Breaking News
  • राजपाल यादव यांना तुरुंगवास; चेक बाऊन्स प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
  • 'मिमिक्री आर्टिस्ट' म्हणत फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला; 'भाडे के टट्टू'वरून सुरू झालेल्या वादाला विधानसभेत उत्तर
  • देशात पुन्हा कोरोनाची धास्ती! आंध्र प्रदेशात 46 वर्षीय कोरोनाबाधिताचा मृत्यू; उपचारांनंतरही प्रकृतीत सुधारणा नाही
  • तेलंगणात भात रोवणीसाठी गेलेल्या चंद्रपूरच्या मजुरांची पिकअप उलटली; 4 जणांचा जागीच मृत्यू , 27 जखमी
  • शूज कारखान्यात भीषण आग दुर्घटना; आगीत जळून 28 जणांचा मृत्यू
  • Stock Market Update : TCS च्या दमदार निकालांचा बाजाराला बूस्ट; सेन्सेक्स-निफ्टीत 1% पेक्षा अधिक उसळी
  • “…अन् चाललेत मिसिंग लिंकचा मुका घ्यायला”; जयंत पाटील यांच्या टीकेला गोपीचंद पडळकरांचे प्रत्युत्तर
  • काँगोत इबोलाचा कहर! १,७९२ बाधित, ६२५ जणांचा मृत्यू; संयुक्त राष्ट्रांकडून तातडीच्या जागतिक हस्तक्षेपाचे आवाहन
  • WhatsApp चे नवे Birthday Reminder फीचर लवकरच; मित्र-नातेवाईकांचे वाढदिवस विसरण्याची चिंता संपणार

होम > आपले शहर > मराठवाडा > परभणी

Container Crash

परभणीत कंटेनरवर दुचाकी धडकून तरुणाचा मृत्यू

भरधाव कंटेनर चालकाने अचानक ब्रेक मारल्याने मागून येणारी दुचाकी कंटेनरवर आदळून झालेल्या भीषण अपघातात एका ३० वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला.


परभणीत कंटेनरवर दुचाकी धडकून तरुणाचा मृत्यू

Container Crash |

पिंगळगड नाल्याजवळ अपघात; एक जण गंभीर जखमी, कंटेनर चालकाविरुद्ध गुन्हा

परभणी (Container Crash) : भरधाव कंटेनर चालकाने अचानक ब्रेक मारल्याने मागून येणारी दुचाकी कंटेनरवर आदळून झालेल्या भीषण अपघातात एका ३० वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला. ही घटना रविवार, २१ जून रोजी दुपारच्या सुमारास परभणी शहरातील गंगाखेड रोडवरील पिंगळगड नाल्याजवळ घडली.

याप्रकरणी मळीबा दौलतराव चव्हाण यांनी तक्रार दिली असून, कंटेनर क्रमांक एमएच ४० बीएल ८२९० च्या चालकाविरुद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित कंटेनर चालकाने त्याच्या ताब्यातील वाहन हयगयीने व निष्काळजीपणे चालवत अचानक ब्रेक लावला. त्यामुळे मागून येत असलेली सर्जेराव मळीबा चव्हाण (वय ३०, रा. सोन्ना) यांची दुचाकी कंटेनरवर जाऊन जोरात धडकली.

या अपघातात सर्जेराव चव्हाण गंभीर जखमी झाले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. तसेच फिर्यादी मळीबा चव्हाण हे गंभीर जखमी झाले असून, अपघातात दुचाकीचेही मोठे नुकसान झाले आहे.

अपघातानंतर कंटेनर चालक वाहन घटनास्थळी सोडून फरार झाला. या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शेख गौस करीत आहेत.

Related to this topic: