Breaking News
  • बदलापुरात तुकाराम मुंडे यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक
  • देशाची शिक्षणव्यवस्था बदलावी लागेल- राहुल गांधी
  • मंत्री धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसकडून सांगलीत जल्लोष
  • आषाढी निमित्त काढण्यात आलेल्या रथ उत्सवात प्रयास मित्र मंडळाने देखाव्यातून मांडले 'नीट' पेपर फुटीचे दाहक वास्तव
  • युवकांनी सरकारला नैतिक जबाबदारी स्वीकारायला भाग पाडलं - शरद पवार
  • TET पेपर फुटी प्रकरणातील मास्टर माईंड बिजेदरं कुमार गुप्ता सह इंद्रजित सिंग ला 30 जुलै पर्यंत पोलीस कोठडी
  • केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनाम्यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये विद्यार्थ्यांसह विविध संघटनेचा जल्लोष....
  • छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज भागातील प्रति पंढरपूर येथे विठ्ठल भक्तांची गर्दी
  • संभाजीनगरच्या प्रति पंढरपूर येथे मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते सुरू विठ्ठल रुक्माईची पूजा

होम > आपले शहर > विदर्भ > बुलडाणा

चिखलीत गांजाविरोधात मोठी कारवाई

बुलढाणा जिल्ह्यात सुरू असलेल्या अमली पदार्थविरोधी “मिशन परिवर्तन” मोहिमेंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेने चिखली शहरातील इंदिरानगर, गौरक्षणवाडी परिसरात मोठी कारवाई करत तब्बल ९ किलो २१५ ग्रॅम गांजा जप्त केल


चिखलीत गांजाविरोधात मोठी कारवाई

Chikhli Drug Bust |

इंदिरानगर परिसरातील घरावर छापा; ९ किलो २१५ ग्रॅम गांजा जप्त

चिखली (Chikhli Drug Bust) : बुलढाणा जिल्ह्यात सुरू असलेल्या अमली पदार्थविरोधी “मिशन परिवर्तन” मोहिमेंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेने चिखली शहरातील इंदिरानगर, गौरक्षणवाडी परिसरात मोठी कारवाई करत तब्बल ९ किलो २१५ ग्रॅम गांजा जप्त केला आहे. जप्त करण्यात आलेल्या गांजाची अंदाजे किंमत ४ लाख ६० हजार ७५० रुपये इतकी असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या आदेशानुसार जिल्ह्यात गांजा व इतर अमली पदार्थांचे उत्पादन, साठवणूक, वाहतूक व विक्री करणाऱ्यांविरोधात विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर यांनी स्वतंत्र पथके तयार करून कारवाईचे आदेश दिले होते.

दि. १६ मे २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गोपनीय माहिती मिळाली की, चिखली पोलीस स्टेशन हद्दीतील इंदिरानगर, गौरक्षणवाडी परिसरातील एका घरात अवैधरित्या गांजाची साठवणूक करण्यात आली आहे. या माहितीच्या आधारे पोलिसांनी छापा टाकून सय्यद समीर सय्यद सलीम (वय ३८, रा. इंदिरानगर, गौरक्षणवाडी, चिखली) याच्या घरातून गांजा जप्त केला.

या प्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध एनडीपीएस अॅक्ट कलम ८(क), २०(ब)(ii) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास चिखली पोलीस करीत आहेत.

ही कारवाई पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अपर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड, श्रेणीक लोढा तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत पोनि. सुनील अंबुलकर, सपोनि. यशोदा कणसे, पोहेकॉ दीपक लेकुरवाळे, अनुपकुमार मेहेर, विजय वारुळे, पोना अरविंद बडगे, पोंकॉ मंगेश सनगाळे, अमोल वनारे, सतीश नाटेकर, दीपक वायाळ तसेच चालक समाधान टेकाळे व रवि भिसे यांनी सहभाग घेतला.

Related to this topic: