Breaking News
  • भिंत अंगावर कोसळून वृध्द दाम्पत्याचा मृत्यू, पंढरपुरातील धक्कादायक घटना
  • भोंदू अशोक खरातचा ताबा पुन्हा सिन्नर पोलिसांकडे
  • नीट पेपर लीक प्रकरण; 20 दिवसापासून सीबीआयचे पथक लातूरमध्ये तळ ठोकून
  • परभणी जिल्ह्यातील विविध ठिकाणी जोरदार पावसाची हजेरी
  • शेखर गोरेंची नाराजी रास्त; पक्ष योग्य संधी देईल - जयकुमार गोरे
  • 40 वर्षापासून सुरू असलेल्या अवैध दारू धंद्यांवर पोलिसांनी का कारवाई केली नाही - अण्णा बनसोडे
  • मनोज जरांगे पाटील यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांना तपासणीसाठी नकार दिला
  • शिरूर तालुक्यातील इनामगाव येथे मायेपुढे बिबट्याही नमला; सासूसाठी सुनबाई आणि नातू बिबट्याला भिडले!
  • शिर्डीहून मुंबईकडे निघालेले प्रसाद लाड पुन्हा अंतरवली सराटीकडे रवाना

होम > आपले शहर > विदर्भ > बुलडाणा

चिखली बाजार समिती

चिखली बाजार समितीत सत्तेची खलबते; सभापती निवडीपूर्वी राजकीय हालचालींना वेग

Chikhli Bazar Samiti:


चिखली बाजार समितीत सत्तेची खलबते सभापती निवडीपूर्वी राजकीय हालचालींना वेग

Chikhli Bazar Samiti |

 

सभापतीपदाचा अंतिम निर्णय राहुल बोंद्रे यांच्या हातात?

चिखली (Chikhli Bazar Samiti) : तालुक्यातील सहकार आणि राजकारणाचे महत्त्वाचे केंद्र मानल्या जाणाऱ्या चिखली कृषी उत्पन्न बाजार समितीत सभापतीपदाच्या निवडीपूर्वी राजकीय हालचालींना वेग आला आहे. विद्यमान सभापती डॉ. संतोष वानखडे यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या पदासाठी इच्छुकांनी जोरदार फिल्डिंग सुरू केली असून, बाजार समितीचे राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले आहे. मात्र, अखेरचा निर्णय महाविकास आघाडीचे नेते तथा माजी आमदार राहुल बोंद्रे यांच्या शब्दावरच होणार, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

बाजार समितीवर (Chikhli Bazar Samiti) महाविकास आघाडीची सत्ता कायम राहणार असली तरी सभापतीपदासाठी अनेक नावे चर्चेत आले आहेत. माजी सभापती विष्णू पाटील कुलसुंदर यांच्या पत्नी कमल कुलसुंदर, समाधान सुपेकर, समाधान परिहार, पांडुरंग भुतेकर तसेच राम जाधव यांच्या नावांची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. इच्छुकांनी संचालकासह महाविकास आघाडीच्या पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी वाढवत आपापली बाजू मजबूत करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.

उपसभापतीपद राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार  व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे आहे. व दोन्ह पक्षातील इच्छुकांची खांदेपालट झालेली आहे. त्यामुळे  काँग्रेसशी संबंधित सदस्यालाच सभापतीपदाची संधी मिळेल, यात शंका नाही. मात्र, अंतिम नाव कोणाचे असेल हे राहुल बोंद्रे यांच्या निर्णयावरच अवलंबून असल्याचे मानले जात आहे. दरम्यान, बाजार समितीच्या निवडणुकीवेळी आमदार श्वेता महाले पाटील यांनी स्वतंत्र पॅनल उभे करून सत्ता हस्तगत करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, माजी आमदार राहुल बोंद्रे , प्रा. नरेंद्र खेडेकर माजी आमदार रेखाताई खेडेकर ,माजी मंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांच्या  नेतृत्वाखालील महाविकास आघाडीने तालुक्यातील प्रभावी पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या जोरावर बाजार समितीवरील आपली सत्ता कायम राखली होती. निवडणुकीनंतर पहिल्यांदा सभापतीपद निवडताना आताच्या तुलनेने कमी रस्सीखेच असताना डॉ. संतोष वानखडे यांची सभापतीपदी निवड झाली होती. मात्र, यावेळी परिस्थिती वेगळी असून इच्छुकांची संख्या अधिक आणि सर्वच दावेदार तोलामोलाचे असल्याने पक्ष नेतृत्वासमोर मोठी कसरत उभी राहणार असल्याचे दिसत आहे.

आगामी जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरही बाजार समितीचे सभापतीपद महत्त्वाचे मानले जात आहे. जिल्हा परिषद राजकारणात सक्रिय होण्याची इच्छा असलेले काही चेहरेही या शर्यतीत असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे सामाजिक, राजकीय आणि संघटनात्मक समीकरणांचा विचार करूनच निर्णय घेतला जाणार असल्याची चर्चा आहे.

सभापती पद मानपाण ते काटेरी मुकुट...

सभापतीपद हे तालुक्यातील मानाचे आणि प्रभावी पद मानले जात असले तरी बाजार समितीसमोर आर्थिक अडचणींचे मोठे आव्हान उभे आहे. कर्मचाऱ्यांच्या पगाराचा प्रश्न, विकासकामांसाठी निधीचे नियोजन आणि आर्थिक घडी बसविण्याचे आव्हान नव्या सभापतीसमोर असणार आहे. त्यामुळे हे पद केवळ प्रतिष्ठेचे नसून ‘काटेरी मुकुट’ ठरणार असल्याचीही चर्चा सुरू आहे.

एकंदरीत, चिखली बाजार समितीतील (Chikhli Bazar Samiti) सभापतीपदाची निवड ही केवळ सहकार क्षेत्रापुरती मर्यादित न राहता आगामी तालुका आणि विधानसभा मतदारसंघाची राजकारणाची दिशा ठरविणारी ठरणार असल्याने सर्वांचे लक्ष आता राहुल बोंद्रे कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब करतात याकडे लागले आहे.