Breaking News
  • राजपाल यादव यांना तुरुंगवास; चेक बाऊन्स प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
  • 'मिमिक्री आर्टिस्ट' म्हणत फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला; 'भाडे के टट्टू'वरून सुरू झालेल्या वादाला विधानसभेत उत्तर
  • देशात पुन्हा कोरोनाची धास्ती! आंध्र प्रदेशात 46 वर्षीय कोरोनाबाधिताचा मृत्यू; उपचारांनंतरही प्रकृतीत सुधारणा नाही
  • तेलंगणात भात रोवणीसाठी गेलेल्या चंद्रपूरच्या मजुरांची पिकअप उलटली; 4 जणांचा जागीच मृत्यू , 27 जखमी
  • शूज कारखान्यात भीषण आग दुर्घटना; आगीत जळून 28 जणांचा मृत्यू
  • Stock Market Update : TCS च्या दमदार निकालांचा बाजाराला बूस्ट; सेन्सेक्स-निफ्टीत 1% पेक्षा अधिक उसळी
  • “…अन् चाललेत मिसिंग लिंकचा मुका घ्यायला”; जयंत पाटील यांच्या टीकेला गोपीचंद पडळकरांचे प्रत्युत्तर
  • काँगोत इबोलाचा कहर! १,७९२ बाधित, ६२५ जणांचा मृत्यू; संयुक्त राष्ट्रांकडून तातडीच्या जागतिक हस्तक्षेपाचे आवाहन
  • WhatsApp चे नवे Birthday Reminder फीचर लवकरच; मित्र-नातेवाईकांचे वाढदिवस विसरण्याची चिंता संपणार

होम > आपले शहर > विदर्भ > चंद्रपूर

Chandrapur Politics

चंद्रपूर भाजपमध्ये अंतर्गत कलह उफाळला; ग्रामीण जिल्हा कार्यकारिणीला प्रदेशाध्यक्षांची स्थगिती

चंद्रपूर भाजपमधील अंतर्गत मतभेद अखेर उघडपणे समोर आले असून, नव्याने जाहीर करण्यात आलेल्या ग्रामीण जिल्हा कार्यकारिणीला प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या निर्देशानुसार स्थगिती देण्यात आली आहे.


चंद्रपूर भाजपमध्ये अंतर्गत कलह उफाळला ग्रामीण जिल्हा कार्यकारिणीला प्रदेशाध्यक्षांची स्थगिती

Chandrapur Politics |

रवींद्र चव्हाण यांच्या निर्देशानंतर डॉ. संजय कुटे यांचे पत्र; हरीश शर्मा यांच्या कार्यकारिणीवर ब्रेक, सुधीर मुनगंटीवार यांना राजकीय धक्का

चंद्रपूर (Chandrapur Politics) : चंद्रपूर भाजपमधील अंतर्गत मतभेद अखेर उघडपणे समोर आले असून, नव्याने जाहीर करण्यात आलेल्या ग्रामीण जिल्हा कार्यकारिणीला प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या निर्देशानुसार स्थगिती देण्यात आली आहे. भाजपचे प्रदेश सरचिटणीस आमदार डॉ. संजय कुटे यांनी २९ जून रोजी यासंदर्भातील अधिकृत पत्र जारी केले. या निर्णयामुळे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांच्या गटाला मोठा राजकीय धक्का मानला जात आहे.

ग्रामीण जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा हे सुधीर मुनगंटीवार यांचे निकटवर्तीय मानले जातात. त्यामुळे त्यांच्या नेतृत्वाखाली जाहीर झालेल्या कार्यकारिणीवर प्रदेश नेतृत्वाने स्थगिती आणल्याने पक्षातील अंतर्गत नाराजी अधिक स्पष्ट झाली आहे. चंद्रपूर भाजपच्या इतिहासात ग्रामीण जिल्हा कार्यकारिणीला अशा प्रकारे स्थगिती देण्याची ही पहिलीच घटना असल्याने पक्षाच्या राजकीय वर्तुळात याची मोठी चर्चा सुरू आहे.

हरीश शर्मा यांनी ४ जून २०२६ रोजी भाजपच्या चंद्रपूर ग्रामीण जिल्हा कार्यकारिणी, विविध मोर्चे आणि प्रकोष्ठांच्या पदाधिकाऱ्यांची यादी जाहीर केली होती. त्यानंतर नव्या पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करणारे फलक आणि बॅनरही जिल्हाभर लावण्यात आले होते. मात्र, या नियुक्त्यांमध्ये काही विशिष्ट नेत्यांना प्राधान्य देण्यात आल्याचा आरोप पक्षांतर्गत करण्यात आला.

या प्रक्रियेदरम्यान भाजपचे ज्येष्ठ नेते तथा माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांच्यासह जिल्ह्यातील इतर विद्यमान आमदारांना विश्वासात घेण्यात आले नसल्याचा आक्षेपही नोंदवण्यात आला. कार्यकारिणीची घोषणा एकतर्फी आणि घाईघाईने करण्यात आल्यामुळे पक्षातील अनेक नेत्यांमध्ये असंतोष निर्माण झाला.

यानंतर नाराज नेत्यांच्या शिष्टमंडळाने मुंबईत जाऊन भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि महाराष्ट्र प्रभारी शिवप्रकाश यांची भेट घेतली. या भेटीत वादग्रस्त कार्यकारिणीबाबत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. वरिष्ठ स्तरावर झालेल्या या चर्चेनंतर अखेर प्रदेश नेतृत्वाने थेट हस्तक्षेप करत कार्यकारिणीला स्थगिती देण्याचा निर्णय घेतला.

प्रदेश सरचिटणीस डॉ. संजय कुटे यांनी ग्रामीण जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा यांना पाठविलेल्या अधिकृत पत्रात नमूद केले आहे की, "४ जून २०२६ रोजी घोषित करण्यात आलेल्या भारतीय जनता पार्टी, चंद्रपूर ग्रामीण जिल्हा कार्यकारिणी, मोर्चा व प्रकोष्ठ पदाधिकारी यादीस प्रदेशाध्यक्ष यांच्या सूचनेनुसार पुढील आदेशापर्यंत स्थगिती देण्यात येत आहे."

Related to this topic: