Breaking News
  • पुण्याहून मुंबईला येणारी वाहतूक बंद करण्यात आल्यामुळे प्रवाशांचे हाल
  • रत्नागिरी जिल्ह्यासाठी आज ऑरेंज अलर्ट, नद्यांच्या पाणी पातळीत मोठी वाढ
  • आळंदीमध्ये इंद्रायणी नदी दुथडी भरून वाहतेय, चारही पूल गेले पाण्याखाली
  • मुंबई, पुणे परिसरात पुढील 2 दिवस रेड अलर्ट
  • मुंबईतील सकाळची विमानसेवा रद्द झाल्यामुळे प्रवासात अडचणी
  • कोकण रेल्वे मार्गावर ट्रेन विलंबाने; मुसळधार पावसाचा फटका
  • मावळमध्ये एनडीआरएफची धाडसी कारवाई; पाण्यात अडकलेल्या बसमधील ३७ प्रवाशांची सुखरूप सुटका
  • साताऱ्यात सुसाट्याच्या वाऱ्याने शाळेचे छप्पर उडाले
  • पुणे मुंबई दरम्यानची एसटी वाहतूक पुढील आदेश येईपर्यंत बंद

होम > आपले शहर > विदर्भ > बुलडाणा

राम मंदिर चोरी प्रकरण

अयोध्येतील श्रीराम मंदिर चोरी प्रकरणाच्या निषेधार्थ चिखलीत शिवसेनेचे तीव्र आंदोलन

Ram Mandir Daan Chori: अयोध्या येथील श्रीराम मंदिरातील कथित चोरी प्रकरणाच्या निषेधार्थ शिवसेना व युवासेनेच्या वतीने चिखली शहरात तीव्र आंदोलन, युवासेना जिल्हाप्रमुख नंदू कऱ्हाडे यांच्या नेतृत्वाखाली


अयोध्येतील श्रीराम मंदिर चोरी प्रकरणाच्या निषेधार्थ चिखलीत शिवसेनेचे तीव्र आंदोलन

Ram Mandir Daan Chori |

 

श्रीराम मंदिरात आरती करून व्यक्त केला निषेध

चिखली (Ram Mandir Daan Chori) : अयोध्या येथील श्रीराम मंदिरातील कथित चोरी प्रकरणाच्या निषेधार्थ शिवसेना व युवासेनेच्या वतीने चिखली शहरात तीव्र आंदोलन करण्यात आले. युवासेना जिल्हाप्रमुख नंदू कऱ्हाडे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनाची सुरुवात शहरातील जुने गाव परिसरातील श्रीराम मंदिरात श्रीरामाच्या प्रतिमेसमोर प्रार्थना व महाआरती करून करण्यात आली. त्यानंतर शिवसैनिकांनी निषेध व्यक्त करत दोषींना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करावी तसेच संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय व निष्पक्ष चौकशी करण्यात यावी, अशी जोरदार मागणी केली.

यावेळी शिवसैनिकांनी घोषणाबाजी करत (Ram Mandir Daan Chori) श्रीराम मंदिरासारख्या देशाच्या श्रद्धास्थानाच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले. मंदिर परिसरातील सुरक्षाव्यवस्थेतील त्रुटी दूर करून भविष्यात अशा घटना पुन्हा घडणार नाहीत, यासाठी शासनाने तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करण्यात आली. दोषींना पाठीशी घालण्याचा कोणताही प्रयत्न खपवून घेतला जाणार नाही, असा इशाराही आंदोलनकर्त्यांनी दिला.

या (Ram Mandir Daan Chori) आंदोलनात युवासेना जिल्हाप्रमुख नंदू कऱ्हाडे, शहर प्रमुख श्रीरामभाऊ झोरे, शहर संघटक प्रीतमभाई गैची, शहर प्रमुख आनंद गैची, समाधान जाधव, रवि पेटकर, हरीदास इंगळे शुभम वानखेडे सचिन जोशी, सर अनिल जावरे, गणेश कुडके, पुजाजी शेलके, सतनासिंह वधवा, दीपक सोलाट, किशोर महाले, दिनेश गैची, साजिद भाई, शोहेल शहा, शैलेश पचेरवाल, राहुल वरवडे,, रवि देशमाने, सचिन सुरूशे, प्रथम गैची, प्रणव सोनोने, सार्थक साळवे, रोशन खान आणि शेख रईस यांच्यासह शिवसेना व युवा सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले.