Breaking News
  • विदर्भात गेल्या बारा दिवसांपासून पावसाचा खंड
  • Gadchiroli : जपतलाई घटनेतील दोषींवर कठोर कारवाई; ५१३ आश्रमशाळांचे थर्ड पार्टी ऑडिट
  • कुंभमेळ्यासाठी १३ प्रमुख आखाड्यांसह धार्मिक संस्थांनाही पायाभूत सुविधांसाठी १५ लाखांपर्यंत निधी मिळणार
  • दोडामार्ग पाळये गावात हत्तींचा धुमाकूळ; माड, व केळी बागा उद्ध्वस्त
  • Nashik : आदित्य ठाकरे आज नाशिक दौऱ्यावर
  • शिवप्रतिष्ठान युवाच्यावतीने दीप प्रज्वलन करून दीप अमावस्या साजरी
  • Ratnagiri : रत्नागिरीतल्या पालीत वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश
  • Ahilyanagar : कॅफेच्या नावाखाली गैरकृत्य, श्रीरामपूरमध्ये पोलिसांची 4 कॅफेवर छापेमारी
  • Nanded : झेंडूच्या फुलशेतीतून शेतकऱ्याला मिळाला आर्थिक आधार

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

हिंगोलीत भाजपा आंदोलन

हिंगोलीत काँग्रेस विरोधात भाजपाचे गांधी चौकात तीव्र आंदोलन; राहुल गांधींच्या पोस्टरला जोडे मारून निषेध

Hingoli BJP Protest: काँग्रेस पक्षाकडून नवी दिल्ली येथे थेट पंतप्रधानांच्या निवासस्थाना समोर आंदोलन करून सुरक्षा धोक्यात आणल्याच्या निषेधार्थ 22 जुलै रोजी भारतीय जनता पार्टीच्या वतीने निदर्शने


हिंगोलीत काँग्रेस विरोधात भाजपाचे गांधी चौकात तीव्र आंदोलन राहुल गांधींच्या पोस्टरला जोडे मारून निषेध

Hingoli BJP Protest |

हिंगोली (Hingoli BJP Protest) : काँग्रेस पक्षाकडून नवी दिल्ली येथे थेट पंतप्रधानांच्या निवासस्थाना समोर आंदोलन करून सुरक्षा धोक्यात आणल्याच्या निषेधार्थ 22 जुलै रोजी भारतीय जनता पार्टीच्या वतीने शहरातील गांधी चौकात तीव्र निदर्शने करण्यात आली. या आंदोलनादरम्यान संतप्त भाजपा कार्यकर्त्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या पोस्टरला जोडे मारून काँग्रेसच्या बेजवाबदार वृत्तीचा तीव्र शब्दात निषेध केला.

दिल्लीत काँग्रेसने पंतप्रधानांच्या निवासस्थानासमोर धरणे आंदोलन करून जाणीवपूर्वक गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न केला. हा (Hingoli BJP Protest) प्रकार पंतप्रधानांच्या सुरक्षेला गंभीर भंग करणारा असून या कृत्याचा जाब विचारण्यासाठी आज दुपारी हिंगोलीतील गांधी चौकात भाजपाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी एकत्र येऊन काँग्रेस पक्षाचा धिक्कार असो, पंतप्रधानांच्या सुरक्षेचा खेळ खंडोबा करणाऱ्या काँग्रेसचा निषेध असो, अशा घोषणांनी कार्यकर्त्यांनी संपूर्ण परिसर दणाणून सोडला.

आंदोलनाचा तीव्र निषेध म्हणून कार्यकर्त्यांनी राहुल गांधी यांच्या पोस्टरला जोडे मारले. या (Hingoli BJP Protest) आंदोलनात माजी जिल्हाध्यक्ष फुलाजीराव शिंदे,भाजयुमो जिल्हाध्यक्ष शिवाजी मुटकूळे, सरचिटणिस उमेश नागरे, सुनीताताई मुळे,प्रवक्ता विलास गोरे, रजनीश पुरोहीत, कैलाश शहाणे,बाबा घुगे,संजय ढोके,नंदु भाऊ खिल्लारे,समिर भिसे,सुनिल राठौर,सदाशिव सुर्यतळ,श्रीरंग राठोड, पदमाकर नायक, हनुमान कर्‍हाळे,महेश थोरात,माणिक लोडे,शेख अतिक,सुरज व्यास,केशव सुरदुसे,उपस्थित होते.

Related to this topic: