Breaking News
  • विदर्भात गेल्या बारा दिवसांपासून पावसाचा खंड
  • Gadchiroli : जपतलाई घटनेतील दोषींवर कठोर कारवाई; ५१३ आश्रमशाळांचे थर्ड पार्टी ऑडिट
  • कुंभमेळ्यासाठी १३ प्रमुख आखाड्यांसह धार्मिक संस्थांनाही पायाभूत सुविधांसाठी १५ लाखांपर्यंत निधी मिळणार
  • दोडामार्ग पाळये गावात हत्तींचा धुमाकूळ; माड, व केळी बागा उद्ध्वस्त
  • Nashik : आदित्य ठाकरे आज नाशिक दौऱ्यावर
  • शिवप्रतिष्ठान युवाच्यावतीने दीप प्रज्वलन करून दीप अमावस्या साजरी
  • Ratnagiri : रत्नागिरीतल्या पालीत वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश
  • Ahilyanagar : कॅफेच्या नावाखाली गैरकृत्य, श्रीरामपूरमध्ये पोलिसांची 4 कॅफेवर छापेमारी
  • Nanded : झेंडूच्या फुलशेतीतून शेतकऱ्याला मिळाला आर्थिक आधार

होम > आपले शहर > मराठवाडा > परभणी

जुगार अड्डा छापा

परभणीतील बोरी पोलिसांचा जुगार अड्ड्यावर छापा

Gambling Den Raid: जिंतूर तालुक्यातील येसेगाव शिवारात सुरू असलेल्या बेकायदेशीर जुगार अड्ड्यावर बोरी पोलीस ठाण्याच्या पथकाने बुधवार २२ जुलै रोजी सायंकाळी धाडसी कारवाई


परभणीतील बोरी पोलिसांचा जुगार अड्ड्यावर छापा 

Gambling Den Raid |

 

जिंतूर रोडवरील येसेगाव येथील घटना सात जणांवर कारवाई बोरी पोलिसात गुन्हा...!
अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त

परभणी (Gambling Den Raid) : जिंतूर तालुक्यातील येसेगाव शिवारात सुरू असलेल्या बेकायदेशीर जुगार अड्ड्यावर बोरी पोलीस ठाण्याच्या पथकाने बुधवार २२ जुलै रोजी सायंकाळी धाडसी कारवाई करत २ लाख ३३ हजार ६७० किमतीचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यानुसार सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती स.पो.नि.रामेश्वर धोंडगे यांनी दिली.

पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या आदेशानुसार बोरी पोलीस स्टेशनच्या अंतर्गत सध्या पोलीस कर्मचारी धाडसी कार्यवाही करत आहेत. अशाच प्रकारची एक कार्यवाही बुधवार २२ जुलै रोजी सायंकाळी पोलिसांकडून करण्यात आली. सहायक पोलीस निरीक्षक रामेश्वर धोंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे गनिमी कावा करत ही कारवाई केली. जुगार खेळणार्‍यांना कोणत्याही प्रकारची चाहूल लागू नये, यासाठी पोलिसांनी साधे कपडे घातले, येसेगाव फाट्यापासून ते गावापर्यंत पोलीसांनी पोलीस गाडी ने न जाता पायी प्रवास केला, जवळ गेल्यानंतर अतिशय गुप्त पद्धतीने ही धाड टाकण्यात आली. छाप्या वेळी आरोपी पैसे लावून 'तिर्रट' नावाचा जुगार खेळत असल्याचे आढळून आले. पोलिसांना पाहताच एक आरोपी घटनास्थळावरून पसार झाला तर उर्वरित आरोपींना ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले.                              

पोलीसांच्या या (Gambling Den Raid) कारवाईत २२ हजार ७२० रोख रक्कम, विविध कंपन्यांचे सहा मोबाईल फोन, दोन दुचाकी, ५२ पत्ते, एक वही व एक पेन असा एकूण २ लाख ३३ हजार ६७० किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी गजानन अंकूशराव अंभूरे (रा. कडसांवगी), दत्तराव सुंदरराव फाटे, सुरेश कोडीराम शेळके, सोपान राजाराम कर्‍हाळे, एकनाथ प्रभाकर शेळके, दिनकर जनार्धन शेळके व उद्धव माणीकराव शेळके (सर्व रा. येसेगाव, ता. जिंतूर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस शिपाई संघसेन श्रीधरराव कांबळे यांच्या फिर्यादीवरून गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास सपोनि रामेश्वर धोंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करत आहेत.

कार्यवाही चालूच राहणार ; नागरिकांनी सहकार्य करावे
पोलीस अधीक्षक, परभणी यांच्या आदेशानुसार अशा प्रकारच्या कारवाई बोरी पोलीस स्टेशनच्या हद्दीत चालूच राहणार असून सुजाण नागरिकांनी सहकार्य करावे, असे सपोनि रामेश्वर धोंडगे यांनी देशोन्नती शी बोलताना सांगितले.

Related to this topic: