Breaking News
  • विदर्भात गेल्या बारा दिवसांपासून पावसाचा खंड
  • Gadchiroli : जपतलाई घटनेतील दोषींवर कठोर कारवाई; ५१३ आश्रमशाळांचे थर्ड पार्टी ऑडिट
  • कुंभमेळ्यासाठी १३ प्रमुख आखाड्यांसह धार्मिक संस्थांनाही पायाभूत सुविधांसाठी १५ लाखांपर्यंत निधी मिळणार
  • दोडामार्ग पाळये गावात हत्तींचा धुमाकूळ; माड, व केळी बागा उद्ध्वस्त
  • Nashik : आदित्य ठाकरे आज नाशिक दौऱ्यावर
  • शिवप्रतिष्ठान युवाच्यावतीने दीप प्रज्वलन करून दीप अमावस्या साजरी
  • Ratnagiri : रत्नागिरीतल्या पालीत वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश
  • Ahilyanagar : कॅफेच्या नावाखाली गैरकृत्य, श्रीरामपूरमध्ये पोलिसांची 4 कॅफेवर छापेमारी
  • Nanded : झेंडूच्या फुलशेतीतून शेतकऱ्याला मिळाला आर्थिक आधार

होम > आपले शहर > उत्त्तर महाराष्ट्र > जळगाव

Anjani Dam

अंजनी धरणातून ५५०० क्युसेक्स पाण्याचा नियंत्रित विसर्ग; नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहावे – पालकमंत्री गुलाबराव पाटील

जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अंजनी मध्यम प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक वाढली असून धरणातील जलपातळी झपाट्याने वाढत आहे.


अंजनी धरणातून ५५०० क्युसेक्स पाण्याचा नियंत्रित विसर्ग नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहावे – पालकमंत्री गुलाबराव पाटील

Anjani Dam |

मुसळधार पावसामुळे धरणातील पाणीसाठ्यात वाढ; प्रशासनाला सतर्कतेचे निर्देश, नदीपात्रात न जाण्याचे आवाहन

जळगाव : जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अंजनी मध्यम प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक वाढली असून धरणातील जलपातळी झपाट्याने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या निर्देशानुसार अंजनी धरणातून सुमारे ५५०० क्युसेक्स पाण्याचा नियंत्रित विसर्ग नदीपात्रात सुरू करण्यात आला आहे.

या पार्श्वभूमीवर पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी नदीकाठच्या गावांतील नागरिक, शेतकरी आणि ग्रामस्थांनी अत्यंत सतर्कता बाळगावी, कोणत्याही परिस्थितीत नदीपात्रात उतरू नये तसेच पूरस्थितीचा अंदाज घेण्यासाठी नदीकाठावर गर्दी करू नये, असे कळकळीचे आवाहन केले आहे. जीवितहानी टाळण्यासाठी प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असेही त्यांनी म्हटले आहे.

नदीकाठावरील नागरिकांनी आपल्या गुरेढोरे, पशुधन, शेतीमधील मोटारपंप, कृषी अवजारे तसेच इतर मौल्यवान साहित्य सुरक्षित ठिकाणी हलवावे. आवश्यक असल्यास तात्काळ स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.

याशिवाय नदीपात्रालगत विविध विभागांची सुरू असलेली बांधकामे, यंत्रसामग्री आणि साहित्य तातडीने सुरक्षित स्थळी हलविण्याच्या सूचना संबंधित विभागांना देण्यात आल्या आहेत. सर्व शासकीय यंत्रणांनी सतर्क राहून परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवावे, असे निर्देश पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले आहेत.

दरम्यान, धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील पावसाची तीव्रता आणि पाण्याची आवक लक्षात घेऊन आवश्यकतेनुसार पाण्याच्या विसर्गात वाढ किंवा घट करण्यात येईल, अशी माहिती गिरणा पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता विनोद पाटील यांनी दिली.

Related to this topic: