Breaking News
  • Pune: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आज पुणे दौऱ्यावर
  • Gadchiroli: कौशल्याच्या जोरावर गडचिरोलीच्या तरुणांनी रोजगाराच्या संधी साधाव्यात – खनिकर्म राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर
  • Raigad - माणगावमधील JTL कंपनीमधील कामागारांच्या सुविधांच्या मुद्द्यावर मनसे आक्रमक
  • Nagpur: महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आज राजस्थानच्या दौऱ्यावर
  • Nagpur: ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ स्पर्धेचा निकाल सहा महिन्यांपासून रखडला
  • Nashik: त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची अलोट गर्दी
  • नागपुरातील कल्याणेश्वर शिव मंदिरात भक्तांची दर्शनासाठी गर्दी
  • खालापुर तालुक्यातील तुकसई गावचा पुल धोकादायक बनला
  • पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून खड्ड्यांच्या विरोधात आंदोलन

होम > आपले शहर > विदर्भ > बुलडाणा

बुलढाणा रेशन चोरी

धाड पोलिसांनी पकडला रेशनचा ४२ क्विंटल तांदूळ

Buldhana Ration Theft: बुलढाणा तालुक्यातील धाड पोलिसांनी सर्वेक्षणानंतर १४ जुलै रोजी, रेशनच्या अवैध वापरासाठी एकूण ४१ क्विंटल ६३ किलो तांदुळ आणि आयशर वाहन जपत केले.


धाड पोलिसांनी पकडला रेशनचा ४२ क्विंटल तांदूळ

Buldhana Ration Theft |

 

आयशरसह ३ लाख ४१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

बुलढाणा (Buldhana Ration Theft) : तालुक्यातील धाड पोलिस स्टेशन हद्दीतील वार्ड क्र.५ येथील नसीब नगर येथे धाड पोलिसांनी रेशनचा ४१ क्विंटल ६३ तांदूळ व आयशर असा एकूण ३ लाख ४१ हजार ६०० मुद्देमाल जप्त केला. सदर धडक कारवाई धाड पोलिसांनी १४ जुलै रोजी केली.

धाड येथील वॉर्ड क्र.५ नसीब नगर येथे सार्वजनिक वितरण प्रणाली (रेशन) मधील तांदुळाची अवैधरित्या वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती धाड पोलिसांना मिळाली होती. ठाणेदार अजिनाथ मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकाँ. रविंद्र चव्हाण, पोहेकाँ.श्रीकृष्ण चव्हाण व भगवान खमाटे यांनी घटनास्थळी पोहचत आयशर वाहन क्र.एम.एच-०४-बीजी.६०२२ ची झडती घेतली असता त्यामध्ये ८४ पोत्यांमध्ये एकूण ४१ क्विंटल ६३ किलो सरकारी रेशनचा तांदूळ जप्त केला. सदर तांदळाची अंदाजे किंमत ४१ हजार ६००रुपये व आयशर वाहन ३ लाख असा एकूण ३ लाख ४१ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदर वाहन धाड पोस्टे. येथे जमा करण्यात आले.

सदर वाहनाचे मालक सलीम खान युसुफ खान (वय ४२) नसीब नगर धाड यांच्या मालकीचे असल्याचे निष्पन्न झाले. (Buldhana Ration Theft) याप्रकरणी बुलढाणा तहसिलदार यांच्या अहवालानुसार मंगळवार १४ जुलै रोजी अत्यावश्यक वस्तू अधिनियम, १९५५ मधील कलम ३ व ७ अन्वये धाड पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंदविण्यात आला. या धडक कारवाईने रेशन माफियांचे धाबे दणाणले आहे.पुढील तपास सुरु आहे. सदर कारवाई ठाणेदार अजिनाथ मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली,पोउपनि समद शेख, एएसआय.शांताराम जाधव, पोहेकाँ. श्रीकृष्ण चव्हाण,समाधान देशमाने, सुनील सोनुने, युवराज मुळे,भगवान खमाते, लक्ष्मण काटे, इम्रान पठाण, नितीन इंगळे यांनी पार पाडली.