Breaking News
  • राजपाल यादव यांना तुरुंगवास; चेक बाऊन्स प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
  • 'मिमिक्री आर्टिस्ट' म्हणत फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला; 'भाडे के टट्टू'वरून सुरू झालेल्या वादाला विधानसभेत उत्तर
  • देशात पुन्हा कोरोनाची धास्ती! आंध्र प्रदेशात 46 वर्षीय कोरोनाबाधिताचा मृत्यू; उपचारांनंतरही प्रकृतीत सुधारणा नाही
  • तेलंगणात भात रोवणीसाठी गेलेल्या चंद्रपूरच्या मजुरांची पिकअप उलटली; 4 जणांचा जागीच मृत्यू , 27 जखमी
  • शूज कारखान्यात भीषण आग दुर्घटना; आगीत जळून 28 जणांचा मृत्यू
  • Stock Market Update : TCS च्या दमदार निकालांचा बाजाराला बूस्ट; सेन्सेक्स-निफ्टीत 1% पेक्षा अधिक उसळी
  • “…अन् चाललेत मिसिंग लिंकचा मुका घ्यायला”; जयंत पाटील यांच्या टीकेला गोपीचंद पडळकरांचे प्रत्युत्तर
  • काँगोत इबोलाचा कहर! १,७९२ बाधित, ६२५ जणांचा मृत्यू; संयुक्त राष्ट्रांकडून तातडीच्या जागतिक हस्तक्षेपाचे आवाहन
  • WhatsApp चे नवे Birthday Reminder फीचर लवकरच; मित्र-नातेवाईकांचे वाढदिवस विसरण्याची चिंता संपणार

होम > आपले शहर > उत्त्तर महाराष्ट्र > जळगाव

ACB Raid

लाचखोरी प्रकरणात मोठा खुलासा; अकोल्याच्या मुद्रांक जिल्हाधिकाऱ्याच्या घरातून तब्बल ३ कोटींचे घबाड जप्त

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) मोठी कारवाई करत कोट्यवधी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.


लाचखोरी प्रकरणात मोठा खुलासा अकोल्याच्या मुद्रांक जिल्हाधिकाऱ्याच्या घरातून तब्बल ३ कोटींचे घबाड जप्त

ACB Raid |

ACB च्या २४ तासांच्या छापेमारीत रोख रक्कम, सोने, कागदपत्रे जप्त; नाशिक-जळगाव संयुक्त पथकाची कारवाई

जळगाव (ACB Raid) : लाचखोरीच्या गंभीर प्रकरणात अडकलेले अकोल्याचे मुद्रांक जिल्हाधिकारी किरण चौधरी यांच्या जळगाव येथील निवासस्थानी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) मोठी कारवाई करत कोट्यवधी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तब्बल २४ तास चाललेल्या शोधमोहिमेत सुमारे २ कोटी ९४ लाख ६४ हजार ८४७ रुपयांचे रोख, सोने आणि मालमत्तेशी संबंधित कागदपत्रे हाती लागली आहेत.

नाशिक आणि जळगाव एसीबीच्या संयुक्त पथकाने 'इन कॅमेरा' पद्धतीने ही संपूर्ण झडती घेतली. या कारवाईमुळे महसूल आणि पोलीस वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. याआधी २७ जून रोजी चौधरी यांच्या चुलत्याने सील केलेल्या घराचे कुलूप तोडून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी त्यांना रंगेहाथ अटक करण्यात आली होती.

यानंतर २ जुलै रोजी किरण चौधरी यांच्या पत्नी मनीषा चौधरी, नातेवाईक, दोन शासकीय पंच, बँक कॅशियर आणि सोनार यांच्या उपस्थितीत सील उघडून पुन्हा तपासणी करण्यात आली.

या छापेमारीत मोठ्या प्रमाणात रोख रक्कम सापडली असून त्यामध्ये १ कोटी ५३ लाख ८४ हजार ६३० रुपये विविध नोटांच्या स्वरूपात जप्त करण्यात आले. तसेच ६० लाख ५७ हजार १३५ रुपये किमतीचे ४२२ ग्रॅम सोने, ज्यामध्ये १६० ग्रॅम वजनाची दोन सोन्याची बिस्किटे समाविष्ट आहेत, जप्त करण्यात आले. याशिवाय ११ लाख ५२ हजार ७४५ रुपयांच्या सोने खरेदीच्या पावत्या, ३१ हजार ४१६ रुपयांची १५४ ग्रॅम चांदी, ६२ लाख १३ हजार ३७६ रुपयांची मालमत्तेची कागदपत्रे आणि ६ लाख २५ हजार ५४५ रुपयांचे घरगुती साहित्यही हस्तगत करण्यात आले आहे.

अकोल्यातील सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात किरण चौधरी यांच्याविरोधात आधीच गुन्हा दाखल आहे. २५ जून रोजी एसीबीने त्यांच्या घराची तपासणी करण्याचा प्रयत्न केला असता घर बंद असल्याने ते सील करण्यात आले होते. त्यानंतर नातेवाईकांनी सील तोडून आत प्रवेश करून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याने प्रकरण अधिक गंभीर झाले.

अखेर या सखोल तपासणीत कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार उघड झाल्याने संपूर्ण प्रशासनात मोठी खळबळ निर्माण झाली असून पुढील तपास एसीबीकडून सुरू आहे.