Breaking News
  • मीटर तपासणीसाठी गेलेल्या महावितरण कर्मचाऱ्याला मारहाण, संगमनेरमध्ये तिघांविरोधात गुन्हा दाखल
  • धाराशिवमध्ये 4 गावातील मराठा समाजाचे गावकरी आक्रमक,रास्ता रोको आंदोलन
  • पुण्यात एमपीएससी परीक्षेची करणाऱ्या तरुणाची आत्महत्या
  • आमदार सदाभाऊ खोत रस्त्यावर, ढोलवादन करत लेझीम खेळून डीजे बंदीची मागणी
  • मुख्यमंत्र्यांच्या नावाने बनावट अकाउंट, नशिराबादेत चेन्नई सायबर क्राईमची धडक!
  • लोणी काळभोर पोलीस ठाण्यात ACB ची धाड
  • नंदुरबारमध्ये 93 लाखांचा 186 किलो गांजा जप्त
  • OBCच्या हक्काला धक्का नाही – उदय सामंत
  • माकडांमुळे शाळा बंद, विद्यार्थी व शिक्षक शाळा सोडून पळाले

होम > आपले शहर > मराठवाडा > लातूर

औशा ओपन स्पेस उद्यान

औशात 'ओपन स्पेस'वर दीड कोटींचे उद्यान; राष्ट्रवादी सत्तेत आल्यानंतर पहिला मोठा प्रकल्प!

Ausha Open Space Park: औसा शहरातील सारोळा रोडवरील माळवदकर यांनी केलेल्या प्लाॅटिंगमध्ये 'ओपन स्पेस'वर उद्यान कामाचा शुभारंभ प्रभारी नगराध्यक्ष डॉ. अफसर शेख यांच्या हस्ते करण्यात आले.


औशात ओपन स्पेसवर दीड कोटींचे उद्यान राष्ट्रवादी सत्तेत आल्यानंतर पहिला मोठा प्रकल्प

Ausha Open Space Park |

बी.जी. शेख 
औसा (Ausha Open Space Park) :
औसा शहरातील सारोळा रोडवरील माळवदकर यांनी केलेल्या प्लाॅटिंगमध्ये 'ओपन स्पेस'वर उद्यान कामाचा शुभारंभ प्रभारी नगराध्यक्ष डॉ. अफसर शेख यांच्या हस्ते करण्यात आले. प्रभाग क्रमांक ४ मधील हे उद्यान १ कोटी ५० लाख रुपये खर्चून नगरपालिकेच्या वतीने तयार करण्यात येणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस नगरपालिकेत सत्तेत आल्यानंतर हा पहिला मोठा प्रकल्प राबविण्यात येत आहे.

यावेळी स्थानिक नागरिकांनी अफसर शेख यांच्यासह प्रभागाचे नगरसेवक जावेद शेख, गोविंद जाधव, दुधनकर, बिलाल सिद्दीकी यांचा पुष्पहार देऊन सन्मान केला. यावेळी पत्रकार जलील पठाण, प्राध्यापक अमजद पठाण, जमीरखान पठाण आदी उपस्थित होते. शहरातील नागरिकांना दर्जेदार विरंगुळ्याची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी नगर परिषदेकडून नवीन उद्यानाच्या विकासकामाला सुरुवात करण्यात आले आहे. या कामामध्ये आकर्षक पादचारी मार्ग, लहान मुलांसाठी खेळणी, व्यायामासाठी खुली साधने, हिरवळ, योगा करण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था, वृक्षारोपण, बसण्यासाठी बाके तसेच आधुनिक प्रकाशयोजना करण्यात येणार आहे.

नगर परिषद औसा प्रशासनाने (Ausha Open Space Park) सांगितले की, शहरातील पर्यावरणाचा समतोल राखत नागरिकांना स्वच्छ, सुरक्षित आणि आनंददायी परिसर उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. काम दर्जेदार व वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित ठेकेदाराला देण्यात आल्या असून कामावर नियमित देखरेख ठेवली जाणार आहे. उद्यान पूर्ण झाल्यानंतर लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि महिला यांना फिरण्यासाठी व व्यायामासाठी उत्तम सुविधा उपलब्ध होणार असून शहराच्या सौंदर्यातही भर पडणार आहे. नागरिकांनीही विकासकामाला सहकार्य करून परिसर स्वच्छ ठेवावा व या उद्यानाचा आनंद घ्यावा, असे आवाहन यावेळी पालिकेकडून करण्यात आले आहे.

सत्तेत आल्यानंतर पहिला मोठा प्रकल्प!
औसा नगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत आल्यानंतर पहिल्यांदाच हे सर्वाधिक मोठे विकास काम होत आहे.  हद्दवाढीनंतर वाढीव वस्तीत हे काम होत असल्याने नवीन वस्तीत राहणाऱ्या नागरिकांनी समाधान व्यक्त केले. नवीन प्लॉटिंगमध्ये ज्या-ज्या ठिकाणी असे ओपन स्पेस आहेत, त्या ठिकाणी ओपन जिम व महिला, वृद्धांना फिरण्यासाठी वॉकिंग ट्रॅक बनवण्यात यावे, अशी मागणी येथील नागरिक करत आहेत. नगररचना विभागाकडून मान्य करून घेतलेल्या लेआउटनुसार शहरात ज्या-ज्या ठिकाणी असे ओपन स्पेस आहेत, ते पालिकेकडे वर्ग करून त्या ठिकाणच्या खुल्या जागेचा विकास करावा, अशी अपेक्षा येथील नागरिक बाळगून आहेत.