Breaking News
  • राजपाल यादव यांना तुरुंगवास; चेक बाऊन्स प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
  • 'मिमिक्री आर्टिस्ट' म्हणत फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला; 'भाडे के टट्टू'वरून सुरू झालेल्या वादाला विधानसभेत उत्तर
  • देशात पुन्हा कोरोनाची धास्ती! आंध्र प्रदेशात 46 वर्षीय कोरोनाबाधिताचा मृत्यू; उपचारांनंतरही प्रकृतीत सुधारणा नाही
  • तेलंगणात भात रोवणीसाठी गेलेल्या चंद्रपूरच्या मजुरांची पिकअप उलटली; 4 जणांचा जागीच मृत्यू , 27 जखमी
  • शूज कारखान्यात भीषण आग दुर्घटना; आगीत जळून 28 जणांचा मृत्यू
  • Stock Market Update : TCS च्या दमदार निकालांचा बाजाराला बूस्ट; सेन्सेक्स-निफ्टीत 1% पेक्षा अधिक उसळी
  • “…अन् चाललेत मिसिंग लिंकचा मुका घ्यायला”; जयंत पाटील यांच्या टीकेला गोपीचंद पडळकरांचे प्रत्युत्तर
  • काँगोत इबोलाचा कहर! १,७९२ बाधित, ६२५ जणांचा मृत्यू; संयुक्त राष्ट्रांकडून तातडीच्या जागतिक हस्तक्षेपाचे आवाहन
  • WhatsApp चे नवे Birthday Reminder फीचर लवकरच; मित्र-नातेवाईकांचे वाढदिवस विसरण्याची चिंता संपणार

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

पंढरपूर रिंगण सोहळा

पंढरपूर येथील रिंगण सोहळ्यासाठी अमरावतीच्या 45 सायकल स्वारांचे हिंगोलीत स्वागत

Pandharpur Ringan Ceremony: अमरावती सायकल असोसिएशनचे 45 सायकलचालक हिंगोलीच्या स्वागतासाठी गेले आणि एक हॉटेलमध्ये भोजनाचे कार्यक्रम आयोजित केले गेले.


पंढरपूर येथील रिंगण सोहळ्यासाठी अमरावतीच्या 45 सायकल स्वारांचे हिंगोलीत स्वागत 

Pandharpur Ringan Ceremony |

 

हिंगोली सायकल असोसिएशनचा पुढाकार 

हिंगोली (Pandharpur Ringan Ceremony) : अमरावती  सायकलिंग स्वारांचे हिंगोली मार्गे पंढरपूरकडे बुधवारी मार्गस्थ होताना अकोला बायपास परिसरात हिंगोली सायकलिंग असोशियशनच्या पुढाकारातून  जोरदार स्वागत करण्यात आले. या स्वागताने सायकल स्वार भरावून गेले.

मागील चार वर्षापासून राज्यातील सायकल स्वार पंढरपूर येथील  ऐतिहासिक रिंगण सोहळ्यात सहभागी होतात. त्यानुसार आज अमरावती सायकलिंग असोसिएशन चे 45 सायकल स्वार हिंगोली येथे दाखल होताच त्यांचे स्वागत करून येथील एका हॉटेल मध्ये त्यांच्या  भोजनाची व्यवस्था हिंगोली सायकल असोसिएशन तर्फे करण्यात आली. या केलेल्या व्यवस्थेमुळे अमरावतीकर अक्षरशः भारावून गेले. सर्वांचे हॉटेल समोर आगमन होताच पुष्प गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. हॉटेल समोर आकर्षक रेखाटलेल्या रांगोळ्या अन फुलांची पुष्पवृष्टी पाहून सायकल स्वार भरावले होते.त्यातच पावसाची रिमझिम यात सायकल स्वाराना  नाचण्याचा मोह आवरला नाही. यावेळी अमरावती सायकल स्वारांना सीड बॉल वाटप करण्यात आले. जाताना प्रत्येक ठिकाणी बियाणे लावून पुढे जायचे यामुळे पर्यवरणाचा ऱ्हास होणार नाही, पर्यवरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपण महत्वाचे असल्याने हिंगोली करानी दिलेले सीड बॉल आम्ही जाताना टाकत जाणार असल्याचे चंद्रशेखर कुलकर्णी यांनी सांगितले.

दरम्यान, गुरुवारी हिंगोली अशोसीएशनचे तेरा सायकल स्वार सकाळी सहा वाजता पंढरपूरकडे रवाना होणार आहेत. जवळपास हिंगोली ते पंढरपूर  350 किलोमीटर अंतर असून केवळ तीन ठिकाणी मुकाम करणार आहेत. 12 जुलै रोजी पंढरपूर येथे राज्यभरातील चार हजार सायकल पट्टू येणार असून भव्य दिव्य असा ऐतिहासिक रिंगण सोहळा पार पडणार असून पंढरपूर शहरातून त्याच दिवशी प्रभात फेरी काढणार असल्याचे हिंगोली सायकलिंग असोशिएशनचे जिल्हाध्यक्ष प्रवीण काळबांडे यांनी सांगितले.

यावेळी अमरावती येथील अनुज कळमकर, लक्ष्मीकांत खंडागळे, सुषमा जोशी, प्रवीण खांड पासोळे यांच्यासह धुळे ते अमरावती आणि पंढरपूर यात्रेसाठी गणेश बोरोकर, माधुरी बोरोकर हे दोघेही सहभागी झाले आहेत. 

यावेळी हिंगोली सायकलिंग असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष प्रविण काळबांडे,  रमेश सानप, डॉ.गजानन शिंदे, लक्ष्मण राठोड,  मारुती बोबडे, विठ्ठल जाधव, गजानन घुगे, राजेश पांडे, गोविंद शिंदे, शिवशरण ठाकूर, ज्ञानेश्वर पुंजारे,अविनाश डुकरे, विवेक वाकडे, अभय कुमार भरतीया, श्रीरंग कऱ्हाळे आदिनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.