajamati Mutkule) : परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या  संचालकपदाच्या निवडणुकीत राजामती शिवाजी मुटकूळे यांनी ५९ मते मिळवून दणदणीत विजय संपादन केला आहे. या विजयामुळे भाजप आमदार तान्हाजीराव मुटकूळे यांच्या राजकीय नेतृत्वावरील मतदारांचा विश्वास पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे.

या निवडणुकीत राजामती मुटकूळे यांच्याविरुद्ध रमेश शिंदे उभे होते मतमोजणीत मुटकूळे यांनी एकतर्फी वर्चस्व राखले. त्यांना एकूण ५९ मते मिळाली, तर प्रतिस्पर्धी उमेदवार रमेश शिंदे यांना केवळ ३१ मतांवर समाधान मानावे लागले. या निवडणुकीत एकूण ५ मते बाद ठरली. हा विजय आमदार तान्हाजीराव मुटकूळे यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. बँक निवडणुकीतील या यशामुळे जिल्ह्यातील सहकार क्षेत्रावर आणि स्थानिक राजकारणावर मुटकूळे गटाने आपली पकड अधिक मजबूत केली आहे. निकाल जाहीर होताच मुटकूळे समर्थकांनी आणि कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.

यावेळी भाजयुमो जिल्हाध्यक्ष शिवाजी मुटकूळे, बाबाराव बांगर, दिलीपराव चव्हाण, के.के शिंदे, प्रकाश थोरात, नगरसेवक हमिद प्यारेवाले, उमेश गुठ्ठे,  नारायण खेडकर, विलास गोरे, बाबु कदम, माणिक लोडे, संतोष टेकाळे, बंडू कर्‍हाळे, श्रीरंग राठोड, भानुदास वाबळे, बाबुराव भवर, रजनीश पुरोहीत, बद्रीनाथ घोंगडे, अशोक काळे, मुरलीधर इंगोले, पिंटू इंगोले, डिगांबर शिंदे, हनुमान कर्‍हाळे, विशाल दुधाळकर, बाबा घुगे, पदमाकर नायक, कांतराव घोंगडे, निवृत्ती आठरे, संदीप तनपुरे उपस्थित होते.

Related to this topic: