Breaking News
  • राजपाल यादव यांना तुरुंगवास; चेक बाऊन्स प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
  • 'मिमिक्री आर्टिस्ट' म्हणत फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला; 'भाडे के टट्टू'वरून सुरू झालेल्या वादाला विधानसभेत उत्तर
  • देशात पुन्हा कोरोनाची धास्ती! आंध्र प्रदेशात 46 वर्षीय कोरोनाबाधिताचा मृत्यू; उपचारांनंतरही प्रकृतीत सुधारणा नाही
  • तेलंगणात भात रोवणीसाठी गेलेल्या चंद्रपूरच्या मजुरांची पिकअप उलटली; 4 जणांचा जागीच मृत्यू , 27 जखमी
  • शूज कारखान्यात भीषण आग दुर्घटना; आगीत जळून 28 जणांचा मृत्यू
  • Stock Market Update : TCS च्या दमदार निकालांचा बाजाराला बूस्ट; सेन्सेक्स-निफ्टीत 1% पेक्षा अधिक उसळी
  • “…अन् चाललेत मिसिंग लिंकचा मुका घ्यायला”; जयंत पाटील यांच्या टीकेला गोपीचंद पडळकरांचे प्रत्युत्तर
  • काँगोत इबोलाचा कहर! १,७९२ बाधित, ६२५ जणांचा मृत्यू; संयुक्त राष्ट्रांकडून तातडीच्या जागतिक हस्तक्षेपाचे आवाहन
  • WhatsApp चे नवे Birthday Reminder फीचर लवकरच; मित्र-नातेवाईकांचे वाढदिवस विसरण्याची चिंता संपणार

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

Archaeological Discovery

वसमतच्या मोठ्या तलावाच्या खोदकामात पुरातन शिवलिंग व गणेशमूर्ती सापडली; पुरातत्त्व विभागाच्या पाहणीची मागणी

वसमत येथील मोठ्या तलावाच्या खोलीकरणाच्या कामादरम्यान पुरातन शिवलिंग आणि गणेशाची मूर्ती आढळून आली आहे.


वसमतच्या मोठ्या तलावाच्या खोदकामात पुरातन शिवलिंग व गणेशमूर्ती सापडली पुरातत्त्व विभागाच्या पाहणीची मागणी

Archaeological Discovery |

वसमत (Archaeological Discovery) : वसमत येथील मोठ्या तलावाच्या खोलीकरणाच्या कामादरम्यान पुरातन शिवलिंग आणि गणेशाची मूर्ती आढळून आली आहे. या शोधामुळे परिसरातील ऐतिहासिक वारशाबाबत नव्याने चर्चा सुरू झाली असून, या ठिकाणाची पुरातत्त्व विभागामार्फत सखोल पाहणी करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

वसमत शहराला प्राचीन ऐतिहासिक वारसा लाभला आहे. यापूर्वीही मोठ्या तलावाच्या खोदकामावेळी चिरेबंदी बांधकाम असलेला सांडवा आढळून आला होता. त्यावेळी या संदर्भात विविध अफवा पसरल्या होत्या.

सध्या मोठ्या तलावाचे खोलीकरण व सुशोभीकरणाचे काम सुरू असून, यासाठी आमदार राजू पाटील नवघरे यांनी अडीच कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. या निधीतून युद्धपातळीवर तलावाच्या खोदकामासह सुशोभीकरणाची कामे सुरू आहेत.

याच खोदकामादरम्यान पुरातन शिवलिंग आणि गणेशाची मूर्ती सापडल्याने या परिसरात पूर्वी एखादे प्राचीन मंदिर असावे, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळे या संपूर्ण परिसराचे पुरातत्त्वदृष्ट्या सर्वेक्षण करून वस्तुस्थिती समोर आणावी, अशी मागणी स्थानिकांकडून केली जात आहे.

Related to this topic: