Breaking News
  • राजपाल यादव यांना तुरुंगवास; चेक बाऊन्स प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
  • 'मिमिक्री आर्टिस्ट' म्हणत फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला; 'भाडे के टट्टू'वरून सुरू झालेल्या वादाला विधानसभेत उत्तर
  • देशात पुन्हा कोरोनाची धास्ती! आंध्र प्रदेशात 46 वर्षीय कोरोनाबाधिताचा मृत्यू; उपचारांनंतरही प्रकृतीत सुधारणा नाही
  • तेलंगणात भात रोवणीसाठी गेलेल्या चंद्रपूरच्या मजुरांची पिकअप उलटली; 4 जणांचा जागीच मृत्यू , 27 जखमी
  • शूज कारखान्यात भीषण आग दुर्घटना; आगीत जळून 28 जणांचा मृत्यू
  • Stock Market Update : TCS च्या दमदार निकालांचा बाजाराला बूस्ट; सेन्सेक्स-निफ्टीत 1% पेक्षा अधिक उसळी
  • “…अन् चाललेत मिसिंग लिंकचा मुका घ्यायला”; जयंत पाटील यांच्या टीकेला गोपीचंद पडळकरांचे प्रत्युत्तर
  • काँगोत इबोलाचा कहर! १,७९२ बाधित, ६२५ जणांचा मृत्यू; संयुक्त राष्ट्रांकडून तातडीच्या जागतिक हस्तक्षेपाचे आवाहन
  • WhatsApp चे नवे Birthday Reminder फीचर लवकरच; मित्र-नातेवाईकांचे वाढदिवस विसरण्याची चिंता संपणार

होम > आपले शहर > मराठवाडा > लातूर

पत्नीला औताला जुंपणाऱ्या वृद्ध शेतकऱ्याच्या मदतीला अक्का फाऊंडेशन; २० हजारांची रोख मदत

घटनेचे वृत्त देशोन्नती डिजिटलमध्ये प्रसिद्ध होताच सामाजिक संस्था आणि प्रशासनाने तात्काळ दखल घेत मदतीचा हात पुढे केला आहे.


पत्नीला औताला जुंपणाऱ्या वृद्ध शेतकऱ्याच्या मदतीला अक्का फाऊंडेशन २० हजारांची रोख मदत

Akka Foundation |

महसूल विभागाकडूनही ३२ हजारांचे आर्थिक सहाय्य

देवणी (Akka Foundation) : देवणी तालुक्यातील बोंबळी येथील वृद्ध शेतकरी काशिनाथ गायकवाड यांचा एक बैल वीज कोसळल्याने मृत्युमुखी पडल्यामुळे शेती मशागतीसाठी त्यांनी आपल्या पत्नीच्या खांद्यावर जू देत औत चालविल्याची हृदयद्रावक घटना समोर आली होती. या घटनेचे वृत्त देशोन्नती डिजिटलमध्ये प्रसिद्ध होताच सामाजिक संस्था आणि प्रशासनाने तात्काळ दखल घेत मदतीचा हात पुढे केला आहे.

गेल्या आठवड्यात काशिनाथ गायकवाड यांच्या बैलजोडीवर वीज कोसळून एका बैलाचा मृत्यू झाला. आधीच भूमिहीन असलेल्या या शेतकऱ्याचा उदरनिर्वाह गावातील शेतकऱ्यांची शेती कसण्यावर अवलंबून आहे. मात्र बैल गमावल्यामुळे त्यांच्या समोर शेती मशागतीचे मोठे संकट उभे राहिले होते.

एका बैलावर औत चालविणे शक्य नसल्याने काशिनाथ गायकवाड यांनी आपल्या वृद्ध पत्नीला औताला जुंपून शेतीची मशागत सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला होता. या घटनेचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर अक्का फाऊंडेशन, निलंगा शेतकरी कुटुंबाच्या मदतीसाठी पुढे आले.

विशेष म्हणजे जवळगा मंडळाचे जिल्हा परिषद सदस्य रामलिंग शेरे यांनी आमदार संभाजी पाटील निलंगेकर आणि युवा नेते अरविंद पाटील निलंगेकर यांच्या माध्यमातून प्रशासनाशी पाठपुरावा केला. त्यानंतर तहसील प्रशासनामार्फत ३२ हजार रुपयांची आर्थिक मदत काशिनाथ गायकवाड यांना उपलब्ध करून देण्यात आली.

तसेच सामाजिक बांधिलकी जपत अक्का फाऊंडेशनच्या वतीने शेतकऱ्याच्या शेतावर जाऊन २० हजार रुपयांची रोख मदत करण्यात आली. या मदतीमुळे संकटात सापडलेल्या शेतकरी कुटुंबाला मोठा दिलासा मिळाला आहे.

यावेळी तहसीलदार सोमनाथ वाडकर, जिल्हा परिषद सदस्य रामलिंग शेरे, तलाठी तसेच सुधीर भोसले, माऊली शिंदे, तानाजी कारभारी, व्यंकट कारभारी, विठ्ठल बोयाने, अभंग सूर्यवंशी, राम गायकवाड, उत्तम गायकवाड, बजरंग पाटील, प्रकाश शिंदे, संतोष पाटील, धनाजी येचे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संकटाच्या काळात प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि सामाजिक संस्थांनी दिलेला मदतीचा हात हा काशिनाथ गायकवाड यांच्यासाठी नव्या आशेचा किरण ठरला आहे.

Related to this topic: