Breaking News
  • राजपाल यादव यांना तुरुंगवास; चेक बाऊन्स प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
  • 'मिमिक्री आर्टिस्ट' म्हणत फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला; 'भाडे के टट्टू'वरून सुरू झालेल्या वादाला विधानसभेत उत्तर
  • देशात पुन्हा कोरोनाची धास्ती! आंध्र प्रदेशात 46 वर्षीय कोरोनाबाधिताचा मृत्यू; उपचारांनंतरही प्रकृतीत सुधारणा नाही
  • तेलंगणात भात रोवणीसाठी गेलेल्या चंद्रपूरच्या मजुरांची पिकअप उलटली; 4 जणांचा जागीच मृत्यू , 27 जखमी
  • शूज कारखान्यात भीषण आग दुर्घटना; आगीत जळून 28 जणांचा मृत्यू
  • Stock Market Update : TCS च्या दमदार निकालांचा बाजाराला बूस्ट; सेन्सेक्स-निफ्टीत 1% पेक्षा अधिक उसळी
  • “…अन् चाललेत मिसिंग लिंकचा मुका घ्यायला”; जयंत पाटील यांच्या टीकेला गोपीचंद पडळकरांचे प्रत्युत्तर
  • काँगोत इबोलाचा कहर! १,७९२ बाधित, ६२५ जणांचा मृत्यू; संयुक्त राष्ट्रांकडून तातडीच्या जागतिक हस्तक्षेपाचे आवाहन
  • WhatsApp चे नवे Birthday Reminder फीचर लवकरच; मित्र-नातेवाईकांचे वाढदिवस विसरण्याची चिंता संपणार

होम > आपले शहर

६४ वर्षीय ‘इंटर्न’ची स्टार्टअपमध्ये एंट्री; अनुभवाच्या बळावर सोशल मीडियावर चर्चेचा विषय

मुंबईतील एका स्टार्टअप संस्थापकाने आपल्या कंपनीत ६४ वर्षीय इंटर्नची नियुक्ती केल्याची माहिती सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर हा विषय चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे.


६४ वर्षीय ‘इंटर्न’ची स्टार्टअपमध्ये एंट्री अनुभवाच्या बळावर सोशल मीडियावर चर्चेचा विषय

64-Year-Old Intern |

मुंबईतील स्टार्टअप संस्थापकाचा व्हिडिओ व्हायरल; वय, अनुभव आणि कार्यसंस्कृतीबाबत नवी चर्चा

मुंबई : मुंबईतील एका स्टार्टअप संस्थापकाने आपल्या कंपनीत ६४ वर्षीय इंटर्नची नियुक्ती केल्याची माहिती सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर हा विषय चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे. या अनोख्या निर्णयामुळे वय, अनुभव आणि कार्यस्थळावरील योगदान याबाबत व्यापक चर्चा सुरू झाली आहे.

हा व्हिडिओ स्टार्टअपचे संस्थापक जोशुआ सॅलिन्स यांनी इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. व्हिडिओमध्ये ६४ वर्षीय इंटर्न कार्यालयातील तरुण कर्मचाऱ्यांशी संवाद साधताना दिसत आहेत. त्यांचे अनुभवपूर्ण मार्गदर्शन कर्मचारी लक्षपूर्वक ऐकत असल्याचेही यात पाहायला मिळते.

व्हिडिओवरील मजकुरात लिहिले आहे, “तुमच्या स्टार्टअपमध्ये ६४ वर्षीय इंटर्न असणे म्हणजे अमूल्य अनुभवाची शिदोरी मिळणे. कंपन्या उभारणे आणि त्यांचा विस्तार करण्याचा त्यांचा अनुभव संस्थेची कार्यसंस्कृती घडविण्यास मदत करतो. तसेच, टीमचा उत्साह कमी झाल्यावर त्यांच्या अनुभवातून प्रेरणाही मिळते.”

हा व्हिडिओ शेअर करताना जोशुआ सॅलिन्स यांनी, “आमच्या कार्यालयात ६४ वर्षीय इंटर्न सहभागी झाले आहेत आणि हा आमच्यासाठी घेतलेला सर्वोत्तम निर्णय ठरला आहे,” असे म्हटले आहे.

या नियुक्तीबाबत सोशल मीडियावर अनेकांनी उत्सुकता व्यक्त केली. एका युजरने, “ते इंटर्न का आहेत?” असा प्रश्न विचारला. त्यावर उत्तर देताना जोशुआ यांनी सांगितले की, संबंधित व्यक्तीला निवृत्तीनंतर घरी बसून राहण्यापेक्षा सक्रिय राहून काम करायचे होते.

“त्यांना काम करत राहायचे होते आणि केवळ घरी बसून वेळ घालवायचा नव्हता. त्यांच्याकडे प्रचंड अनुभव आणि ज्ञान आहे. त्यामुळे ते आमच्या टीमला मार्गदर्शन करत आहेत आणि त्यांचा मोठा फायदा होत आहे,” असे जोशुआ यांनी स्पष्ट केले.

त्यांच्या या उत्तराचे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात स्वागत करण्यात आले. अनेकांनी अनुभवी व्यक्तींना सक्रिय राहण्याची संधी देण्याच्या या उपक्रमाचे कौतुक केले.

सोशल मीडियावर सकारात्मक प्रतिक्रिया

या व्हिडिओवर नेटकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात सकारात्मक प्रतिक्रिया उमटल्या. तरुणाईची ऊर्जा आणि अनुभवी व्यक्तींचे ज्ञान यांचा संगम स्टार्टअपसाठी फायदेशीर ठरू शकतो, असे अनेकांनी नमूद केले. एका युजरने प्रतिक्रिया देताना, “चित्रपटातील कथा प्रत्यक्षात उतरल्यासारखे वाटते. ही कल्पना अप्रतिम आहे,” असे म्हटले. दुसऱ्या युजरने लिहिले, “हा व्हिडिओ पाहून माझे डोळे पाणावले. अनुभवी व्यक्तीला संधी देणे आणि त्यांच्या ज्ञानाचा उपयोग संस्थेसाठी करणे ही खरोखरच कौतुकास्पद बाब आहे.”

तर आणखी एका युजरने विनोदी अंदाजात, “खरं सांगायचं तर, इतर सगळ्यांपेक्षा हेच सर्वात ‘कूल’ इंटर्न आहेत,” अशी प्रतिक्रिया दिली. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर विविध पिढ्यांमधील सहकार्य, अनुभवी व्यावसायिकांचे योगदान आणि आधुनिक स्टार्टअप संस्कृतीमध्ये त्यांच्या भूमिकेबाबत व्यापक चर्चा सुरू झाली आहे.