Breaking News
  • राजपाल यादव यांना तुरुंगवास; चेक बाऊन्स प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
  • 'मिमिक्री आर्टिस्ट' म्हणत फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला; 'भाडे के टट्टू'वरून सुरू झालेल्या वादाला विधानसभेत उत्तर
  • देशात पुन्हा कोरोनाची धास्ती! आंध्र प्रदेशात 46 वर्षीय कोरोनाबाधिताचा मृत्यू; उपचारांनंतरही प्रकृतीत सुधारणा नाही
  • तेलंगणात भात रोवणीसाठी गेलेल्या चंद्रपूरच्या मजुरांची पिकअप उलटली; 4 जणांचा जागीच मृत्यू , 27 जखमी
  • शूज कारखान्यात भीषण आग दुर्घटना; आगीत जळून 28 जणांचा मृत्यू
  • Stock Market Update : TCS च्या दमदार निकालांचा बाजाराला बूस्ट; सेन्सेक्स-निफ्टीत 1% पेक्षा अधिक उसळी
  • “…अन् चाललेत मिसिंग लिंकचा मुका घ्यायला”; जयंत पाटील यांच्या टीकेला गोपीचंद पडळकरांचे प्रत्युत्तर
  • काँगोत इबोलाचा कहर! १,७९२ बाधित, ६२५ जणांचा मृत्यू; संयुक्त राष्ट्रांकडून तातडीच्या जागतिक हस्तक्षेपाचे आवाहन
  • WhatsApp चे नवे Birthday Reminder फीचर लवकरच; मित्र-नातेवाईकांचे वाढदिवस विसरण्याची चिंता संपणार

होम > आणखी > अध्यात्म

ज्योतिर्लिंग श्री नागनाथ

सोमवती अमावस्या निमित्त ज्योतिर्लिंग श्री नागनाथाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी

Jyotirlinga Shri Nagnatha: सोमवतीच्या ज्योतिर्लिंग दर्शनासाठी आठव्या ज्योतिर्लिंग श्री नागनाथ मंदिरात 15 जूनला मोठ्या संख्येने भक्तांनी गरद्या केली.


सोमवती अमावस्या निमित्त ज्योतिर्लिंग श्री नागनाथाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी 

Jyotirlinga Shri Nagnatha |

औंढा नागनाथ (Jyotirlinga Shri Nagnatha) : येथील आठवे ज्योतिर्लिंग श्री नागनाथ मंदिरात सोमवती अमावस्या निमित्त 15 जून रोजी सकाळ पासून च श्री नागनाथाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती यादरम्यान मोठ्या भाविकांच्या रांगा लागल्या होत्या तर मंदिर परिसरही भाविकांच्या गर्दीने फुलून गेला होता. 

अधिक मासात संपूर्ण महिनाभर श्री नागनाथाच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होती दरम्यान अधिक मासाचा शेवट असल्याने सोमवारी सोमवती अमवशा निमित्त मंदिरात भाविकांनी मोठी गर्दी केली होती. मंदिर संस्थान सल्लागार समिती मंडळाचे अध्यक्ष आमदार संतोष बांगर, मंदिर संस्थांचे अध्यक्ष तहसीलदार हरीश गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली अधीक्षक वैजनाथ पवार, व्यवस्थापक सुरेंद्र डफळ, मंदिर सुरक्षा प्रमुख बबन सोनूणे, जगदेव दिंडे, नामदेव पाटील, संजय मोरे, शोभा करंजीकर, अर्चना राऊत, भगवान शिंदे, दसरत राठोड, मनीषा जवळके, नितीन दराडे, प्रवीण गोबाडे, मंचक सोळंके, आकाश सोनूणे, विमल सोळंके नंदा चोंढेकर, सुरेखा शिंदे , गणेश जगताप, मुकेश पडोळे, सचिन सोनटक्के, प्रदीप जोशी, नागेश माने,कृष्णा पाटील, मीना काळे, चतुराबाई गोरे यांनी बंदोबस्त ठेवत भाविकांना रांगेमध्ये पाणी, चहा व फराळाची सोय केली होती.

दरम्यान (Jyotirlinga Shri Nagnatha) सोमवती अमवशा अनुषंगाने पहाटे साडेपाच वाजता मंदिराचे मुख्य पुजारी तुळजादास भोपी, बंडू भोपी, रामेश्वर गुरव यांनी श्री नागनाथ स्नान व नित्य पूजा करून मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले केले दरम्यान सकाळ पासून रात्री उशिरापर्यंत ४५ हजाराच्या वर भाविकांनी दर्शन घेतल्याची माहिती मंदिराची व्यवस्थापक सुरेंद्र डफळ, मंदिर सुरक्षा प्रमुख बबन सोनूणे यांनी दिली.

Related to this topic: