Breaking News
  • पुणे शहरात सायबर चोरट्यांचा सुळसुळाट; एकाच दिवसात ४२ गुन्ह्यांची नोंद
  • पावसाची दडी, पाणी स्रोत आटले; टोमॅटो पिकाला टँकरने पाणी देण्याची शेतकऱ्यांवर वेळ
  • मुक्ताईनगरात दोन गुटखा तस्कर जेरबंद, वाहन जप्त
  • नाशिकला पुढील 3 दिवसाचा पावसाचा यलो अलर्ट
  • मराठवाड्यात अद्यापही समाधानकारक पाऊस नाही
  • सरकारी कार्यक्रमात आमदारपुत्राचा प्रचार? उमरग्यातील बॅनरवरून वादाची चिन्ह
  • जंतर-मंतरवरील कथित लाठीचार्जचा बुलढाण्यात निषेध; रमाईच्या लेकींचे आंदोलन
  • बुलढाण्यात आरोग्य व्यवस्थेचा भोंगळ कारभार?
  • सायली खरे यांचा सुरांनी दिला CJP आंदोलनाला पाठिंबा!

होम > आपले शहर > विदर्भ > बुलडाणा

चिखली बाजार समिती

बाजार समिती  सभापती निवडीसाठी राजकीय हालचालींना वेग

Chikhli Bazar Samiti: तालुक्याच्या राजकीय आणि सहकार क्षेत्रातील महत्त्वाची संस्था असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समिती, चिखलीच्या सभापतीपदाच्या निवडणुकीची तारीख जाहीर झाल्यानंतर राजकीय हालचाली


बाजार समिती  सभापती निवडीसाठी राजकीय हालचालींना वेग

Chikhli Bazar Samiti |

 

१३ जून रोजी निवडणूक; अंतिम निर्णयाकडे सर्वांचे लक्ष

चिखली (Chikhli Bazar Samiti) : तालुक्याच्या राजकीय आणि सहकार क्षेत्रातील महत्त्वाची संस्था असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समिती, चिखलीच्या सभापतीपदाच्या निवडणुकीची तारीख जाहीर झाल्यानंतर राजकीय हालचालींना चांगलाच वेग आला आहे. विद्यमान सभापती डॉ. संतोष वानखडे यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या पदासाठी इच्छुकांनी मोर्चेबांधणी सुरू केली असून, बाजार समितीच्या राजकारणात पुन्हा एकदा उत्सुकता निर्माण झाली आहे. प्राधिकृत अधिकारी राजेंद्र घोंगे यांनी सभापती निवडीचा कार्यक्रम जाहीर केला असून, १३ जून २०२६ रोजी सकाळी ११ वाजता (Chikhli Bazar Samiti) कृषी उत्पन्न बाजार समितीच्या शिवभोजगृहात विशेष सभा घेऊन सभापतीपदाची निवड करण्यात येणार आहे.

बाजार समितीवर (Chikhli Bazar Samiti) सध्या महाविकास आघाडीची सत्ता कायम आहे. त्यामुळे सभापतीपदासाठी अनेक नावांची चर्चा सुरू असली तरी अंतिम निर्णय महाविकास आघाडीच्या नेतृत्वाकडूनच होणार असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. आतापर्यंत माजी सभापती विष्णू पाटील कुलसुंदर यांच्या पत्नी कमलबाई कुलसुंदर, समाधान सुपेकर, समाधान परिहार, पांडुरंग पाटील भुतेकर आणि रामभाऊ जाधव यांची नावे चर्चेत होती.

विशेष म्हणजे, चर्चेत असलेल्या पाच प्रमुख नावांपैकी पांडुरंग पाटील भुतेकर ईसरुळ व  समाधान परिहार अंचरवाडी हे दोन्हीही गावे सिंदखेडराजा मतदारसंघांमध्ये येतात तालुका चिखली असला तरी मतदारसंघ  सिंदखेडराजा येत असल्याने त्यांच्याबाबतही वेगळी  राजकीय गणिते मांडली जात आहेत. चिखली कृषी उत्पन्न बाजार समिती ही प्रामुख्याने चिखली विधानसभा मतदारसंघाच्या राजकीय प्रभावाखाली असल्याने पक्ष नेतृत्व, विशेषतः माजी आमदार राहुल बोंद्रे, हे चिखली विधानसभा मतदारसंघातील इच्छुकाला प्राधान्य देण्याची शक्यता असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे. त्यामुळे सुरुवातीला चर्चेत असलेल्या पाच नावांपैकी आता कमलबाई विष्णू पाटील कुलसुंदर, रामभाऊ जाधव आणि समाधान सुपेकर या तीन नावांमध्येच खरी रस्सीखेच होण्याची शक्यता राजकीय जाणकारांकडून व्यक्त केली जात आहे. आगामी काही दिवसांत होणाऱ्या बैठका आणि पक्षांतर्गत चर्चांनंतर चित्र अधिक स्पष्ट होणार असले तरी सध्या या तीन नावांची चर्चा सर्वाधिक जोरात असल्याचे दिसून येत आहे.

निवडणूक कार्यक्रम
जाहीर कार्यक्रमानुसार १३ जून रोजी सकाळी ११.३० ते १२ वाजेपर्यंत नामनिर्देशनपत्रांचे वितरण व स्वीकृती होईल. त्यानंतर छाननी, वैध उमेदवारांची यादी प्रसिद्ध करणे, अर्ज माघारीची प्रक्रिया आणि अंतिम उमेदवारांची यादी जाहीर करण्यात येईल. आवश्यक असल्यास दुपारी मतदान, मतमोजणी आणि तत्काळ निकाल जाहीर केला जाईल. एकूणच, सभापतीपदाच्या निवडणुकीची तारीख जाहीर झाल्यानंतर (Chikhli Bazar Samiti) चिखली बाजार समितीतील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, पुढील काही दिवसांत घडणाऱ्या राजकीय घडामोडींकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे. राहुल बोंद्रे कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब करतात आणि अखेर बाजार समितीच्या सभापतीपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडते, याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

Related to this topic: