Breaking News
  • विदर्भात गेल्या बारा दिवसांपासून पावसाचा खंड
  • Gadchiroli : जपतलाई घटनेतील दोषींवर कठोर कारवाई; ५१३ आश्रमशाळांचे थर्ड पार्टी ऑडिट
  • कुंभमेळ्यासाठी १३ प्रमुख आखाड्यांसह धार्मिक संस्थांनाही पायाभूत सुविधांसाठी १५ लाखांपर्यंत निधी मिळणार
  • दोडामार्ग पाळये गावात हत्तींचा धुमाकूळ; माड, व केळी बागा उद्ध्वस्त
  • Nashik : आदित्य ठाकरे आज नाशिक दौऱ्यावर
  • शिवप्रतिष्ठान युवाच्यावतीने दीप प्रज्वलन करून दीप अमावस्या साजरी
  • Ratnagiri : रत्नागिरीतल्या पालीत वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश
  • Ahilyanagar : कॅफेच्या नावाखाली गैरकृत्य, श्रीरामपूरमध्ये पोलिसांची 4 कॅफेवर छापेमारी
  • Nanded : झेंडूच्या फुलशेतीतून शेतकऱ्याला मिळाला आर्थिक आधार

होम > क्रीडा

ऋषिकेश सोलंकी

ऋषिकेश सोलंकी यांच्या प्रशिक्षणाखाली घडला इतिहास; बुलढाण्याच्या दोन विद्यार्थिनी राष्ट्रीय स्पर्धेत

National Championship: द प्राईड तायक्वांदो अकॅडमी, बुलढाणाचे हेड कोच ऋषिकेश सोलंकी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेणाऱ्या १४ वर्षांखालील गार्गी अमोल तिवाणे आणि १७ वर्षांखालील प्रकृती नंदवाना


ऋषिकेश सोलंकी यांच्या प्रशिक्षणाखाली घडला इतिहास बुलढाण्याच्या दोन विद्यार्थिनी राष्ट्रीय स्पर्धेत

National Championship |

चिखली (National Championship) : द प्राईड तायक्वांदो अकॅडमी, बुलढाणाचे हेड कोच ऋषिकेश सोलंकी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेणाऱ्या १४ वर्षांखालील गार्गी अमोल तिवाणे आणि १७ वर्षांखालील प्रकृती नंदवाना यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा येथे झालेल्या सीबीएसई साऊथ झोन–२ तायक्वांदो स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करत गोवा, कर्नाटक, केरळ, लक्षद्वीप, दादरा आणि नगर हवेली तसेच दमण आणि दीव येथील बलाढ्य खेळाडूंना कडवी टक्कर देत रौप्यपदक पटकावले.

विशेष म्हणजे, या स्पर्धेसाठी बुलढाणा जिल्ह्यातून केवळ याच दोन विद्यार्थिनी सहभागी झाल्या होत्या आणि दोघींनीही उल्लेखनीय कामगिरी करत सीबीएसई राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेसाठी पात्रता मिळवली. या यशामुळे गार्गी तिवाणे आणि प्रकृती नंदवाना या सीबीएसई राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेसाठी पात्र ठरणाऱ्या बुलढाणा जिल्ह्यातील पहिल्या महिला तायक्वांदो खेळाडू ठरल्या असून त्यांनी जिल्ह्याच्या तायक्वांदो इतिहासात मानाचे सुवर्णपान जोडले आहे.

दोन्ही खेळाडूंनी आपल्या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर हरियाणातील पानिपत येथे होणाऱ्या सीबीएसई राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत आपले स्थान निश्चित केले असून त्या राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्रासह बुलढाणा जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहेत.

या (National Championship) ऐतिहासिक यशामागे हेड कोच ऋषिकेश सोलंकी यांचे तांत्रिक मार्गदर्शन, शिस्तबद्ध प्रशिक्षण आणि अथक परिश्रम यांचा मोलाचा वाटा आहे. द प्राईड तायक्वांदो अकॅडमी, बुलढाणाच्या या दुहेरी यशामुळे संपूर्ण जिल्ह्यात आनंदाचे आणि अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

या यशाबद्दल गार्गी अमोल तिवाणे, प्रकृती नंदवाना, हेड कोच ऋषिकेश सोलंकी तसेच द प्राईड तायक्वांदो अकॅडमी, बुलढाणा यांच्यावर सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, आगामी राष्ट्रीय स्पर्धेसाठी (National Championship) त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या जात आहेत.

Related to this topic: