Breaking News
  • राजपाल यादव यांना तुरुंगवास; चेक बाऊन्स प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
  • 'मिमिक्री आर्टिस्ट' म्हणत फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला; 'भाडे के टट्टू'वरून सुरू झालेल्या वादाला विधानसभेत उत्तर
  • देशात पुन्हा कोरोनाची धास्ती! आंध्र प्रदेशात 46 वर्षीय कोरोनाबाधिताचा मृत्यू; उपचारांनंतरही प्रकृतीत सुधारणा नाही
  • तेलंगणात भात रोवणीसाठी गेलेल्या चंद्रपूरच्या मजुरांची पिकअप उलटली; 4 जणांचा जागीच मृत्यू , 27 जखमी
  • शूज कारखान्यात भीषण आग दुर्घटना; आगीत जळून 28 जणांचा मृत्यू
  • Stock Market Update : TCS च्या दमदार निकालांचा बाजाराला बूस्ट; सेन्सेक्स-निफ्टीत 1% पेक्षा अधिक उसळी
  • “…अन् चाललेत मिसिंग लिंकचा मुका घ्यायला”; जयंत पाटील यांच्या टीकेला गोपीचंद पडळकरांचे प्रत्युत्तर
  • काँगोत इबोलाचा कहर! १,७९२ बाधित, ६२५ जणांचा मृत्यू; संयुक्त राष्ट्रांकडून तातडीच्या जागतिक हस्तक्षेपाचे आवाहन
  • WhatsApp चे नवे Birthday Reminder फीचर लवकरच; मित्र-नातेवाईकांचे वाढदिवस विसरण्याची चिंता संपणार

होम > आपले शहर > विदर्भ > बुलडाणा

चिखली RTE प्रवेश

चिखलीतील RTE प्रवेशांची जिओ-टॅगिंगद्वारे चौकशी करण्याची मागणी

Chikhali RTE Admission: चिखलीत रजिस्टरेटेड टु एज्युकेशन (RTE) प्रवेशासाठी जिओ-टॅगिंगद्वारे उपयुक्त काढावे. अपात्र लाभार्थींच्या नोंदीत फरक असल्याचा दोष दाखल झाल्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी.


चिखलीतील rte प्रवेशांची जिओ-टॅगिंगद्वारे चौकशी करण्याची मागणी

Chikhali RTE Admission |

चिखली (Chikhali RTE Admission) : शिक्षण हक्क कायदा (RTE) अंतर्गत चिखली शहरातील विविध शाळांमध्ये झालेल्या प्रवेश प्रक्रियेची जिओ-टॅगिंगच्या माध्यमातून सखोल चौकशी करून अपात्र लाभार्थींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते विजयसिंग खरे यांनी जिल्हाधिकारी, बुलढाणा यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. खरे यांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, RTE अंतर्गत झालेल्या काही प्रवेशांमध्ये अर्जदारांनी सादर केलेले पत्ते आणि प्रत्यक्ष वास्तव्यातील पत्ते यामध्ये तफावत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. तसेच आर्थिकदृष्ट्या सक्षम, शासकीय, निमशासकीय तसेच खाजगी क्षेत्रात नियमित नोकरी करणाऱ्या काही पालकांनीही या योजनेचा लाभ घेतल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने पात्र असलेल्या गरीब व गरजू विद्यार्थ्यांवर अन्याय होत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

या (Chikhali RTE Admission) पार्श्वभूमीवर चिखली शहरातील RTE अंतर्गत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांच्या पत्त्यांची जिओ-टॅगिंगद्वारे पडताळणी करण्यात यावी, उत्पन्न प्रमाणपत्रे व इतर कागदपत्रांची फेरतपासणी करण्यात यावी, तसेच चौकशीत अपात्र लाभार्थी आढळल्यास त्यांच्यावर नियमानुसार कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. शासनाने आर्थिकदृष्ट्या दुर्बल व वंचित घटकांतील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यासाठी RTE योजना सुरू केली आहे. त्यामुळे योजनेचा गैरवापर रोखून पात्र विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रशासनाने तातडीने चौकशी करावी, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

सदर प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित विभागांना आवश्यक निर्देश देण्याची विनंती जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली. निवेदन देताना विजयसिंग खरे यांच्यासमवेत सिद्धेश्वरजी ठेग उपस्थित होते.

Related to this topic: