Breaking News
  • विदर्भात गेल्या बारा दिवसांपासून पावसाचा खंड
  • Gadchiroli : जपतलाई घटनेतील दोषींवर कठोर कारवाई; ५१३ आश्रमशाळांचे थर्ड पार्टी ऑडिट
  • कुंभमेळ्यासाठी १३ प्रमुख आखाड्यांसह धार्मिक संस्थांनाही पायाभूत सुविधांसाठी १५ लाखांपर्यंत निधी मिळणार
  • दोडामार्ग पाळये गावात हत्तींचा धुमाकूळ; माड, व केळी बागा उद्ध्वस्त
  • Nashik : आदित्य ठाकरे आज नाशिक दौऱ्यावर
  • शिवप्रतिष्ठान युवाच्यावतीने दीप प्रज्वलन करून दीप अमावस्या साजरी
  • Ratnagiri : रत्नागिरीतल्या पालीत वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश
  • Ahilyanagar : कॅफेच्या नावाखाली गैरकृत्य, श्रीरामपूरमध्ये पोलिसांची 4 कॅफेवर छापेमारी
  • Nanded : झेंडूच्या फुलशेतीतून शेतकऱ्याला मिळाला आर्थिक आधार

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

Cattle Rescue

वसमतमध्ये गोवंश क्रूरतेच्या निषेधार्थ 31 जुलैला वसमत बंद

वसमत ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जवळा खंदारबन शिवारात कत्तलीच्या उद्देशाने 19 गोवंश जनावरे अन्न-पाण्याविना शेतात डांबून ठेवल्याचे धक्कादायक प्रकरण समोर आले आहे.


वसमतमध्ये गोवंश क्रूरतेच्या निषेधार्थ 31 जुलैला वसमत बंद

सकल हिंदू समाजाच्या बैठकीत एकमताने ठराव पारित

हिंगोली : वसमत ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जवळा खंदारबन शिवारात कत्तलीच्या उद्देशाने 19 गोवंश जनावरे अन्न-पाण्याविना शेतात डांबून ठेवल्याचे धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाड टाकून सर्व गोवंशांची सुटका केली असून या प्रकरणी आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेचा तीव्र निषेध नोंदवण्यासाठी आणि आरोपींवर कठोर कारवाई व्हावी, या मागणीसाठी दि. 30 जुलै रोजी सकल हिंदू समाज, वसमत यांची मोंढा मारोती मंदिर येथे आढावा बैठक पार पडली. या बैठकीत दि. 31 जुलै रोजी वसमत शहर बंद पाळण्याचा एकमुखी निर्णय घेण्यात आला.

बैठकीला शहरातील व्यापारी, गोरक्षक संघटनांचे पदाधिकारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. बंदच्या दिवशी सर्व व्यापारी आणि व्यावसायिकांनी आपली प्रतिष्ठाने बंद ठेवून आंदोलनाला पाठिंबा द्यावा, असे आवाहन करण्यात आले.

यावेळी "गौमातेवरील अत्याचार खपवून घेतला जाणार नाही. दोषींना कठोर शिक्षा मिळालीच पाहिजे," अशी मागणी करण्यात आली.

या प्रकरणी पोलिसांनी पुढील तपास सुरू केला असून, 31 जुलैच्या बंदच्या पार्श्वभूमीवर शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलीस प्रशासनाने बंदोबस्त वाढविला आहे.

Related to this topic: