Breaking News
  • राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत आज शेगाव खामगाव दौऱ्यावर
  • लोणावळा–देवले मार्गावर दरड कोसळून मोठ्या प्रमाणात माती आणि दगड रस्त्यावर
  • शाळेच्या प्रांगणात खेळताना विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू; बीडमध्ये खळबळ
  • डॉक्टरांना मारहाण प्रकरणी अटकेत असलेल्या नगरसेवक रमेश म्हात्रे यांना जामीन मंजूर
  • खामगाव ग्रामीण पोलिसांची जुगार अड्ड्यावर धाड; १३ जणांविरुद्ध गुन्हा
  • पाचगणी–महाबळेश्वर रस्त्याची दुरावस्था, खड्ड्यांमुळे रस्त्याची झाली चाळण
  • रत्नागिरी-शहरातील पटवणे फगरवठार रस्ता पुन्हा खचला
  • भंडाऱ्यात तीन वर्षीय बालिकेवरील अत्याचाराच्या घटनेने तीव्र संताप
  • एका दिवसात सोने ८०० रूपये तर चांदी तब्बल ₹ ५ हजारांनी महाग

होम > आपले शहर > विदर्भ > वाशिम

आषाढी एकादशी दिंडी उत्सव

जि. प. शाळेच्या विद्यार्थ्यांची भक्तिमय वातावरणात दिंडी!

Ashadhi Ekadashi Dindi Festival: आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त तालुक्यातील मौजे आसोला खुर्द येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेच्या वतीने दि. २५ जुलै रोजी गावातून पारंपरिक वारकरी दिंडी


जि प शाळेच्या विद्यार्थ्यांची भक्तिमय वातावरणात दिंडी  

Ashadhi Ekadashi Dindi Festival |

मानोरा (Ashadhi Ekadashi Dindi Festival) : आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त तालुक्यातील मौजे आसोला खुर्द येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेच्या वतीने दि. २५ जुलै रोजी गावातून पारंपरिक वारकरी दिंडीचे आयोजन करण्यात आले. टाळ-मृदुंगाचा निनाद, भगवे झेंडे, विठ्ठल नामाचा गजर आणि संतांच्या वेशभूषेत सजलेल्या चिमुकल्यांच्या सहभागामुळे संपूर्ण गाव भक्तिरसात न्हाऊन निघाले.  

दिंडीची सुरुवात पोलीस जिल्हा परिषद शाळेतून झाली. त्यानंतर जगदंबा माता व संत सेवालाल महाराज मंदीर, बस थांबा, हनुमान मंदिर, संत सोहमनाथ मंदीर आदी प्रमुख मार्गावरून दिंडी काढण्यात आली. दिंडीत सहभागी झालेल्या चिमुकल्यांनी विठ्ठल-रुक्मिणी, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव, संत सावता माळी आदी संतांच्या आकर्षक वेशभूषा साकारल्या होत्या. टाळ, मृदुंग, भगवे झेंडे आणि तुळशी वृंदावनासह शिस्तबद्ध पद्धतीने निघालेल्या दिंडीने वारकरी परंपरेचे सुंदर दर्शन घडविले.

या (Ashadhi Ekadashi Dindi Festival) उपक्रमातून बालकांमध्ये भारतीय संस्कृती, भक्ती, एकता, शिस्त, सामाजिक मूल्ये आणि वारकरी परंपरेचे महत्त्व रुजविण्याचा संदेश देण्यात आला. दिंडी मार्गावर मोठ्या संख्येने पालक, नागरिक आणि भाविकांनी उपस्थित राहून चिमुकल्यांचे कौतुक केले. ज्ञानबा तुकाराम, पुंडलिका दे हरी विठ्ठल अशा जयघोषासह अभंग गात चिमुकल्या मुलांनी वारकरी संप्रदायाचा संदेश दिला. याप्रसंगी संस्कार भक्ती आणि परंपरेचा संगम चिमुकल्यांच्या वेशभूषेतून दिसून येत होता.

यामुळे बालगोपाल यांच्या आषाढी दिंडी यात्रेनिमित्त गावातील वातावरण भक्तिमय झाले होते. या दिंडी उपक्रम यात्रेत मुख्याध्यापक संदीप सावळे, शिक्षिका कु. अनिता गाढवे, सहाय्यक शिक्षक शंकर भड, रामेश्वर बेहरे, सुरेश चव्हाण, कु. सुनीता सरनाईक, कु. सपना सरनाईक, पदवीधर शिक्षक सुरेश मांजरे, दिलीप भोपळे आदीसह पालक वर्ग सहभागी झाले होते.