श्रीमद् भागवत कथा महोत्सव

Shrimad Bhagwat Katha: आसोला खुर्द येथे श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ व यात्रमहोत्सव

आसोला खुर्दमध्ये श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ, कीर्तन व महाप्रसादाचा आयोजन २३ मार्च ते ३१ मार्चपर्यंत चालणार आहे.

By : देशोन्नति
Shrimad Bhagwat Katha: आसोला खुर्द येथे श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ व यात्रमहोत्सव

दि. ३० मार्च रोजी श्रींचे गाढे ओढणे व महाप्रसाद

मानोरा (Shrimad Bhagwat Katha) : श्रीक्षेत्र आसोला खुर्द येथे पुरण पोळीच्या नवसाला पावणारा भगवान शिव शंकराचे भक्त श्री सोहमनाथ महाराजांच्या समाधी सोहळ्यानिमित्त श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ महोत्सव सोमवार दि. २३ मार्च ते २९ मार्च पर्यंत पर्यंत पार पडणार आहे. यात्रा महोत्सवाला २८ मार्च ते १ एप्रिल पर्यंत राहणार असुन चैत्र शुद्ध गुढीपाडवा दि. १९ मार्च ते २ एप्रिल हनुमान जयंतीपर्यंत आयोजीत विविध धार्मिक कार्यक्रमाचा लाभ तालुकाभरातील भाविक भक्तांनी घ्यावा, असे आवाहन व्यवस्थापक श्री सोहमनाथ महाराज संस्थान तसेच समस्त गावकरी मंडळीच्यावतीने करण्यात आले आहे.

श्रीमद् भागवत कथा (Shrimad Bhagwat Katha) ह. भ. प. बालयोगी गोपालजी महाराज कारखेडकर यांच्या अमृत वाणीतून संगीत संचासह पार पडणार आहे. भागवत कथा वाचन दुपारी १ ते ४ वाजतापर्यंत राहणार आहे. सोमवारला २३ मार्च रोजी रात्री सकाळी ९ वाजता श्री सोहमनाथ महाराजांचा अभिषेक ग्रंथ व स्थापना व ज्ञान यज्ञास प्रारंभ आणि रात्री ९ वाजता ह. भ. प, श्री ऋषिकेश महाराज यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम, दि.२४ मार्च रोजी सकाळी १० ते ११ ह भ प मंजूताई राठोड यांचा प्रवचनाचा कार्यक्रम व रात्री ९ वाजता श्री संतोष महाराज यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम, दि. २५ मार्च रोजी रात्री ९ ते १२ ह. भ. प. नरेंद्र महाराज बिडकर यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम, दि. २६ मार्च रोजी ९ ते ११ ह भ प श्री गणेश महाराज कुबडे यांचा कीर्तनाचा कार्यक्रम, दि. २७ मार्च रोजी दुपारी १२ वाजता भागवताचार्य ह. भ. प. बालयोगी गोपाल महाराज यांच्या हस्ते श्रीराम जन्मोत्सव, व रात्री ९ ते ११ ह. भ.प. श्री हरिभाऊ महाराज दुर्गे यांचा कीर्तनाचा कार्यक्रम, दि. २८ मार्च रोजी रात्री ९ ते ११ ह भ प श्री घुगे महाराज यांचा कीर्तनाचा कार्यक्रम, दि. २९ मार्च रोजी दुपारी १ ते ४ श्रीमद् भागवत कथा ज्ञान यज्ञास पूर्णाहुती व रात्री ८ ते १० ह भ प श्री नरेश महाराज आळंदीकर यांचा कीर्तन व त्यानंतर बंजारा भजनाचा कार्यक्रम, दि. ३० मार्च रोजी सोमवारी यात्रमहोत्सव सकाळी ७ वाजता श्री सोमनाथ महाराजांचा अभिषेक व नंतर गाढे ओढण्यास प्रारंभ, सकाळी १० ते १२ ह भ प श्री नरेश महाराज आळंदीकर यांचे काल्याचे किर्तन आणि श्रींचा महाप्रसाद यात्रामहोत्सव, ३१ मार्च रोजी सकाळपासून श्रींची पालखी व काठी मिरवणूक, दहीहंडी व काल्याचे किर्तन, २ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजता श्री हनुमान जन्मोत्सव व त्यानंतर महाप्रसाद तरी पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी सप्ताहभर आयोजीत श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ, प्रवचन, कीर्तन, गोपालकाला, भजन आणि महाप्रसादाचा लाभ घेण्याचे आवाहन भाविक भक्तांना आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

संबंधित सामग्री

आसोला खुर्द येथे भीषण पाणीटंचाई; तलावातील अनधिकृत मोटार पंप काढण्याची मागणी!

आसोला खुर्द येथे भीषण पाणीटंचाई; तलावातील अनधिकृत मोटार पंप काढण्याची मागणी!

Asola Khurd water shortage: मानोरा तालुक्यातील आसोला खुर्द येथे सध्या मोठ्या प्रमाणात पाणीटंचाई निर्माण झाली असून परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत आहे. गावातील दोन्ही तलाव आणि कारपा व आसोला खुर्द शिवार

Oct 05, 2026
प्रेमानंद महाराजांचे आश्रम पुन्हा चर्चेत; मुलगा आणि महिला बेपत्ता...?

प्रेमानंद महाराजांचे आश्रम पुन्हा चर्चेत; मुलगा आणि महिला बेपत्ता...?

Premanand Maharaj Ashram: प्रेमानंद महाराजांच्या राधा केलि कुंज आश्रमाशी संबंधित काही घटनांमुळे पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. आश्रमात आलेला 17 वर्षीय अनुज चौधरी हा मुलगा बेपत्ता झाल्याचा दावा

Oct 04, 2026
श्री गजानन महाराज संस्थानचे दातृत्व; दुष्काळ निवारणासाठी 1 कोटी 11 लाखांचा धनादेश मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द

श्री गजानन महाराज संस्थानचे दातृत्व; दुष्काळ निवारणासाठी 1 कोटी 11 लाखांचा धनादेश मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द

Shri Gajanan Maharaj Sansthan: श्री गजानन महाराज संस्थान हे केवळ धार्मिक श्रद्धास्थान नसून सामाजिक उत्तरदायित्व जपणारी अग्रगण्य संस्था आहे. यापूर्वीही राज्यावर आलेल्या विविध नैसर्गिक आपत्ती

Sep 27, 2026
श्री राजस्थान बाल गणेश मंडळाकडून भव्य अन्नदान

श्री राजस्थान बाल गणेश मंडळाकडून भव्य अन्नदान

हिंगोलीतील चिंतामणी गणपतीच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांसाठी राजस्थान बाल गणेश मंडळाकडून भव्य अन्नदान; लाखो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.

Sep 26, 2026
वृंदावनमध्ये प्रेमानंद महाराजांच्या शिष्याचा मृत्यू; आत्महत्या की आणखी काही?

वृंदावनमध्ये प्रेमानंद महाराजांच्या शिष्याचा मृत्यू; आत्महत्या की आणखी काही?

वृंदावनमध्ये प्रेमानंद महाराजांच्या शिष्याचा संशयास्पद मृत्यू झाला. चौथ्या मजल्यावरून पडलेल्या दीपक कुमार यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून पोलिस तपास सुरू आहे.

Sep 26, 2026