सीमेवर सुरक्षा दलांची शोधमोहीम सुरु
चांगलांग (India-Myanmar Border Attack) : अरुणाचल प्रदेशातील चांगलांग जिल्ह्यात भारत-म्यानमार सीमेवर आज सकाळी आसाम रायफल्सच्या गस्ती पथकावर संशयित सशस्त्र हल्लेखोरांनी हल्ला केला. या (India-Myanmar Border Attack) हल्ल्यात एका जवानाचा मृत्यू झाला असून चार जवान जखमी झाले आहेत. नम्पोंग नाल्लाजवळ सकाळी साडेसहाच्या सुमारास ही घटना घडली.
21 आसाम रायफल्सचे जवान सीमेवरील परिसरात नियमित गस्त घालत असताना त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला. ज्या भागात ही (India-Myanmar Border Attack) घटना घडली, त्या परिसरात सध्या सीमा कुंपणाचे काम सुरू आहे. हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या जवानाची ओळख हवालदार जांखोकाई कुकी अशी करण्यात आली आहे.
प्राथमिक माहितीनुसार, NSCN-K-YA गटाच्या सदस्यांचा या हल्ल्यामागे सहभाग असण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. मात्र, हल्लेखोरांची ओळख आणि हल्ल्यामागील नेमके कारण याबाबत अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. (India-Myanmar Border Attack) हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी परिसरात शोधमोहीम सुरू केली असून सीमेवरील सुरक्षा अधिक कडक करण्यात आली आहे. जखमी जवानांना उपचारासाठी हलविण्यात आले असून घटनेचा पुढील तपास सुरू आहे.