Breaking News
  • बदलापुरात तुकाराम मुंडे यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक
  • देशाची शिक्षणव्यवस्था बदलावी लागेल- राहुल गांधी
  • मंत्री धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसकडून सांगलीत जल्लोष
  • आषाढी निमित्त काढण्यात आलेल्या रथ उत्सवात प्रयास मित्र मंडळाने देखाव्यातून मांडले 'नीट' पेपर फुटीचे दाहक वास्तव
  • युवकांनी सरकारला नैतिक जबाबदारी स्वीकारायला भाग पाडलं - शरद पवार
  • TET पेपर फुटी प्रकरणातील मास्टर माईंड बिजेदरं कुमार गुप्ता सह इंद्रजित सिंग ला 30 जुलै पर्यंत पोलीस कोठडी
  • केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनाम्यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये विद्यार्थ्यांसह विविध संघटनेचा जल्लोष....
  • छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज भागातील प्रति पंढरपूर येथे विठ्ठल भक्तांची गर्दी
  • संभाजीनगरच्या प्रति पंढरपूर येथे मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते सुरू विठ्ठल रुक्माईची पूजा

होम > आणखी > अध्यात्म

जगन्नाथ रथयात्रा महोत्सव

हिंगोलीत जय जगन्नाथ च्या जयघोषात इस्कॉनचा जगन्नाथ रथयात्रा महोत्सव संपन्न

Jagannath Rath Yatra Festival: इस्कॉन शाखेच्या वतीने श्री जगन्नाथ रथयात्रा महोत्सवाचे  आयोजन १९ जुलै रविवार रोजी करण्यात आले. सर्व भक्त-भाविकांनी या उत्सवात हरे कृष्णा  हरे रामा व हरिबोल


हिंगोलीत जय जगन्नाथ च्या जयघोषात इस्कॉनचा जगन्नाथ रथयात्रा महोत्सव संपन्न

Jagannath Rath Yatra Festival |

हिंगोली (Jagannath Rath Yatra Festival) : येथील इस्कॉन शाखेच्या वतीने श्री जगन्नाथ रथयात्रा महोत्सवाचे  आयोजन १९ जुलै रविवार रोजी करण्यात आले. सर्व भक्त-भाविकांनी या उत्सवात हरे कृष्णा  हरे रामा व हरिबोल आदी जयघोषात जगन्नाथरथ मंगल ध्वनी सह नृत्य  करीत  रथ ओढून भक्तिभाव अर्पण केला.

 हिंगोली जिल्हा इस्कॉन शाखेच्या वतीने रथावर  भगवान जगन्नाथ,बल भद्र,सुभद्रा  माता  यांच्या मूर्ती विधीवत विराजमान करण्यात आल्या.जगन्नाथ रथ  यात्रा  चे धार्मिक आध्यात्मिक  व  नैसर्गिक महत्व आणि  इस्कॉन चे तत्त्वज्ञान, तत्त्व प्रणालीला प्राप्त झालेले यश हे पुढील  पिढ्यांसाठी शिदोरी आहे अश्या आशयाचे उद्गार राधा  गोपीनाथ मंदीर जुहू चौपाटी चे प्रवचन कार रुद्र नाथ प्रभूजी यांनी काढले.

 वेदांत श्रील प्रभुपाद  यांनी दिलेली  शिकवण  अंगीकारली तर अवघ्या विश्वात  शांती नांदेल ती  आजचि गरजच आहे असेही  रुद्रनाथ  प्रभू  म्हणाले. त्यासाठी  इस्कॉन  तत्त्वज्ञान  अंगीकारा अस आवाहन  त्यांनी  केले. आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघ  बळकट  झाला असून जगभरातील कोट्यवधी साधक या कार्यात अहोरात्र सेवाभावाने कार्यरत आहेत. हाच आदर्श समोर ठेवून हिंगोली इस्कॉन शाखेमार्फत वर्षभर विविध आध्यात्मिक आणि सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येते.त्याबद्दल  त्यांनी हिंगोली  शाखेचा  गौरव  केला. 

 अभय गोपालदास प्रभूजी, इस्कॉन चौपाटी यांच्या मधुर वाणीत हरिनाम संकीर्तनाचा  कार्यक्रम  झाला. श्री जगन्नाथ रथयात्रेला सकाळी  अंबिका टाकीजवळील श्री संकटमोचन हनुमान मंदिर येथून हरे कृष्णच्या जयघोषात प्रारंभ झाला त्यानंतर रथयात्रा गांधी चौक, इंदिरा गांधी चौक व जवाहर रोड मार्गे श्री बद्रीनारायण मंदिर येथे पोहोचेली.तेथे हरिनाम संकीर्तन, सांस्कृतिक नृत्य श्री जगन्नाथजी ची कथा, महाआरती तसेच महाप्रसाद वितरणाचा कार्यक्रम  करण्यात आला.

 नागपूर येथील इस्कॉन परिवारातील साधक व उद्योगपती धनराजजी खंडेलवाल यांनी मार्गदर्शन केले रथयात्रेत नागपूर येथील उद्योगपती धनराजजी खंडेलवाल, मुंबई येथील सहाय्यक धर्मादाय आयुक्त रविंद्र धायतडक यांच्यासह हिंगोली, परभणी, वाशीम तसेच स्थानिक इस्कॉन परिवारातील अनेक साधक ह्यानी   महाआरती पूजा  अर्चना केली. या महोत्सवाच्या तयारीसाठी इस्कॉन हिंगोली  शाखेच्या  महिला  युवक  ज्येष्ठ  नागरिक  आणि  बालगोपाळ ह्यानी गेल्या एक महिन्यापासून परिश्रम घेतले.खंडेलवाल  ज्वेलर्स, प्रभुदास स्वीट मार्ट,वाटिका हॉटेल,पीयूष मेडिकल,माउलि डेअरी,आदी प्रतिष्ठानमार्फत रथ यात्रा दरम्यान खानपान व्यवस्थापन स्वखर्चाने केले. अनेक  दानशूर भक्त भाविकांनी सर्वार्थाने सहयोग दिला असल्याचे आयोजकांनी सांगितले.

Related to this topic: