Breaking News
  • राजपाल यादव यांना तुरुंगवास; चेक बाऊन्स प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
  • 'मिमिक्री आर्टिस्ट' म्हणत फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला; 'भाडे के टट्टू'वरून सुरू झालेल्या वादाला विधानसभेत उत्तर
  • देशात पुन्हा कोरोनाची धास्ती! आंध्र प्रदेशात 46 वर्षीय कोरोनाबाधिताचा मृत्यू; उपचारांनंतरही प्रकृतीत सुधारणा नाही
  • तेलंगणात भात रोवणीसाठी गेलेल्या चंद्रपूरच्या मजुरांची पिकअप उलटली; 4 जणांचा जागीच मृत्यू , 27 जखमी
  • शूज कारखान्यात भीषण आग दुर्घटना; आगीत जळून 28 जणांचा मृत्यू
  • Stock Market Update : TCS च्या दमदार निकालांचा बाजाराला बूस्ट; सेन्सेक्स-निफ्टीत 1% पेक्षा अधिक उसळी
  • “…अन् चाललेत मिसिंग लिंकचा मुका घ्यायला”; जयंत पाटील यांच्या टीकेला गोपीचंद पडळकरांचे प्रत्युत्तर
  • काँगोत इबोलाचा कहर! १,७९२ बाधित, ६२५ जणांचा मृत्यू; संयुक्त राष्ट्रांकडून तातडीच्या जागतिक हस्तक्षेपाचे आवाहन
  • WhatsApp चे नवे Birthday Reminder फीचर लवकरच; मित्र-नातेवाईकांचे वाढदिवस विसरण्याची चिंता संपणार

होम > आपले शहर > विदर्भ > बुलडाणा

नगराध्यक्ष पंडितराव देशमुख

चिखलीकरांनी घाबरून जाऊ नये; अन्याय होऊ देणार नाही: नगराध्यक्ष पंडितराव देशमुख

MCP Panditrao Deshmukh: नगराध्यक्ष डॉ. पंडितराव देशमुख चिखलीच्या कर वाढाबद्दल नागरिकांना घाबरू नयेत असे आवाहन करीत असतात. त्यांनी जे गुंतागुंती तिचा समाधान करण्याची योजना घेतली आहे.


चिखलीकरांनी घाबरून जाऊ नये अन्याय होऊ देणार नाही नगराध्यक्ष पंडितराव देशमुख

MCP Panditrao Deshmukh |

चिखली (MCP Panditrao Deshmukh) : चिखली नगरपालिकेच्या मालमत्ता कर (टॅक्स) वाढीच्या पार्श्वभूमीवर शहरात निर्माण झालेल्या संभ्रम आणि नाराजीच्या वातावरणाबाबत नगराध्यक्ष पंडितराव देशमुख यांनी नागरिकांना दिलासा देत कोणत्याही प्रकारे घाबरून जाण्याचे कारण नसल्याचे स्पष्ट केले आहे. नागरिकांवर अन्याय होऊ देणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

दैनिक देशोन्नतीशी बोलताना नगराध्यक्ष देशमुख (MCP Panditrao Deshmukh) म्हणाले की, गुत्तेदारामार्फत करण्यात आलेल्या कर आकारणीबाबत नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत सविस्तर फेरविचार करण्यात येणार आहे. ज्या नागरिकांना अवाजवी कर आकारणी झाल्याची भावना आहे किंवा ज्यांच्यावर अन्याय झाला आहे, त्यांच्या प्रत्येक प्रकरणाचा सकारात्मक आणि न्याय्य पद्धतीने विचार केला जाईल.

ते पुढे म्हणाले की, चिखलीकरांना कराच्या बाबतीत कोणत्याही परिस्थितीत वेठीस धरले जाणार नाही. नगरपालिकेच्या अध्यक्ष या नात्याने नागरिकांचे हित जपणे आणि त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ न देणे ही आमची प्राथमिक जबाबदारी आहे. त्यामुळे कर वाढीबाबत अंतिम निर्णय घेताना सर्व नगरसेवकांना विश्वासात घेऊनच जनहिताचा निर्णय करण्यात येईल.
नगराध्यक्ष देशमुख यांनी सांगितले की, मागील सुमारे १४ वर्षांपासून मालमत्ता करात कोणतीही वाढ झालेली नव्हती. शासकीय नियमानुसार दर चार वर्षांनी कराचा फेरआढावा घेऊन वाढ होणे अपेक्षित असते. मात्र, याचा अर्थ नागरिकांवर अन्याय होणे असा नाही. ज्या ठिकाणी चुकीची किंवा अवाजवी आकारणी झालेली असेल, ती दुरुस्त करून संबंधितांना न्याय दिला जाईल.

चिखली शहराच्या विकासासोबतच नागरिकांचे हित आणि विश्वास जपण्यास नगरपरिषद कटिबद्ध असल्याचे सांगत, नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये आणि घाबरून जाऊ नये, असे आवाहनही नगराध्यक्ष पंडितराव देशमुख (MCP Panditrao Deshmukh) यांनी केले.

Related to this topic: