Breaking News
  • विदर्भात गेल्या बारा दिवसांपासून पावसाचा खंड
  • Gadchiroli : जपतलाई घटनेतील दोषींवर कठोर कारवाई; ५१३ आश्रमशाळांचे थर्ड पार्टी ऑडिट
  • कुंभमेळ्यासाठी १३ प्रमुख आखाड्यांसह धार्मिक संस्थांनाही पायाभूत सुविधांसाठी १५ लाखांपर्यंत निधी मिळणार
  • दोडामार्ग पाळये गावात हत्तींचा धुमाकूळ; माड, व केळी बागा उद्ध्वस्त
  • Nashik : आदित्य ठाकरे आज नाशिक दौऱ्यावर
  • शिवप्रतिष्ठान युवाच्यावतीने दीप प्रज्वलन करून दीप अमावस्या साजरी
  • Ratnagiri : रत्नागिरीतल्या पालीत वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश
  • Ahilyanagar : कॅफेच्या नावाखाली गैरकृत्य, श्रीरामपूरमध्ये पोलिसांची 4 कॅफेवर छापेमारी
  • Nanded : झेंडूच्या फुलशेतीतून शेतकऱ्याला मिळाला आर्थिक आधार

होम > आपले शहर > मराठवाडा > लातूर

चाकूर आत्मदहन

पोलीस व महाबीज कर्मचाऱ्यांनी आत्मदहन रोखले..

Chakur Self-Immolation: चाकूर तालुक्यातील शेतकऱ्यांना पेरलेल्या बियाणा उगवण्याच्या कारणामुळे नुकसान भरपाई मिळावी म्हणून आत्मदहन रोखलेचा निर्णय झाला आहे.


पोलीस व महाबीज कर्मचाऱ्यांनी आत्मदहन रोखले

Chakur Self-Immolation |

चाकूर (Chakur Self-Immolation) : चाकूर तालुक्यातील चापोली येथील शेतकऱ्यांचे शेतीमध्ये पेरलेले बियाणे उगवले नसल्यामुळे तहसीलदार व कृषी विभाग यांना  पंचनामा व नुकसान भरपाई साठी आत्मदहनाचा इशारा दिला होता. त्यामुळे पोलीस प्रशासन व महाबीज कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी आज कृषी कार्यालयात होणारे आत्मदहन रोखले.

चाकूर तहसील कार्यालय व कृषी विभाग यांना चापोली येथील ४० ते ४५ शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतात पेरलेले बियाणे उगवले नसल्यामुळे शेतातील पंचनामे व नुकसान भरपाई मिळावी म्हणून एका निवेदनाद्वारे आत्मदहनाचा इशारा दिला होता. यावेळी ठरलेल्या वेळेनुसार आज 40 ते 50 शेतकरी कृषी कार्यालयामध्ये पेट्रोल व डिझेलच्या बॉटल सोबत घेऊन आले त्यामध्ये महाबीजचे कर्मचारी व कृषी विभागातील कर्मचारी व संतापलेले शेतकरी यांच्यामध्ये वादावादी सुरू झाली.

त्यामुळे हा वाद विकोपाला जाण्याअगोदरच पोलीस प्रशासनाच्या हस्तक्षेपामुळे व महाबीज कर्मचाऱ्यांनी मदतीचे लेखी  स्वरूपाचे पत्र दिल्यामुळे हा अनर्थ टळला . आणि पोलीस प्रशासन महावीर कर्मचाऱ्यांना आत्मदहन होणारे रोखता आले यावेळी तालुक्यातील इतर गावचे शेतकरी हजर झाले होते.