Breaking News
  • नाणेघाटावर धुक्याची पांढरी चादर; इंद्रवज्र पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी
  • रांजणगाव गणपतीजवळ मिक्सर रोडखाली उतरला; वाहतूक कोंडीने नागरिक त्रस्त
  • धुळे जिल्ह्यामध्ये असलेल्या एकूण 182 पेट्रोल पंपापैकी जवळपास 9 पेट्रोल पंपांवर डिझेलचा तुटवडा
  • फिसाळलेल्या कुत्र्याने एका सहा वर्षांच्या मुलासह आठ जणांचा चावा घेतल्याची घटना रायगडच्या कर्जतमधून समोर आली आहे
  • सांगोल्यात मान्सूनपूर्व पावसाची हजेरी
  • पंढरपूरमध्ये चालत्या एसटी बसची डिझेल टाकी तुटली; एसटी बसच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर
  • बीडमध्ये केज तालुक्यातील जिवाचीवाडी शिवारात रात्री झालेल्या गारपिटीसह वादळी वाऱ्याने शेती पिकांचे नुकसान
  • पुण्यात किरकोळ कारणावरून तरुणावर कोयत्याने वार, २ जणांना अटक;पुण्यातील कोंढवा भागातील घटना सी सी टिव्ही मध्ये कैद
  • धाराशिवच्या उमरगा शहरात पावसाची जोरदार हजेरी,अचानक आलेल्या पावसामुळे आठवडी बाजाराचा उडाला फज्जा

होम > आपले शहर > विदर्भ > बुलडाणा

चिखली सीसीटीव्ही बंद

चिखली बसस्थानकापाठोपाठ शहरातील ‘तिसरे डोळे’ही आंधळे

चिखली शहरातील बहुतांश सीसीटीव्ही बंद असल्याने सुरक्षिततेच्या प्रश्नावर गंभीरता आली आहे. पोलीस व पालिका प्रशासनात जबाबदारीची ढकलाढकली सुरू आहे.


चिखली बसस्थानकापाठोपाठ शहरातील ‘तिसरे डोळे’ही आंधळे

Chikhali CCTV System |

 

४२ पैकी बहुतांश सीसीटीव्ही बंद; पालिका–पोलीस प्रशासनाची टोलवाटोलवी
कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर; नागरिकांमध्ये संताप

चिखली (Chikhali CCTV System) : घाटमाथ्यावरील महत्त्वाचे आणि सर्वाधिक वर्दळीचे केंद्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चिखली शहरातील सीसीटीव्ही यंत्रणाच बंद पडल्याने शहराच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. चिखली बसस्थानकातील कॅमेरे बंद असल्याचा मुद्दा समोर आल्यानंतर आता शहरातील विविध चौकांमध्ये बसविण्यात आलेल्या कॅमेऱ्यांचीही दयनीय अवस्था उघड झाली आहे. शहरातील जवळपास ४२ ठिकाणी बसविण्यात आलेल्या (Chikhali CCTV System) सीसीटीव्ही कॅमेऱ्यांपैकी केवळ तीन ते चार कॅमेरे सुरू असून उर्वरित सर्व बंद असल्याची माहिती समोर आल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.

बुलढाणा जिल्ह्याची राजकीय राजधानी म्हणून ओळख असलेल्या चिखली शहरात वर्षभर राजकीय वातावरण तापलेले असते. विविध आंदोलन, मोर्चे, राजकीय सभा तसेच स्थानिक पातळीवरील संघर्षाच्या घटना शहरात घडत असतात. शहराची वाढती लोकसंख्या, बाहेरून येणाऱ्या नागरिकांची वर्दळ आणि व्यापारी व्यवहार यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न दिवसेंदिवस अधिक गुंतागुंतीचा बनत आहे. अशा परिस्थितीत शहरातील (Chikhali CCTV System) सीसीटीव्ही कॅमेरे पोलिसांसाठी “तिसरा डोळा” म्हणून महत्त्वाची भूमिका बजावत असतात. चोरी, घरफोडी, मोटारसायकल चोरी, भांडणे, छेडछाड यांसारख्या घटनांच्या तपासासाठी या कॅमेऱ्यांचा मोठा उपयोग होत असतो. मात्र अनेक दिवसांपासून शहरातील बहुतांश कॅमेरे बंद असल्याने पोलिसांनाही तपासात मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. शहरातील संवेदनशील चौक, प्रमुख रस्ते आणि गर्दीच्या भागांमध्ये लावलेले कॅमेरे निष्क्रिय असल्याने गुन्हेगारांना मोकळे रान मिळाल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे.

पोलीसांचे पत्र; पालिकेचा कानाडोळा?

माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी चिखली पोलीस स्टेशनच्या वतीने नगरपरिषद प्रशासनाला लेखी पत्र देऊन बंद पडलेले (Chikhali CCTV System) सीसीटीव्ही कॅमेरे तातडीने सुरू करण्याची मागणी करण्यात आली होती. तसेच शहरातील काही संवेदनशील भागांमध्ये अतिरिक्त कॅमेरे बसविण्याबाबतही सूचना करण्यात आल्याचे समोर आले आहे. मात्र या पत्रव्यवहारानंतरही प्रत्यक्षात कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नसल्याने पोलीस व पालिका प्रशासनामध्ये जबाबदारीची ढकलाढकली सुरू असल्याचे दिसून येत आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी पोलिसांवर असली तरी कॅमेऱ्यांची देखभाल आणि दुरुस्तीची जबाबदारी नगरपरिषदेकडे असल्याने दोन्ही विभाग एकमेकांकडे बोट दाखवत असल्याची चर्चा आहे.

पालिका प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, सण-उत्सवांच्या काळात आवश्यकतेनुसार काही (Chikhali CCTV System) कॅमेरे सुरू करण्यात येतात. मात्र नागरिकांच्या मते, केवळ उत्सवापुरती सुरक्षा व्यवस्था पुरेशी नसून शहरात कायमस्वरूपी सक्षम निगराणी व्यवस्था असणे आवश्यक आहे.

गुन्हे उघडकीस आणण्यासाठी सीसीटीव्ही महत्त्वाचा दुवा

चोरी, घरफोडी, मोटारसायकल चोरी, हाणामाऱ्या, महिलांची छेडछाड, वाहतूक अपघात अशा घटनांमध्ये आरोपींचा माग काढण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज हा पोलिसांसाठी अत्यंत महत्त्वाचा पुरावा ठरतो. परंतु कॅमेरे बंद असल्याने तपास प्रक्रियेलाच अडथळे निर्माण होत असल्याची माहिती समोर येत आहे. शहरात बाहेरगावाहून येणाऱ्या लोकांची संख्या मोठी आहे. अनेक नवीन नागरिक कामानिमित्त शहरात वास्तव्यास येत असल्याने त्यांची माहिती स्थानिक प्रशासनाकडे नसते. अशा परिस्थितीत संशयित हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी सीसीटीव्ही यंत्रणा अत्यावश्यक मानली जाते.

फेब्रुवारी 2026 पासून मागणी; तरीही कारवाई शून्य

विशेष म्हणजे, शहरातील कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने चौकाचौकात (Chikhali CCTV System) सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सुनील धनगर यांनी २६ फेब्रुवारी २०२६ रोजीच नगरपरिषद प्रशासनाकडे लेखी स्वरूपात केली होती. मात्र त्या मागणीवर अद्याप कोणतीही प्रभावी कार्यवाही झालेली नसल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे.

“प्रशासनाने पुढाकार घ्यावा”: डॉ. महम्मद इसरार, विरोधी पक्षनेते, नगरपरिषद चिखली

“सन २०२२ मध्ये तत्कालीन पोलीस निरीक्षक अशोक लांडे आणि नगरपरिषद प्रशासन यांच्यात सीसीटीव्ही संदर्भात बैठक झाली होती. त्या बैठकीत जे निर्णय घेण्यात आले होते, त्यानुसार दोन्ही विभागांनी आपली जबाबदारी पार पाडणे आवश्यक आहे. शहराच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही यंत्रणा अत्यंत महत्त्वाची आहे. देखभाल व दुरुस्तीसाठी लागणारा खर्च देण्याबाबत टाळाटाळ होता कामा नये. याबाबत पालिका प्रशासनाला जाब विचारण्यात येईल,” अशी प्रतिक्रिया नगरपरिषदेचे विरोधी पक्षनेते डॉ. महम्मद इसरार यांनी दिली.

वर्षाकाठी चार–पाच लाखांच्या खर्चावरून ढकलाढकली?

पोलीस प्रशासन आणि नगरपरिषद या दोन्ही शासकीय यंत्रणांकडून विविध कामांवर लाखो–कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जातो. मात्र शहराच्या सुरक्षेशी थेट संबंधित असलेल्या सीसीटीव्ही यंत्रणेच्या देखभाल व दुरुस्तीसाठी लागणाऱ्या अवघ्या चार ते पाच लाख रुपयांच्या खर्चावरून दोन्ही विभागांमध्ये सुरू असलेली ढकलाढकली नागरिकांच्या नाराजीचे कारण ठरत आहे. शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी तसेच नागरिक, व्यापारी आणि महिलांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही यंत्रणा तातडीने कार्यान्वित करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.

Related to this topic: