Breaking News
  • भीमाशंकरमध्ये विनापास दर्शनाला प्रतिसाद; वाढत्या गर्दीमुळे अनेक भाविक दर्शनाविना परतण्याची वेळ
  • दोडामार्ग विर्डी धबधब्याच्या खोल जलकुंडात पर्यटक बुडाला
  • घाटेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेला गेली पाच दिवसांपासून ठोकले ग्रामस्थांनी कूलूप
  • खाजगी ट्रॅव्हल्स मधील वाहकाची मुजोरी, ट्रॅव्हल्स मधील महिला प्रवासी महिलेला उद्धट बोलून मारहाण करण्याचा प्रयत्न
  • अखेर मुंबईत पावसाचं आगमन झालेलं आहे. चर्चगेटमध्ये पावसाला सुरुवात झाली आहे.
  • मुंबईत पाऊस, मुंबईकरांना दिलासा
  • "जीव गेला तरी चालेल, पण माघार नाही!" – तुपकरांचा सरकारला इशारा
  • अल निनोच्या प्रभावामुळे पाणीटंचाई होण्याची शक्यता
  • बारामती शहरात आता एक दिवसाआड पाणीपुरवठा केला जाणार

होम > आपले शहर > मराठवाडा > लातूर

औसा पाईपलाईन त्रास

औशात सत्ताधाऱ्यांच्या नाकावर टिच्चून हस्ती जलवाहिनी!

Ausa Pipeline Issues: ऊसातील नवीन हसती पाईपलाईनला विरोध करणाऱ्या सत्ताधिकार्यांनी नाकावर टिच्चून जागोजागी चालावले असून खोदलेल्या रस्त्याचे दुरुस्त न झालेले असून, स्थानीकांना चरम त्रास झाला आहे.


औशात सत्ताधाऱ्यांच्या नाकावर टिच्चून हस्ती जलवाहिनी

Ausa Pipeline Issues |

 

चार महिन्यांपासून खोदलेले रस्ते नादुरुस्तच; नागरिकांना नाहक त्रास

औसा (Ausa Pipeline Issues) : एकेकाळी औसा शहरात हस्ती पाईपलाईनला विरोध करण्यासाठी दंड थोपटून बसलेल्या विद्यमान सत्ताधाऱ्यांच्या नाकावर टिच्चून जागोजागी नवीन हस्ती पाईपलाईनचे काम होत आहे. यासाठी नवे कोरे रस्ते खचाखच फोडण्यात आले असून फोडलेल्या या रस्त्यामुळे नागरिकांना गेल्या चार महिन्यांपासून नाहक त्रास सहन करावा लागत आहे. प्रशासकीय काळामध्ये मंजूर झालेल्या या कामाची गती इतकी संथ आहे की, नवीन रस्ते झाल्यानंतरही पाईपलाईनचे काम पूर्ण झाले नाहीत.

 सारोळा रोड बरकत नगर येथे फेब्रुवारी महिन्यात या (Ausa Pipeline Issues) पाईपलाईनच्या कामाला सुरुवात झाली, तेव्हा हा रस्ता खोदण्यात आला होता. तात्काळ हा रस्ता दुरुस्त करून देण्याच्या अटीवर येथील स्थानिक नागरिकांनी या कामाला अडथळा निर्माण केला नाही. परंतु चार महिने उलटले तरीही हे रस्ते दुरुस्त न झाल्याने विद्यार्थी, महिला व वृद्ध व्यक्तींना या खोदलेल्या रस्त्यामुळे नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

विद्यमान सत्ताधाऱ्यांचा कामाला होता विरोध

जागोजागी झालेल्या या हस्तीपाईपलाईनला विद्यमान राष्ट्रवादी सत्ताधाऱ्यांचा विरोध होता. मध्यंतरीच्या काळात अशा काय घटना घडल्या की विरोध होत असलेल्या या कामाला सुरुवात झाली व जागोजागी रस्ते तोडून काम अपूर्ण ठेवले गेले.'राष्ट्रवादीची सत्ता आली तर होणारी ही पाईपलाईन उखडून नवीन लोखंडी पाईपलाईन करू', अशी वल्गना विद्यमान उपनगराध्यक्ष डॉ. अफसर शेख यांनी त्यावेळी केली होती. हस्ती पाईपलाईनचे दुष्परिणाम त्यांनी प्रसार माध्यमांवर बोलून दाखवले होते. 

वारंवार विनंती व निवेदनानंतर मिळाली होती मंजुरी

आमदार अभिमन्यू पवार यांना वारंवार विनंती करून येथील स्थानिक नागरिकांनी रस्ता मंजूर करून घेण्यासाठी विनंत्या केल्या होत्या. तेव्हा ५४ लाख रुपये खर्चून या ठिकाणी रस्ता निर्माण करण्यात आला होता. दोन्ही बाजूने पाईपलाईन साठी चार फूट जागा शिल्लक असताना रस्ता का खोदण्यात आला? असा प्रश्न येथील नागरिकांना पडला आहे.
दरम्यान याबाबत नगर परिषदेचे मुख्याधिकारी मंगेश शिंदे यांच्याकडे चौकशीसाठी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता आमच्या प्रतिनिधीशी संपर्क करण्याचे मुख्याधिकारी यांनी टाळले.

वृद्धांना खूप त्रास!
"माझ्या घरात वृध्द मंडळींना येण्यासाठी खूप त्रास होत आहे. रस्ता लवकर दुरुस्त होईल वाटले होते. पण कशात घोंगड अडलंय ते माहीत नाही."
- आतीक बागवान, स्थानिक नागरिक

नळ कनेक्शन चे पैसे भरा, खोदलेला रस्ता दुरुस्त होईल!
माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक जावेद शेख यांनी सांगितले की, 'स्थानिक नागरिक जोपर्यंत नळ कनेक्शनचे पैसे भरून घेत नाहीत, तोपर्यंत हा रस्ता खोदलेला दुरुस्त करता येत नाही. सर्वांना नवीन पाईपलाईनचे कनेक्शन देणे आवश्यक आहे. याबाबत आमचे मुख्याधिकारी यांच्याशी बोलणे झाले आहे. लवकरच काहीतरी मार्ग काढू'.

Related to this topic: