Breaking News
  • बदलापुरात तुकाराम मुंडे यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक
  • देशाची शिक्षणव्यवस्था बदलावी लागेल- राहुल गांधी
  • मंत्री धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसकडून सांगलीत जल्लोष
  • आषाढी निमित्त काढण्यात आलेल्या रथ उत्सवात प्रयास मित्र मंडळाने देखाव्यातून मांडले 'नीट' पेपर फुटीचे दाहक वास्तव
  • युवकांनी सरकारला नैतिक जबाबदारी स्वीकारायला भाग पाडलं - शरद पवार
  • TET पेपर फुटी प्रकरणातील मास्टर माईंड बिजेदरं कुमार गुप्ता सह इंद्रजित सिंग ला 30 जुलै पर्यंत पोलीस कोठडी
  • केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनाम्यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये विद्यार्थ्यांसह विविध संघटनेचा जल्लोष....
  • छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज भागातील प्रति पंढरपूर येथे विठ्ठल भक्तांची गर्दी
  • संभाजीनगरच्या प्रति पंढरपूर येथे मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते सुरू विठ्ठल रुक्माईची पूजा

होम > आपले शहर > विदर्भ > नागपूर

शेतकरी संवाद मेळावा

कांद्री येथे राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे शेतकरी संवाद मेळावा व उत्कृष्ट शेतकरी सत्कार सोहळा संपन्न

Farmers Sanvad Melava: राष्ट्रवादी काँग्रेसच्या सत्तेपासून शेतकर्यांना मिळाले उत्कृष्ट मान्यवरांचे सत्कार आणि वृक्षारोपण, जयंती महोत्सवासाठी आयोजित कार्यक्रमात स्थानीय स्तरावर जनसंचालन हा प्रमुख विषय.


कांद्री येथे राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे शेतकरी संवाद मेळावा व उत्कृष्ट शेतकरी सत्कार सोहळा संपन्न

Farmers Sanvad Melava |

 

स्व. अजितदादा पवार यांच्या जयंती निमित्त जनसेवा सप्ताह' आणि वृक्षारोपण

कन्हान (Farmers Sanvad Melava) : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी,नागपुर ग्रामीण अंत र्गत कन्हान-कांद्री शहराच्या वतीने स्व. अजितदादा पवार यांच्या जयंती महोत्सवाचे निमित्त आयोजित 'जनसेवा सप्ताहाच्या' चौथ्या दिवशी शनिवार (दि.२५) जुलै ला मारोतराव पानतावणे महाविद्यालय गहुहिवरा रोड कांद्री-कन्हान येथे शेतकरी संवाद मेळावा, उत्कृष्ट शेतकरी सत्कार सोहळा व वृक्षारोपण कार्यक्रम मोठ्या उत्साह पार पडला.
             
कार्यक्रमाचे अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नागपुर ग्रामीण जिल्हाध्यक्ष डॉ. राजाभाऊ टाकसाळे होते. प्रदेश उपाध्यक्ष चंद्रपाल चौकसे तसेच प्रदेश महा सचिव किशोर बेलसरे, रामटेक विधानसभा अध्यक्ष  गणेश पानतावणे, न प कन्हान माजी उपाध्यक्ष डॉ.  मनोहर पाठक, ज्येष्ठ पत्रकार एन.एस. मालविये आणि किरण झाडे यांची विशेष उपस्थिती होती. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष डॉ. राजाभाऊ टाकसाळे, प्रदेश उपाध्यक्ष चंद्रपाल चौकसे यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना, नागरि कांना मार्गदर्शन करित स्व. अजित दादा पवार यांच्या जीवनावर प्रकाश टाकत म्हणाले की राज्यातील शेतकरी, महिला, युवक आणि सर्वसामान्य नागरिकांच्या कल्याणासाठी ऐतिहासिक जनहितकारी निर्णय घेतले आहेत.

सिंचन, कृषी विकास, महिला सक्षमीकरण आणि स्वयंरोजगाराच्या विविध योजनांचा लाभ प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवणे आणि दादांचे विकासाभिमुख विचार घरोघरी नेणे हीच आपल्या पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याची खरी जबाबदारी आहे. यानंतर आयोजि त शेतकरी संवाद मेळाव्यात (Farmers Sanvad Melava) शेतकऱ्यांच्या विविध समस्या, आधुनिक शेती तंत्रज्ञान, उत्पादन वाढ, बाजा रपेठ आणि पाणी व्यवस्थापन या विषयांवर सविस्तर चर्चा झाली. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत मान्यवरां च्या हस्ते महाविद्यालय परिसरात वृक्षारोपण करून हरित भविष्याचा संकल्प करण्यात आला. कार्यक्रमास परिसरातील शेती क्षेत्रात उल्लेखनिय व उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शेतकरी बांधवांचा मान्यवरांच्या हस्ते सत्का र करण्यात आला.

यावेळी जिल्हा उपाध्यक्ष संगीत भारती, जिल्हा महासचिव अशोक पाटील, पुराणदास तांडेकर, सुनील लाडेकर, श्रीराम नांदुरकर, शफीक शेख, सम्राट पगारे, राजेंद्र हटवार, मोरेश्वर सोनटक्के, रोहित मानवटकर, संदीप कभे, शशिकला बागडे, निशा ठाकरे, दीक्षा सोमकुवर, स्वाती पाठक, लक्ष्मी लाडेकर, कांचन मस्के, रेखा मस्के, मनिषा वासनिक, सुनिता मारबते, प्रभा चापले, रॉबिन निकोसे, रविंद्र केने, सतीश बेलसरे, सूर्यभान फरकाडे, शैलेश झेंडे, यशवंत भोरगे, ज्ञानेश्वर विघे, सोमाजी गिऱ्हे, अशोक इंगळे, नथुजी चरडे, देविदास जामदार, सुधाकर मेश्राम यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, कन्हान, कांद्री शहर सह अनेक वरिष्ठ पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Related to this topic: