Breaking News
  • वर्धा जिल्ह्यात मागील २४ तासांपासून संततधार व रिमझिम पावसाची हजेरी
  • दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल उद्धव ठाकरेंची भेट घेणार
  • मनोज जरांगे आभिजीत दिपकेंच्या भेटीला
  • नाशिकमध्ये मनसेचं आंदोलन
  • बुलढाण्यात जंतर-मंतर लाठीचार्जचे तीव्र पडसाद; विद्यार्थ्यांची सरकारविरोधात स्वाक्षरी मोहीम
  • ठाकूरबुवांच्या समाधीस्थळी माऊलींचे तिसरे गोल रिंगण भक्तिरसात रंगले
  • जे.पी नड्डा, जितेंद्र सिंह आंदोलकांची भेट घेणार
  • पुणे शहरात सायबर चोरट्यांचा सुळसुळाट; एकाच दिवसात ४२ गुन्ह्यांची नोंद
  • पावसाची दडी, पाणी स्रोत आटले; टोमॅटो पिकाला टँकरने पाणी देण्याची शेतकऱ्यांवर वेळ

होम > आपले शहर > विदर्भ > बुलडाणा

बुलडाणा पहिला पाऊस

बुलडाणा तालुक्यात पावसाचे मंगल आगमन!

Buldhana's First Rain: बुलढाणा तालुक्यात आज नऊ महिन्यांनी गेल्या पावसाचे आगमन झाले आहे. शेतकऱ्यांना सुखी करणारा, हंगामाची आशांची सुरुवात करणारा पाऊस हे गावोगावी उत्सवासमभाग बनला आहे.


बुलडाणा तालुक्यात पावसाचे मंगल आगमन

Buldhana's First Rain |


शेतकरी सुखावला नऊ महिन्यांनंतर पावसाचे आगमन

बुलडाणा (Buldhana's First Rain) : तालुक्यात पहिल्याच पावसाचे नऊ महिने नऊ दिवसानंतर आगमन धरतीमातेची तहान भागवणारा, शेतकऱ्यांच्या आशा-आकांक्षांना नवे बळ देणारा आणि सृष्टीला नवसंजीवनी देणारा या वर्षातील पहिला पाऊस आज बुलढाण्यासह तालुक्यातील मासरूळ ,धाड, चांडोळ,दुधा,कोलवड,साखळी देऊळघाट,पाडळी ,मढ,गुम्मी,तराडखेड,कामठी ,वरुड, सोयगाव  दहीद , परिसरात बरसला आहे.

सप्टेंबर 2025 पासून गायब झालेला पाऊस चक्क नऊ महिने ओलांडल्यावर आगमन झाले. त्यामुळे सर्व जनतेसह शेतकऱ्यांना पावसाची आशा लागली होती गावोगावी भीषण पाणीटंचाई जाणू लागली होती विहिरींनी तळ गाठले होते.

पहिल्या पावसाच्या (Buldhana's First Rain) सरींनी शिवार आनंदून गेले, मातीचा सुगंध दरवळला आणि बळीराजाच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य फुलले. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी फटाके फोडून पावसाचे स्वागत केले.आता नव्या हंगामाची, नव्या स्वप्नांची आणि भरघोस उत्पन्नाची आशा निर्माण झाली आहे. या पवित्र आणि आनंददायी प्रसंगी सर्व शेतकरी बांधव, शेतमजूर, कृषी क्षेत्राशी संबंधित सर्व नागरिक आणि ग्रामस्थांना आनंद गगनाथ मावेनासा झाला.