Breaking News
  • राजपाल यादव यांना तुरुंगवास; चेक बाऊन्स प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
  • 'मिमिक्री आर्टिस्ट' म्हणत फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला; 'भाडे के टट्टू'वरून सुरू झालेल्या वादाला विधानसभेत उत्तर
  • देशात पुन्हा कोरोनाची धास्ती! आंध्र प्रदेशात 46 वर्षीय कोरोनाबाधिताचा मृत्यू; उपचारांनंतरही प्रकृतीत सुधारणा नाही
  • तेलंगणात भात रोवणीसाठी गेलेल्या चंद्रपूरच्या मजुरांची पिकअप उलटली; 4 जणांचा जागीच मृत्यू , 27 जखमी
  • शूज कारखान्यात भीषण आग दुर्घटना; आगीत जळून 28 जणांचा मृत्यू
  • Stock Market Update : TCS च्या दमदार निकालांचा बाजाराला बूस्ट; सेन्सेक्स-निफ्टीत 1% पेक्षा अधिक उसळी
  • “…अन् चाललेत मिसिंग लिंकचा मुका घ्यायला”; जयंत पाटील यांच्या टीकेला गोपीचंद पडळकरांचे प्रत्युत्तर
  • काँगोत इबोलाचा कहर! १,७९२ बाधित, ६२५ जणांचा मृत्यू; संयुक्त राष्ट्रांकडून तातडीच्या जागतिक हस्तक्षेपाचे आवाहन
  • WhatsApp चे नवे Birthday Reminder फीचर लवकरच; मित्र-नातेवाईकांचे वाढदिवस विसरण्याची चिंता संपणार

होम > आपले शहर > विदर्भ > अमरावती

अमरावती अवैध शस्त्र

तडीपार सराईत गुन्हेगाराकडून देशी कट्टा व जिवंत काडतुसे जप्त

Amravati Illegal Weapons: अमरावती शहरात गुन्हे शाखेच्या कारवाऱ्यामुळे अवैध कट्टा (पिस्टल) व जिवंत काडतेसह एका गुन्हेगारावर दबदबा पडला. तडीपार करण्यात आलेल्या आरोपीलाचं शस्त्र जप्त


तडीपार सराईत गुन्हेगाराकडून देशी कट्टा व जिवंत काडतुसे जप्त

Amravati Illegal Weapons |

 

अमरावती शहर गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई; शस्त्र तस्कराचा शोध सुरू

अमरावती (Amravati Illegal Weapons) : अमरावती शहरात अवैध शस्त्र बाळगून दहशत निर्माण करणाऱ्यांविरोधात गुन्हे शाखेने विशेष मोहीम राबवत मोठी कारवाई केली आहे. नागपुरी गेट पोलीस ठाण्याच्या हद्दीतून तडीपार करण्यात आलेल्या एका सराईत आरोपीला ताब्यात घेऊन त्याच्याकडून देशी बनावटीचा कट्टा (पिस्टल) आणि दोन जिवंत काडतुसे असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.पोलीस आयुक्त राकेश ओला यांनी अवैध शस्त्रे बाळगणाऱ्या इसमांवर प्रभावी कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पोलीस निरीक्षक दिनेश दहातोंडेव अतुल वर व यांच्या नेतृत्वाखाली पथकाने कारवाई केली.

दि. १६ जून २०२६ रोजी गुन्हे शाखेच्या पथकाला गुप्त (Amravati Illegal Weapons) माहिती मिळाली की, नागपुरी गेट पोलीस ठाण्याच्या हद्दीतून तडीपार असलेला अहेसान खान हसन खान (वय २५, रा. गुलीस्ता नगर, अमरावती) हा स्वतःजवळ देशी कट्टा बाळगून फ्रेजरपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील परिहारपुरा-वडाळी पुलाकडून आशियाना क्लबकडे येत आहे. माहितीच्या आधारे गुन्हे शाखेच्या पथकाने आशियाना क्लब परिसरात सापळा रचून अहेसान खान याला शिताफीने ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता कमरेला एक देशी बनावटीचा कट्टा व दोन जिवंत काडतुसे आढळून आली. पोलिसांनी तत्काळ शस्त्र जप्त केले.

चौकशीत आरोपीने सदर कट्टा हा रेहान खान अयुब खान उर्फ रेहान बंदुक (रा. पाटीपुरा, सुलतानच्या पानठेल्याजवळ, अमरावती) याच्याकडून घेतल्याचे सांगितले. याप्रकरणी रेहान खान हा फरार असून त्याचा शोध सुरू आहे.

तडीपार आरोपी अहेसान खान हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर अमरावती शहर पोलीस आयुक्तालयात यापूर्वी गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. त्याला अमरावती शहर व ग्रामीण हद्दीतून दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले होते. मात्र वरिष्ठांची परवानगी न घेता शहरात येऊन अग्निशस्त्र बाळगल्याने त्याच्याविरुद्ध फ्रेजरपुरा पोलीस ठाण्यात आर्म्स ॲक्टसह महाराष्ट्र पोलीस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी  देशी कट्टा (पिस्टल) अंदाजे किंमत ३५ हजार रुपये,दोन जिवंत काडतुसे अंदाजे किंमत २ हजार रुपये ३७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

ही (Amravati Illegal Weapons) कारवाई पोलीस आयुक्त, राकेश ओला, पोलीस उपआयुक्त यशवंत सोळंके सा. (परिमंडळ ०१), रमेश धुमाळ,पोलीस उपाआयुक्त (मुख्यालय), मा. सहायक पोलीस आयुक्त, (गुन्हे विभाग)  शिवाजी बचाटे, तसेच मा, सहायक पोलीस आयुक्त, (गाडगेनगर विभाग) कैलाश फुंडकर सा, यांचे मार्गदर्शनाखाली पो, नि, दिनेश दहातोंडे, पो, नि, अतुल वर यंच्यासह सपोनि मनीष वाकोडे, सपोनि दशरथ आडे, सपोनि महेश इंगोले, पो. उपनि, गजानन सोनुने, सहा, पोउपनि फिरोज खान, पोह्या सतीष देशमुख, पोहवा मंगेश लोखंडे, पो. हे. कॉ. संभाजी केन्द्रे, पो.हे. कॉ. नाझीमउददीन सैयद, पो.ना सचिन भोयर, पोलीस अमलदार रंजित गावंडे, सुरज चव्हाण, निखील गेडाम, सागर ठाकरे चालक चेतन शर्मा, शांतनु बारोटकर, गुन्हे शाखा, अमरावती शहर यांनी तसेच पो. स्टे. सायबर येथील स.पो.नि. अनिकेत कासार, पो. शि चेतन गुल्हाने यांचा समावेश होता.

Related to this topic: