Breaking News
  • पुणे शहरात सायबर चोरट्यांचा सुळसुळाट; एकाच दिवसात ४२ गुन्ह्यांची नोंद
  • पावसाची दडी, पाणी स्रोत आटले; टोमॅटो पिकाला टँकरने पाणी देण्याची शेतकऱ्यांवर वेळ
  • मुक्ताईनगरात दोन गुटखा तस्कर जेरबंद, वाहन जप्त
  • नाशिकला पुढील 3 दिवसाचा पावसाचा यलो अलर्ट
  • मराठवाड्यात अद्यापही समाधानकारक पाऊस नाही
  • सरकारी कार्यक्रमात आमदारपुत्राचा प्रचार? उमरग्यातील बॅनरवरून वादाची चिन्ह
  • जंतर-मंतरवरील कथित लाठीचार्जचा बुलढाण्यात निषेध; रमाईच्या लेकींचे आंदोलन
  • बुलढाण्यात आरोग्य व्यवस्थेचा भोंगळ कारभार?
  • सायली खरे यांचा सुरांनी दिला CJP आंदोलनाला पाठिंबा!

होम > आपले शहर > विदर्भ > नागपूर

कन्हान नगरपरिषद कचरा समस्या

बीकेसीपी शाळेसमोर कचरा, सांडपाणी व गळतीची समस्या; विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर

Kanhan Municipal Garbage Problem: नगरपरिषदेच्या कचरा वाहतुक गाड्यां कडुन बीकेसीपी शाळेजवळ कचरा टाकला जात अस ल्याने परिसरात अस्वच्छता निर्माण झाली आहे. यामुळे मुख्य नाली वारंवार तुंबत


बीकेसीपी शाळेसमोर कचरा सांडपाणी व गळतीची समस्या विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर

Kanhan Municipal Garbage Problem |

कन्हान (Kanhan Municipal Garbage Problem) : नगरपरिषदेच्या कचरा वाहतुक गाड्यां कडुन बीकेसीपी शाळेजवळ कचरा टाकला जात अस ल्याने परिसरात अस्वच्छता निर्माण झाली आहे. यामुळे मुख्य नाली वारंवार तुंबत असुन परिसरातील काही नागरिकांकडुनही तेथे शेण व इतर कचरा टाकला जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

नालीतील सांडपाणी शाळेच्या मुख्य प्रवेशद्वारा जवळ साचत असल्याने विद्यार्थी, शिक्षक व पालकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. सुमारे १,५०० विद्यार्थी शिक्षण घेत असलेल्या या शाळेच्या परिसरात पाईपलाईनची गळतीही होत असुन, त्यातील पाणी शाळा परिसरात साचत असल्याने आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या समस्येकडे नगर प्रशासन दुर्लक्ष करत असल्याची नाराजी व्यक्त करण्या त आली.

शाळेचे सुपरवायझर युनिक कादरी यांनी संबं धित समस्येकडे लक्ष वेधत शाळेच्या स्वखर्चाने जेसीबी लावुन स्वच्छता करण्यात आली असुन नियमित स्वच्छ ता, नालीची साफसफाई आणि पाईपलाईनची दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे. यावेळी (Kanhan Municipal Garbage Problem) समाजसेवक प्रशांत बाजीराव मसार, नितीन मेश्राम, प्रविण समुद्रे, राकेश गावंडे, मनोज मेश्राम आणि गजराज यादव आदी प्रामुख्याने उपस्थित होते. नागरिकांनी विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने नगरप्रशासनाने त्वरित उपाययोजना कराव्यात अशी मागणी केली आहे.