MLA Basavaraj Patil: आपला झालेला सत्कार हा जनतेचा विश्वास, प्रेम आणि आशीर्वाद यांचे प्रतीक असून, या सन्मानामुळे जनसेवेची जबाबदारी अधिक वाढल्याची भावना मनात दृढ झाली
विधान परिषद सदस्य, आ. बसवराज पाटील यांची प्रतिपादन
लातूर (MLA Basavaraj Patil) : आपला झालेला सत्कार हा जनतेचा विश्वास, प्रेम आणि आशीर्वाद यांचे प्रतीक असून, या सन्मानामुळे जनसेवेची जबाबदारी अधिक वाढल्याची भावना मनात दृढ झाली, असे प्रतिपादन नवनिर्वाचित विधान परिषद सदस्य आमदार बसवराज पाटील यांनी केले. महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीतील ऐतिहासिक विजयाबद्दल लातूर महानगरपालिकेचे नगरसेवक गिरीष शेषराव पाटील व त्यांचे चिरंजीव अमृत (नाना) पाटील आणि पाटील परिवाराच्यावतीने आमदार बसवराज पाटील यांचा रविवारी सायंकाळी रामकृष्ण मंगल कार्यालयात सत्कार सोहळा पार पडला.
पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते हा सोहळा पार पडला. या कार्यक्रमास श्री. ज्ञानेश्वर महाराज औसेकर, गोरखनाथ महाराज औसेकर, जिल्हा परिषद अध्यक्षा उषाताई पाटील, नगरसेवक गिरीष शेषराव पाटील, संयोजक अमृत (नाना) पाटील, देविदास काळे, दीपक मठपती, माधवराव पाटील टाकळीकर, ॲड. परीक्षित पवार, नगरसेविका रागिणीताई यादव, प्रेरणाताई होनराव, राजश्री बाहेती, संगमेश्वर ठेसे, बसवराज धाराशिवे, शिरीषप्पा उटगे, प्रकाश आष्टे, दिलीप भालेराव, प्रविण कस्तुरे, ॲड. प्रदीप मोरे, शिंदे ताई, गणेश गवारे, मधुसूदन पारीख, बसवराज वळसंगे, भीमाशंकर बेंबळे, सुनील मिटकरी, शेषराव पाटील, श्री. रवी महाराज, श्री. संभाजी पाटील, सुभाष मुक्ता, महेश आष्टे, सीमाताई करपे, ॲड. शीतलताई पाटील, नगरसेवक अनंत गायकवाड, शेटे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

हलगींच्या आणि निनादात अमृत पाटील व मित्र परिवाराच्या वतीने कार्यक्रम स्थळी आमदार बसवराज पाटील यांचे जेसीबीच्या साह्याने पुष्पहार घालून सर्वप्रथम जंगी स्वागत करण्यात आले. त्यानंतर या कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांचा पाटील परिवाराच्यावतीने सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक नगरसेवक गिरीष पाटील यांनी केले. लातूर महानगरपालिकेतील अनेक प्रश्न त्यांनी यावेळी उद्धृत करत आमदार बसवराज पाटील यांच्या कार्याचे कौतुक केले. आमदार बसवराज पाटील व आपल्या कुटुंबाचे गेल्या तीन पिढ्यापासूनचे ऋणानुबंध यावेळी गिरीष पाटील यांनी मांडले.
यावेळी बोलताना गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी राजकारणातील विविध भूमिका सांगून जनसेवेसाठी लोकप्रतिनिधींनी सदैव तत्पर राहिले पाहिजे, असे सांगितले.
या कार्यक्रमात पाटील परिवारांचे स्नेही, आप्तेष्ट, सर्व सहकारी, लातूर महानगरपालिकेचे सर्व नगरसेवक, नगरसेविका तसेच भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.