Breaking News
  • वर्धा जिल्ह्यात मागील २४ तासांपासून संततधार व रिमझिम पावसाची हजेरी
  • दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल उद्धव ठाकरेंची भेट घेणार
  • मनोज जरांगे आभिजीत दिपकेंच्या भेटीला
  • नाशिकमध्ये मनसेचं आंदोलन
  • बुलढाण्यात जंतर-मंतर लाठीचार्जचे तीव्र पडसाद; विद्यार्थ्यांची सरकारविरोधात स्वाक्षरी मोहीम
  • ठाकूरबुवांच्या समाधीस्थळी माऊलींचे तिसरे गोल रिंगण भक्तिरसात रंगले
  • जे.पी नड्डा, जितेंद्र सिंह आंदोलकांची भेट घेणार
  • पुणे शहरात सायबर चोरट्यांचा सुळसुळाट; एकाच दिवसात ४२ गुन्ह्यांची नोंद
  • पावसाची दडी, पाणी स्रोत आटले; टोमॅटो पिकाला टँकरने पाणी देण्याची शेतकऱ्यांवर वेळ

होम > आपले शहर > विदर्भ > नागपूर

पल्स पोलिओ अभियान

राष्ट्रीय पल्स पोलिओ अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद; 623 बालकांना पोलिओ प्रतिबंधक डोस

Pulse Polio Campaign: तरोडी खुर्द अंगणवाडी तसेच प्रधानमंत्री आवास योजना (खासरा क्र. 63) येथे उभारण्यात आलेल्या दोन लसीकरण केंद्रांवर एकूण 623 बालकांना पोलिओ प्रतिबंधक डोस पाजण्यात आले.


राष्ट्रीय पल्स पोलिओ अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद 623 बालकांना पोलिओ प्रतिबंधक डोस

Pulse Polio Campaign |

 

बिडगाव-पांढुर्णा-तरोडी खुर्दच्या प्रभाग क्र. 14 मध्ये दोन केंद्रांवर यशस्वी लसीकरण
जनजागृती मोहिमेचा सकारात्मक परिणाम

बिडगाव/ पांढुर्णा/ तारोडी खुर्द (Pulse Polio Campaign) : राष्ट्रीय पल्स पोलिओ अभियानांतर्गत नगरपंचायत बिडगाव-पांढुर्णा-तरोडी खुर्दच्या प्रभाग क्र. 14 मध्ये आज रविवारी (दि. 28 जून) आयोजित करण्यात आलेले 'पल्स पोलिओ लसीकरण अभियान' उत्साहात आणि यशस्वीरित्या पार पडले. प्रभागातील तरोडी खुर्द अंगणवाडी तसेच प्रधानमंत्री आवास योजना (खासरा क्र. 63) येथे उभारण्यात आलेल्या दोन लसीकरण केंद्रांवर एकूण 623 बालकांना पोलिओ प्रतिबंधक डोस पाजण्यात आले.

या (Pulse Polio Campaign) अभियानाचे उद्घाटन नगराध्यक्ष वीरू जमगडे (Viru Jamgade) आणि सभापती तथा नगरसेवक प्रीतम बोकडे (Pritam Bokade) यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नगरसेवक अजय बीसेन, अजित जमगडे, प्राथमिक आरोग्य केंद्राच्या डॉ. बारापात्रे मॅडम, तसेच आशा सेविका सुषमाताई सोनवणे, ज्योतीताई ठाकरे, सीमाताई सतफडे, मेघना तांदुळकर, शीतल हिवसे, भूमिका दांडवे आणि आरोग्य विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.

पल्स पोलिओ अभियान (Pulse Polio Campaign) यशस्वी करण्यासाठी नगराध्यक्ष वीरू जमगडे यांच्या मार्गदर्शनाखाली नगरसेवक प्रीतम बोकडे यांनी विशेष जनजागृती मोहीम राबवली. सोशल मीडियाच्या माध्यमातून तसेच कार्यकर्त्यांच्या सहकार्याने घराघरांत जाऊन नागरिकांना अभियानाबाबत माहिती देण्यात आली. या जनजागृतीमुळे मोठ्या संख्येने पालकांनी आपल्या बालकांना पोलिओ प्रतिबंधक डोस देऊन अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या (Pulse Polio Campaign) अभियानाच्या यशस्वी आयोजनाबद्दल उपस्थित मान्यवरांनी आरोग्य विभाग, आशा सेविका आणि सर्व कार्यकर्त्यांचे अभिनंदन करत त्यांच्या कार्याचे कौतुक केले.

Related to this topic: