Breaking News
  • विदर्भात गेल्या बारा दिवसांपासून पावसाचा खंड
  • Gadchiroli : जपतलाई घटनेतील दोषींवर कठोर कारवाई; ५१३ आश्रमशाळांचे थर्ड पार्टी ऑडिट
  • कुंभमेळ्यासाठी १३ प्रमुख आखाड्यांसह धार्मिक संस्थांनाही पायाभूत सुविधांसाठी १५ लाखांपर्यंत निधी मिळणार
  • दोडामार्ग पाळये गावात हत्तींचा धुमाकूळ; माड, व केळी बागा उद्ध्वस्त
  • Nashik : आदित्य ठाकरे आज नाशिक दौऱ्यावर
  • शिवप्रतिष्ठान युवाच्यावतीने दीप प्रज्वलन करून दीप अमावस्या साजरी
  • Ratnagiri : रत्नागिरीतल्या पालीत वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश
  • Ahilyanagar : कॅफेच्या नावाखाली गैरकृत्य, श्रीरामपूरमध्ये पोलिसांची 4 कॅफेवर छापेमारी
  • Nanded : झेंडूच्या फुलशेतीतून शेतकऱ्याला मिळाला आर्थिक आधार

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

आषाढी एकादशी

देवशयनी एकादशीनिमित्त नर्सीत भाविकांची मांदियाळी

Ashadhi Ekadashi: आषाढी एकादशीला नरसीत तालुक्यातील संत नामदेव महाराजांचा दरशन घेण्यासाठी हजारो भक्त आले. श्रद्धानुसार पवित्र मंदिरात हरिपाठ, कीर्टन आणि भजनाचे कार्यक्रम


देवशयनी एकादशीनिमित्त नर्सीत भाविकांची मांदियाळी 

Ashadhi Ekadashi |

 

हजारो भाविकांनी  घेतले दर्शन, दर्शन रांगेतील भाविकांना साबुदाणा खिचडी वाटप

हिंगोली (Ashadhi Ekadashi) : तालुक्यातील नर्सी नामदेव येथे देवशयनी आषाढी एकादशीनिमित्त २५ जुलै शनिवार रोजी नर्सी नामदेव येथील श्री संत शिरोमणी नामदेव महाराजांच्या मंदिरात पहाटेपासूनच भाविकांची प्रचंड गर्दी झाली होती. महाराष्ट्रासह पंजाब आणि आंध्रप्रदेशातून आलेल्या हजारो वारकऱ्यांनी नामदेव महाराजांचे दर्शन घेऊन मंदिर परिसर जय नामदेव च्या जयघोषाने दुमदुमला.

त्यानंतर सकाळी सात वाजता शिवाजी मुटकुळेव मंडळ अधिकारी सुभाष बोडखे यांच्या हस्ते महापूजा करण्यात आली. यावेळी संस्थानचे उपाध्यक्ष भिकाजी किर्तनकार, विश्वस्त मनोज आखरे, द्वारकादास सारडा, राहुल नाईक, आंबादास गाडे, रमेश मगर, उपसरपंच ज्ञानेश्वर किर्तनकार यांच्यासह भाविकांची उपस्थिती होती. त्यानंतर आमदार तान्हाजी मुटकुळे यांनी संत नामदेव महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी के. के. शिंदे, नारायण खेडेकर, माणिकराव लोडे यांच्यासह नागरीक उपस्थित होते.

एकादशीच्या निमित्ताने मंदिराला आकर्षक फुलांची आणि विद्युत रोषणाईने सजावट करण्यात आली होती. पहाटे ४ वाजल्यापासूनच भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्या. अनेक भाविकांनी उपवास करून नामदेव महाराजांच्या पादुकांचे दर्शन घेतले. मंदिरात दिवसभर हरिपाठ, कीर्तन आणि भजनाचा कार्यक्रम सुरू होता.

भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी मंदिर प्रशासन आणि स्थानिक सामाजिक संस्थांच्या वतीने विशेष व्यवस्था करण्यात आली होती. तसेच भाविकांच्या सोयीसाठी वाटरप्रुफ मंडप उभारण्यात आला होता. माणिक लोडे यांच्या वतीने मंदिर परिसरात हजारो भाविकांना  १५ हजार क्विंटल साबुदाणा खिचडीचे वाटप करण्यात आले. 

तसेच आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये डॉक्टरांच्या पथकाने भाविकांची मोफत तपासणी करून औषधोपचार दिले. भाविकांच्या चपलांच्या सुरक्षिततेसाठी मोफत चप्पल स्टॅन्डही उभारण्यात आला होता. नामदेव महाराजांची जन्मभूमी असल्याने नर्सी नामदेवला देवशयनी एकादशीला विशेष महत्त्व आहे. दिंडी, टाळ-मृदंगाच्या गजरात आणि विठ्ठलनामाच्या गजरात संपूर्ण गाव भक्तिमय झाले होते.

मंदिर समिती, पोलीस प्रशासन आणि स्वयंसेवकांनी गर्दीचे नियोजन करून शांततेत दर्शनाची व्यवस्था केली. दर्शनासाठी आलेल्या भाविकांनी नामदेव महाराज की जय" च्या जय घोषाणे मंदिर परिसर दणाणून गेला होता. भाविकांच्या गर्दीने मंदिर परिसराला यात्रेचे स्वरूप आले होते. येथे विविध साहित्य विक्रीचे स्टॉल, प्रसादालय, धार्मिक साहित्य विक्रीचे स्टॉल उभारण्यात आले होते.

Related to this topic: