Breaking News
  • राजपाल यादव यांना तुरुंगवास; चेक बाऊन्स प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
  • 'मिमिक्री आर्टिस्ट' म्हणत फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला; 'भाडे के टट्टू'वरून सुरू झालेल्या वादाला विधानसभेत उत्तर
  • देशात पुन्हा कोरोनाची धास्ती! आंध्र प्रदेशात 46 वर्षीय कोरोनाबाधिताचा मृत्यू; उपचारांनंतरही प्रकृतीत सुधारणा नाही
  • तेलंगणात भात रोवणीसाठी गेलेल्या चंद्रपूरच्या मजुरांची पिकअप उलटली; 4 जणांचा जागीच मृत्यू , 27 जखमी
  • शूज कारखान्यात भीषण आग दुर्घटना; आगीत जळून 28 जणांचा मृत्यू
  • Stock Market Update : TCS च्या दमदार निकालांचा बाजाराला बूस्ट; सेन्सेक्स-निफ्टीत 1% पेक्षा अधिक उसळी
  • “…अन् चाललेत मिसिंग लिंकचा मुका घ्यायला”; जयंत पाटील यांच्या टीकेला गोपीचंद पडळकरांचे प्रत्युत्तर
  • काँगोत इबोलाचा कहर! १,७९२ बाधित, ६२५ जणांचा मृत्यू; संयुक्त राष्ट्रांकडून तातडीच्या जागतिक हस्तक्षेपाचे आवाहन
  • WhatsApp चे नवे Birthday Reminder फीचर लवकरच; मित्र-नातेवाईकांचे वाढदिवस विसरण्याची चिंता संपणार

होम > आपले शहर > विदर्भ > गडचिरोली

चामोर्शी पोलीस पाटील

चामोर्शी तालुक्यातील 29 गावांचा अतिरिक्त कार्यभार पोलिस पाटलांकडे; नागरिकांची कामे होणार सुलभ

Chamorshi Police Patil: चामोर्शी तालुक्यातील २९ गावांवर अतिरिक्त पोलिस पाटलांचा कायम कार्यभार घ्यावा याची निदान उपविभागीय अधिकारीने घेतली.


चामोर्शी तालुक्यातील 29 गावांचा अतिरिक्त कार्यभार पोलिस पाटलांकडे नागरिकांची कामे होणार सुलभ

Chamorshi Police Patil |

घोट (Chamorshi Police Patil) : चामोर्शी तालुक्यातील ज्या गावांमध्ये पोलिस पाटलांची पदे रिक्त आहेत, त्या गावांतील नागरिकांची शासकीय कामे रखडू नयेत तसेच विद्यार्थ्यांना विविध दाखले वेळेत उपलब्ध व्हावेत, या उद्देशाने उपविभागीय अधिकारी, चामोर्शी यांनी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. रिक्त असलेल्या 29 गावांचा अतिरिक्त कार्यभार शेजारील कार्यरत पोलिस पाटलांकडे सोपविण्यात आला आहे.

या (Chamorshi Police Patil) निर्णयामुळे संबंधित गावांतील नागरिकांना पोलिस पाटिलांचे दाखले, शासकीय योजनांसाठी आवश्यक कागदपत्रे तसेच विविध प्रशासकीय कामे वेळेत पूर्ण करणे सुलभ होणार आहे. यापूर्वी पोलिस पाटलांची पदे रिक्त असल्यामुळे अनेक कामे प्रलंबित राहत होती. विद्यार्थी, शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांना याचा मोठा फटका बसत होता.अतिरिक्त कार्यभाराच्या आदेशामुळे आता संबंधित गावांतील नागरिकांना आवश्यक सेवा स्थानिक पातळीवर उपलब्ध होणार असून शासकीय कामांना गती मिळणार आहे. प्रशासनाच्या या निर्णयाचे नागरिकांकडून स्वागत करण्यात येत आहे.

घोट पोलिसांच्या पाठपुराव्याला यश; नागरिकांकडून समाधान

घोट परिसरातील अनेक गावांमध्ये पोलिस पाटलांची पदे रिक्त (Chamorshi Police Patil) असल्याने नागरिकांना पोलिस पाटिलांचे दाखले मिळविण्यासाठी वारंवार चकरा माराव्या लागत होत्या. विद्यार्थ्यांचे प्रवेश, शिष्यवृत्ती तसेच विविध शासकीय योजनांची कामेही रखडत होती.या समस्येची दखल घेत घोट पोलिस ठाण्याने सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर शिंदे यांनी तालुका महसूल प्रशासनाकडे  सातत्याने पाठपुरावा केला.या पाठपुराव्याची दखल घेत उपविभागीय अधिकारी,चामोर्शी यांनी रिक्त गावांचा अतिरिक्त कार्यभार कार्यरत पोलिस पाटलांकडे सोपविण्याचा निर्णय घेतला.

या निर्णयामुळे 29 गावांतील नागरिकांची मोठी गैरसोय दूर झाली असून शासकीय कामे आता सुरळीत होणार आहेत. घोट पोलिसांच्या सकारात्मक भूमिकेमुळे हा प्रश्न मार्गी लागल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली असून त्यांच्या प्रयत्नांचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

Related to this topic: