Breaking News
  • बदलापुरात तुकाराम मुंडे यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक
  • देशाची शिक्षणव्यवस्था बदलावी लागेल- राहुल गांधी
  • मंत्री धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसकडून सांगलीत जल्लोष
  • आषाढी निमित्त काढण्यात आलेल्या रथ उत्सवात प्रयास मित्र मंडळाने देखाव्यातून मांडले 'नीट' पेपर फुटीचे दाहक वास्तव
  • युवकांनी सरकारला नैतिक जबाबदारी स्वीकारायला भाग पाडलं - शरद पवार
  • TET पेपर फुटी प्रकरणातील मास्टर माईंड बिजेदरं कुमार गुप्ता सह इंद्रजित सिंग ला 30 जुलै पर्यंत पोलीस कोठडी
  • केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनाम्यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये विद्यार्थ्यांसह विविध संघटनेचा जल्लोष....
  • छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज भागातील प्रति पंढरपूर येथे विठ्ठल भक्तांची गर्दी
  • संभाजीनगरच्या प्रति पंढरपूर येथे मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते सुरू विठ्ठल रुक्माईची पूजा

होम > आणखी > अध्यात्म

आषाढी एकादशी

जय हरी विठ्ठलच्या जयघोषाने कन्हान दुमदुमले...

Ashadhi Ekadashi:


जय हरी विठ्ठलच्या जयघोषाने कन्हान दुमदुमले

Ashadhi Ekadashi |

 

माऊली मंडळ व मातोश्री मंडळाच्या संयुक्त विद्यमाने आषाढी एकादशी भक्तिमय उत्साहात

शिवाजी नगर विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात पूजा, अभिषेक, भजन-कीर्तन व फराळ प्रसाद वितरण

कन्हान (Ashadhi Ekadashi) : आषाढी (देवशयनी) एकादशी निमित्त कन्हान शहरात माऊली मंडळ व मातोश्री मंडळाच्या संयुक्त विद्यमाने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. "जय हरी विठ्ठल... जय जय विठ्ठल" या अखंड जयघोषाने संपूर्ण शहर परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाले.
           
स्वामी विवेकानंद नगर येथील हनुमान मंदिरात विधिवत पूजा-अर्चना करून श्री विठ्ठल-रुक्मिणी यांच्या सार्वजनिक पालखीचे (Ashadhi Ekadashi) मोठ्या भक्तिभावात प्रस्थान झाले. टाळ-मृदंगाच्या गजरात, हरिनामाच्या घोषात तसेच भजन-कीर्तनाच्या सुरेल वातावरणात पालखी शिवाजी नगर येथे विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पोहचली. पुजा अर्चना,भजन करुन पालखी पुढे मार्गां ने नगरभ्रमण करुन महामार्गावरील श्री शिव पंचायत हनुमान मंदिर कन्हान येथे पोहचली. शहरातील विविध मार्गांनी नगर प्रदक्षिणा केली. मार्गभर भाविकांनी पाल खीचे दर्शन घेत विठ्ठल नामाचा गजर करित उत्स्फुर्त सहभाग नोंदविला.

या (Ashadhi Ekadashi) भक्तिमय पालखी सोहळ्याचे विशेष आकर्षण म्हणजे अंशु शिवरकर यांनी भगवान श्री विठ्ठल तर जानवी राऊत हिने माता रुक्मिणी च्या वेषभुषेत सहभागी होऊन उपस्थित भक्तांचे लक्ष वेधुन घेतले. पारंपरिक वेशभुषा आणि भक्तिमय वातावरणा मुळे उपस्थितांनी छायाचित्रे काढत या सोहळ्याचा आनंद लुटला. नगर प्रदक्षिणे नंतर स्वामी विवेकानंद नगर येथील हनुमान मंदिरात धार्मिक कार्यक्रमांनी पालखी सोहळ्याचा समारोप झाला.

या (Ashadhi Ekadashi) भक्तिमय सोह ळ्याला नगरसेविका रेखा टोहने, निती तेलोते, माजी नगरसेविका राखी परते, कल्पना जाधव, वनिता काव ळे, सुषमा मस्के, वैशाली खंडार, माया, उषा साकोरे, ललिता शर्मा, मनिषा चिखले, रंजना भोयर, सुनिता वाडीभस्मे, वनिता खवले, सोनु सहगल, नलिनी यादव, वीणा हुड, उर्मिला तितरमारे, शीला सहगल, उषा बंड, सुमन शेंडे, संगिता सव्वालाखे, कुसुम मेहरकुळे, छाया साकोरे, वैशाली इंगोळकर, शारदा शिवरकर यांच्या सह परिसरातील अनेक महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या पालखी सोहळ्यामुळे कन्हानमध्ये वारकरी परंपरेचे दर्शन घडले.

शिवाजी नगर विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात पूजा, अभिषेक, भजन-कीर्तन व फराळ प्रसाद वितरण

शिवाजी नगर कन्हान येथील श्री विठ्ठल- रुक्मिणी मंदिरात आषाढी एकादशीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे भक्तिभावाने आयोजन करून पहाटे मंदिरात भगवान श्री विठ्ठल-रुक्मिणी यांचा दूध व जलाभिषेक करून विधिवत पूजा-अर्चना करण्यात आली. यावेळी भाविकांनी विठ्ठल नामाचा गजर करत दर्शनाचा लाभ घेतला. यानंतर भजन मंडळ, शिवाजी नगर कन्हान यांनी हरिनामाचा गजर, भजन व कीर्तन  करित टाळ-मृदंगाच्या गजरात आणि विठ्ठलाच्या नाम स्मरणाने मंदिर परिसर भक्तिमय वातावरणाने दुमदुमून गेले. सायंकाळी ज्ञानेश्वर महाराज भजन मंडळ कामठी यांच्या भजन-कीर्तनाचा कार्यक्रम उत्साहात करण्यात आला.

यामध्ये श्रीकांतजी भुताळ यांनी आपल्या ओज स्वी वाणीने विठ्ठल भक्तीचा महिमा सांगत उपस्थित भाविकांना भक्तिरसात तल्लीन केले. भजन-कीर्तना नंतर सर्व भाविकांना फराळाच्या प्रसादाचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाला गीता भीलकर, भारती महल्ले, नंदा सोलंकी, मीरा तिडके, पुष्पा लाडेकर, गीता येवले, सुनीता मानकर, ज्योती उराडे यांच्यासह परिसरातील अनेक महिला व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आषाढी एकादशीच्या निमित्ताने आयोजित या धार्मिक कार्यक्रमांमुळे कन्हान शहर भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाच्या वातावरणाने दुमदुमून गेले.

Related to this topic: