दिशा सालियान मृत्यू प्रकरण

दिशा सालियान मृत्यू प्रकरणात अभिनेता सूरज पांचोलीचा मोठा खुलासा

Disha Saliyan death case: मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर सीबीआयने बॉलिवूड आणि राजकीय क्षेत्रातील नावांचीही चर्चा, या पार्श्वभूमीवर अभिनेता सूरज पांचोली याने पोस्ट करत आपली भूमिका स्पष्ट केली..

दिशा सालियान मृत्यू प्रकरणात अभिनेता सूरज पांचोलीचा मोठा खुलासा

Sooraj Pancholi

मुंबई (Disha Saliyan death case) : दिवंगत दिशा सालियान यांच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे गेल्यानंतर हे प्रकरण पुन्हा चर्चेत आले आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर सीबीआयने प्राथमिक चौकशी सुरू केल्याने बॉलिवूड आणि राजकीय क्षेत्रातील काही नावांचीही चर्चा होत आहे. या पार्श्वभूमीवर अभिनेता सूरज पांचोली (Sooraj Pancholi) याने सोशल मीडियावर सविस्तर पोस्ट करत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

दिशा सालियान प्रकरणाशी (Disha Saliyan death case) आपला कोणताही संबंध नसल्याचे सांगत सूरज पांचोलीने दिशा सालियान आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांना आपण कधीही भेटलो नसल्याचा दावा केला आहे. विविध मीडिया रिपोर्ट्स आणि चर्चांमध्ये आपले नाव या प्रकरणाशी जोडले जात असल्याबद्दल त्याने नाराजी व्यक्त केली.

“दिशा सालियान यांना कधीही भेटलो नाही”

सूरज पांचोलीने (Sooraj Pancholi) आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, “गेल्या अनेक वर्षांपासून विविध मीडिया रिपोर्ट्स आणि निवेदनांमधून माझे नाव दिवंगत दिशा सालियान (Disha Saliyan death case) यांच्या दुर्दैवी मृत्यूशी जोडले जात आहे. मात्र, वस्तुस्थिती अशी आहे की मी माझ्या संपूर्ण आयुष्यात दिशा सालियान यांना कधीही भेटलेलो नाही आणि माझा त्यांच्याशी कोणत्याही प्रकारचा संपर्कही नव्हता.” तसेच, “मी आजतागायत आदित्य ठाकरे यांनाही प्रत्यक्ष भेटलेलो नाही,” असा दावा त्याने केला.

विनापुरावा नाव जोडल्याचा आरोप

आपले नाव या (Disha Saliyan death case) प्रकरणाशी जोडले जात असल्याबद्दल सूरज पांचोलीने (Sooraj Pancholi) तीव्र नाराजी व्यक्त केली. “ज्या प्रकरणाशी माझा दूरदूरपर्यंत संबंध सिद्ध करणारा एकही पुरावा उपलब्ध नाही, त्या प्रकरणात केवळ सनसनाटी निर्माण करण्यासाठी माझे नाव जोडणे चुकीचे आणि मानसिक त्रास देणारे आहे,” असे त्याने म्हटले. यापूर्वी प्रत्येक अफवा किंवा बातमीवर स्पष्टीकरण देणे टाळत होतो. मात्र, सातत्याने आपले नाव या प्रकरणाशी जोडले जात असल्याने आता समोर येऊन आपली बाजू मांडणे आवश्यक वाटले, असेही सूरज पांचोलीने स्पष्ट केले.

CBI चौकशीच्या पार्श्वभूमीवर प्रकरण पुन्हा चर्चेत

दिशा सालियान मृत्यू प्रकरणातील (Disha Saliyan death case) चौकशीच्या पार्श्वभूमीवर विविध दावे आणि आरोप पुन्हा चर्चेत आले आहेत. मात्र, सूरज पांचोलीने (Sooraj Pancholi) आपल्या पोस्टमधून या प्रकरणाशी कोणताही संबंध नसल्याचे स्पष्टपणे सांगितले आहे.