Breaking News
  • बदलापुरात तुकाराम मुंडे यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक
  • देशाची शिक्षणव्यवस्था बदलावी लागेल- राहुल गांधी
  • मंत्री धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसकडून सांगलीत जल्लोष
  • आषाढी निमित्त काढण्यात आलेल्या रथ उत्सवात प्रयास मित्र मंडळाने देखाव्यातून मांडले 'नीट' पेपर फुटीचे दाहक वास्तव
  • युवकांनी सरकारला नैतिक जबाबदारी स्वीकारायला भाग पाडलं - शरद पवार
  • TET पेपर फुटी प्रकरणातील मास्टर माईंड बिजेदरं कुमार गुप्ता सह इंद्रजित सिंग ला 30 जुलै पर्यंत पोलीस कोठडी
  • केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनाम्यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये विद्यार्थ्यांसह विविध संघटनेचा जल्लोष....
  • छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज भागातील प्रति पंढरपूर येथे विठ्ठल भक्तांची गर्दी
  • संभाजीनगरच्या प्रति पंढरपूर येथे मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते सुरू विठ्ठल रुक्माईची पूजा

होम > आपले शहर > विदर्भ > गडचिरोली

घोट ग्रामपंचायतीला नगरपंचायतीचा दर्जा द्यावा

चामोर्शी तालुक्यातील घोट ही तालुक्यातील सर्वात मोठ्या ग्रामपंचायतींपैकी एक असून येथील लोकसंख्या अंदाजे १२ हजारांच्या घरात आहे.


घोट ग्रामपंचायतीला नगरपंचायतीचा दर्जा द्यावा

Chamorshi Taluka |

सामाजिक कार्यकर्ते संजय वडेट्टीवार यांची मागणी

घोट (Chamorshi Taluka) : चामोर्शी तालुक्यातील घोट ही तालुक्यातील सर्वात मोठ्या ग्रामपंचायतींपैकी एक असून येथील लोकसंख्या अंदाजे १२ हजारांच्या घरात आहे. वाढती लोकसंख्या, शासकीय कार्यालयांची उपलब्धता, शैक्षणिक संस्था, व्यापारी बाजारपेठ तसेच प्रशासकीय दृष्टीने वाढते महत्त्व लक्षात घेता घोट ग्रामपंचायतीला नगरपंचायतीचा दर्जा देण्यात यावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते संजय वडेट्टीवार यांनी केली आहे.

घोट हे स्वातंत्र्यवीर वीर बाबुराव शेडमाके यांची पावनभूमी म्हणून ओळखले जाते. घोट गडावरील त्यांच्या ऐतिहासिक वारशामुळेही घोटचे वेगळे महत्त्व आहे. परिसरात आदिवासी बांधवांची मोठी लोकसंख्या असून हा भाग अद्यापही विकासाच्या मुख्य प्रवाहापासून काही प्रमाणात दूर आहे.

घोट येथे केंद्रीय जवाहर नवोदय विद्यालय, पोलीस स्टेशन, आदिवासी विकास महामंडळाचे उपप्रादेशिक कार्यालय, राजस्व मंडळ कार्यालय, महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाचे ३३ केव्ही कार्यालय, बँक ऑफ महाराष्ट्र, सहकारी बँक शाखा आदी महत्त्वाची कार्यालये कार्यरत आहेत.

याशिवाय दिना प्रकल्प कार्यालय, सिंचन विभाग कार्यालय, वनपरिक्षेत्र कार्यालय, जैवविविधता उद्यान, जिल्हा परिषद कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, भारतीय डाक विभाग, मराठी केंद्र शाळा, आदिवासी मुलांचे वसतिगृह, परमपूज्य महाविद्यालय कॉन्व्हेंट, लोकमंगल संस्था तसेच नवोदय प्रायमरी कॉन्व्हेंट यांसारख्या शैक्षणिक व सामाजिक संस्था येथे आहेत.

घोट ग्रामपंचायतीपासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर सिमुलतला व वरूर या ग्रामपंचायतींचा परिसर जोडलेला असून घोट हे केंद्रस्थानी व्यापारी बाजारपेठ म्हणून विकसित झाले आहे. धान गिरण्या, विविध व्यापारी आस्थापने आणि ग्रामीण भागातील नागरिकांची मोठ्या प्रमाणावर ये-जा यामुळे घोटचे महत्त्व दिवसेंदिवस वाढत आहे.

या सर्व बाबींचा विचार करून घोट ग्रामपंचायतीला नगरपंचायतीचा दर्जा देण्यात यावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते संजय वडेट्टीवार यांनी शासनाकडे केली आहे.

Related to this topic: