दिव्यांग महिला टी-20 विश्वचषक विजेत्या, गंगा कदम, कोणत्याही क्रीडा वातावरणाशिवाय विजेतेपद पटकावले. शिवसेना नेते मागतात तिला शासकीय नोकरी व आर्थिक मदत द्यावी.
आ. बांगर व आ. नवघरे यांनी घेतली उपमुख्यमंत्री पवार यांची भेट
आखाडा बाळापूर (Disabled Women T-20 World Cup) : कळमनुरी तालुक्या बरोबर जिल्ह्याच नावलौकीक देशपातळीवर व सातसमुद्रापार नेणाऱ्या कळमनुरी तालुक्यातील फुटाणा येथील गंगा कदम हिने सुरवातीला महाराष्ट्र दिव्यांग महिला क्रीकेट संघ कर्णधार म्हणून व नंतर नुकत्याच पार पडलेल्या दिव्यांग महिला टी- 20 विश्वचषक विजेत्या क्रिकेट संघात भारतीय संघ उपकर्णधार म्हणून उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे.
गंगा कदम हिच्या क्रीकेट खेळाडू (Disabled Women T-20 World Cup) म्हणून बजावलेल्या दमदार कामगिरी दखल महाराष्ट्र शासनाने घेऊन तिला शासकीय सेवेत अधिकारी म्हणून संधी द्यावी तसेच आर्थिकदृष्ट्या कमकुवत आसल्यामुळे गंगा कदम हिला महाराष्ट्र शासनाने विशेष बाब म्हणून मुबलक आर्थीक मदत तात्काळ द्यावी अशी मागणी शिवसेना जिल्हा प्रमुख आ. संतोष बांगर व वसमत विधानसभेचे आ. राजु नवघरे यांनी 18 मार्च रोजी उपमुख्यमंत्री सुमित्रा पवार यांची भेट घेऊन केली आहे.यावेळी क्रिकेट खेळाडू गंगा कदम उपस्थित होती.
कळमनुरी तालुक्यातील फुटाणा येथील गंगा कदम हिने सोलापूर येथे शिक्षण घेत कठोर मेहनत व जिद्दीने क्रिकेटपटू म्हणून आपली चमक जिल्हा, विभाग राज्य व नंतर देशपातळीवर दाखवून दिव्यांग महिला टी विश्वचषक विजेत्या संघात उपकर्णधार म्हणून तिने गोलंदाज, फलंदाजी व क्षेत्ररक्षणात उत्कृष्ट कामगिरी बजावत विजेतेपद पटकावण्यात मुख्य भुमिका बजावली होती तिच्या कार्याची दखल घेत शासकीय नोकरीत तिला तातडीने समाविष्ट करण्याची मागणी आज आ.संतोष बांगर व आ.राजुभैय्या नवघरे यांनी उपमुख्यमंत्री सुमित्रा पवार यांची भेट घेऊन केली आहे.
गंगा कदम ग्रामीण खेळाडू व मुलींसाठी प्रेरणादायी..
कळमनुरी तालुक्यातील फुटाणा या छोट्याशा गावातून घरात कोणत्याही प्रकारचे क्रीडा वातावरण नसताना दिव्यांग (Disabled Women T-20 World Cup) आसताना परिस्थितीवर मात करत आपल्या स्वकर्तुत्वाने दिव्यांग महिला टी भारतीय संघ उपकर्णधार बनून देशाला या स्पर्धेत विश्वविजेता बनवण्यासाठी मोठी भुमिका खेळाडू म्हणून बजावली तिच्या या दमदार कामगिरीमुळे ग्रामीण भागातील खेळाडू विशेष करून महिला मुलीसाठी ती प्रेरणादायी बनली आहे. तिच्या कार्याची दखल घेऊन तातडीने शासकीय सेवेत तिला समाविष्ट करण्यात यावे तसेच आर्थिक मदत देण्यात यावी. -अभय पाटील सावंत मा.सरपंच शेवाळा.