Breaking News
  • राजपाल यादव यांना तुरुंगवास; चेक बाऊन्स प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
  • 'मिमिक्री आर्टिस्ट' म्हणत फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला; 'भाडे के टट्टू'वरून सुरू झालेल्या वादाला विधानसभेत उत्तर
  • देशात पुन्हा कोरोनाची धास्ती! आंध्र प्रदेशात 46 वर्षीय कोरोनाबाधिताचा मृत्यू; उपचारांनंतरही प्रकृतीत सुधारणा नाही
  • तेलंगणात भात रोवणीसाठी गेलेल्या चंद्रपूरच्या मजुरांची पिकअप उलटली; 4 जणांचा जागीच मृत्यू , 27 जखमी
  • शूज कारखान्यात भीषण आग दुर्घटना; आगीत जळून 28 जणांचा मृत्यू
  • Stock Market Update : TCS च्या दमदार निकालांचा बाजाराला बूस्ट; सेन्सेक्स-निफ्टीत 1% पेक्षा अधिक उसळी
  • “…अन् चाललेत मिसिंग लिंकचा मुका घ्यायला”; जयंत पाटील यांच्या टीकेला गोपीचंद पडळकरांचे प्रत्युत्तर
  • काँगोत इबोलाचा कहर! १,७९२ बाधित, ६२५ जणांचा मृत्यू; संयुक्त राष्ट्रांकडून तातडीच्या जागतिक हस्तक्षेपाचे आवाहन
  • WhatsApp चे नवे Birthday Reminder फीचर लवकरच; मित्र-नातेवाईकांचे वाढदिवस विसरण्याची चिंता संपणार

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

कृषी सहाय्यक चतुर्भूज

लाच स्वीकारताना कृषी सहाय्यक चतुर्भूज

Agriculture Assistant Bribe: औंढा तालुक्यातील सहायक कृषी अधिकारी मोहन भगवानरावने जिल्ह्याच्या कृषी अधिकारी यांच्याकडे लाच मागितली होती. सात मस्टरवर सहीच करून त्यांना ६ हजार रुपये


लाच स्वीकारताना कृषी सहाय्यक चतुर्भूज

Agriculture Assistant Bribe |


केळी अनुदानाच्या सहा मस्टरवर स्वाक्षरीसाठी मागितली होती लाच
एक दिवसाची पोलिस कोठडी

औंढा नागनाथ (Agriculture Assistant Bribe) : केळी पिकाच्या अनुदानासाठी सहा मस्टरवर सही करून तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडे पाठवण्यासाठी प्रत्येकी १ हजार रुपयांप्रमाणे ६ हजार रुपयांची लाच मागणार्‍या कृषी सहाय्यकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. तडजोडीअंती ५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना त्याला अटक करण्यात आली. १९ जून रोजी न्यायालयात हजर केले असता एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली.

औंढा (ना.) तालुक्यातील सज्जा जलालपूर येथे कार्यरत असलेले सहायक कृषी अधिकारी मोहन भगवानराव माने (Agriculture Assistant Bribe) असे लाचखोर अधिकार्‍याचे नाव आहे. दिनांक १८ जून रोजी ही कारवाई करण्यात आली. तक्रारदाराने वडिलोपार्जित शेत जमीन गट क्रमांक २२१ दोडगाव, ता. औंढा येथे केळीची लागवड केली होती. या पिकासाठी अनुदान मिळावे म्हणून सहा मस्टरवर सही करून ते तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे पाठवण्यासाठी माने यांनी प्रत्येक मस्टरमागे १ हजार रुपये याप्रमाणे ६ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. तक्रारदाराने याबाबत अँटी करप्शन ब्युरो, हिंगोली कार्यालयाकडे तक्रार दाखल केली.

तक्रारीची शहानिशा करण्यासाठी १८ जून रोजी सापळा रचण्यात आला. पंच क्र. १ यांच्या समक्ष माने यांनी तक्रारदाराकडे लाचेची मागणी केली. तडजोडीअंती ५ हजार रुपये स्वीकारण्याचे ठरले. त्यानुसार हिंगोली-परभणी जाणार्‍या रोडवर, औंढा येथील ग्रॅज्युएट गुळाचे चहा टपरीसमोर माने यांनी ५ हजार रुपयांची लाच पंचासमक्ष स्वीकारली. त्याचवेळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने त्यांना लाचेच्या रकमेसह ताब्यात घेतले. या (Agriculture Assistant Bribe) प्रकरणी औंढा नागनाथ पोलीस स्टेशन येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

नांदेड लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक विकास घनवट, पोह. भगवान मंडलीक, गजानन पवार, पोलीस शिपाई शिवाजी वाघ, विनोद पुंडगे यांच्या पथकाने ही कारवाई यशस्वी केली.