Breaking News
  • राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत आज शेगाव खामगाव दौऱ्यावर
  • लोणावळा–देवले मार्गावर दरड कोसळून मोठ्या प्रमाणात माती आणि दगड रस्त्यावर
  • शाळेच्या प्रांगणात खेळताना विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू; बीडमध्ये खळबळ
  • डॉक्टरांना मारहाण प्रकरणी अटकेत असलेल्या नगरसेवक रमेश म्हात्रे यांना जामीन मंजूर
  • खामगाव ग्रामीण पोलिसांची जुगार अड्ड्यावर धाड; १३ जणांविरुद्ध गुन्हा
  • पाचगणी–महाबळेश्वर रस्त्याची दुरावस्था, खड्ड्यांमुळे रस्त्याची झाली चाळण
  • रत्नागिरी-शहरातील पटवणे फगरवठार रस्ता पुन्हा खचला
  • भंडाऱ्यात तीन वर्षीय बालिकेवरील अत्याचाराच्या घटनेने तीव्र संताप
  • एका दिवसात सोने ८०० रूपये तर चांदी तब्बल ₹ ५ हजारांनी महाग

होम > आपले शहर > मराठवाडा > लातूर

Congress

काँग्रेस ओबीसी सेलच्या प्रदेश उपाध्यक्षपदी अजित निंबाळकर यांची निवड

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ओबीसी सेलच्या प्रदेश उपाध्यक्षपदी निलंगा येथील तरुण, तडफदार कार्यकर्ते अजित निंबाळकर यांची निवड करण्यात आली आहे.


काँग्रेस ओबीसी सेलच्या प्रदेश उपाध्यक्षपदी अजित निंबाळकर यांची निवड

लातूर : भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ओबीसी सेलच्या प्रदेश उपाध्यक्षपदी निलंगा येथील तरुण, तडफदार कार्यकर्ते अजित निंबाळकर यांची निवड करण्यात आली आहे. माजी मंत्री तथा आमदार अमित देशमुख यांच्या सूचनेवरून प्रदेश काँग्रेसच्या वतीने ही नियुक्ती करण्यात आली.

अजित निंबाळकर हे बारा बलुतेदार महासंघाचे जिल्हाध्यक्ष असून, ओबीसी चळवळीत त्यांचे उल्लेखनीय कार्य आहे. ओबीसी प्रवर्गातील सर्व जातींच्या प्रश्नांसाठी ते सातत्याने लढा देत असल्याचे सांगितले जाते.

निंबाळकर यांच्या निवडीमुळे मायक्रो ओबीसी, ओबीसी आणि बारा बलुतेदार समाजामध्ये उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. खऱ्या अर्थाने सर्वसामान्य, अतिमागास, मायक्रो ओबीसी आणि बारा बलुतेदार समाजाला न्याय, हक्क आणि सन्मान फक्त भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच देऊ शकते, अशी प्रतिक्रिया नवनियुक्त प्रदेश उपाध्यक्ष अजित निंबाळकर यांनी व्यक्त केली.

या निवडीचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, माजी मंत्री तथा आमदार अमित विलासराव देशमुख, ओबीसी विभागाचे प्रदेशाध्यक्ष डॉ. यशपाल भिंगे, माजी मंत्री दिलीपरावजी देशमुख, जिल्हाध्यक्ष अभय साळुंके, दिशा प्रतिष्ठानचे अभिजीत देशमुख तसेच इतर मान्यवरांनी स्वागत केले आहे.

Related to this topic: