Breaking News
  • विदर्भात गेल्या बारा दिवसांपासून पावसाचा खंड
  • Gadchiroli : जपतलाई घटनेतील दोषींवर कठोर कारवाई; ५१३ आश्रमशाळांचे थर्ड पार्टी ऑडिट
  • कुंभमेळ्यासाठी १३ प्रमुख आखाड्यांसह धार्मिक संस्थांनाही पायाभूत सुविधांसाठी १५ लाखांपर्यंत निधी मिळणार
  • दोडामार्ग पाळये गावात हत्तींचा धुमाकूळ; माड, व केळी बागा उद्ध्वस्त
  • Nashik : आदित्य ठाकरे आज नाशिक दौऱ्यावर
  • शिवप्रतिष्ठान युवाच्यावतीने दीप प्रज्वलन करून दीप अमावस्या साजरी
  • Ratnagiri : रत्नागिरीतल्या पालीत वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश
  • Ahilyanagar : कॅफेच्या नावाखाली गैरकृत्य, श्रीरामपूरमध्ये पोलिसांची 4 कॅफेवर छापेमारी
  • Nanded : झेंडूच्या फुलशेतीतून शेतकऱ्याला मिळाला आर्थिक आधार

होम > आपले शहर > विदर्भ > वाशिम

आषाढी एकादशी सोहळा

​पी. एम. पब्लिक स्कूलमध्ये आषाढी एकादशीनिमित्त भव्य पालखी सोहळा उत्साहात

Ashadhi Ekadashi Celebration: द्यार्थ्यांमध्ये भक्ती, संस्कार व भारतीय सांस्कृतिक परंपरेची जपणूक व्हावी या उद्देशाने पी. एम. पब्लिक स्कूल, रिसोड तालुक्यातील आगरवाडी येथे आषाढी एकादशी


​पी एम पब्लिक स्कूलमध्ये आषाढी एकादशीनिमित्त भव्य पालखी सोहळा उत्साहात

Ashadhi Ekadashi Celebration |

रिसोड (Ashadhi Ekadashi Celebration) : विद्यार्थ्यांमध्ये भक्ती, संस्कार व भारतीय सांस्कृतिक परंपरेची जपणूक व्हावी या उद्देशाने पी. एम. पब्लिक स्कूल, रिसोड तालुक्यातील आगरवाडी येथे आषाढी एकादशीच्या पावन निमित्ताने भव्य पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

​या (Ashadhi Ekadashi Celebration) कार्यक्रमाची सुरुवात श्री विठ्ठल-रुक्मिणी यांच्या प्रतिमेचे पूजन करून झाली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी टाळ-मृदंगाच्या गजरात, "ज्ञानोबा-तुकाराम" व "पांडुरंग हरी"च्या जयघोषात पालखीची दिंडी मिरवणूक काढली. वारकरी वेशभूषा परिधान केलेल्या विद्यार्थ्यांनी अभंग, भजन व हरिनाम संकीर्तन सादर करून संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून टाकला.

​या उपक्रमातून विद्यार्थ्यांना संत परंपरा, वारकरी संप्रदाय, एकात्मता, शिस्त आणि संस्कार यांचे महत्त्व पटवून देण्यात आले. उपस्थीत पालक व नागरिकांनी या नयनरम्य सोहळ्याचे आणि विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाचे मनापासून कौतुक केले. ​शाळेचे संचालक हरिदास काकडे, मुख्याध्यापक, तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या उत्तम नियोजनाखाली आणि मार्गदर्शनाखाली हा सोहळा अत्यंत उत्साहपूर्ण व भक्तिमय वातावरणात यशस्वीरीत्या संपन्न झाला.

Related to this topic: