३४ वर्षांपूर्वीचा चित्रपट, जो अजूनही यूट्यूबवर करतोय ट्रेंड..

९० च्या दशकात बॉलिवूडने अनेक सुपरहिट चित्रपट दिले. ज्यांनी प्रेक्षकांच्या मनावर दीर्घकाळ अधिराज्य गाजवले.

३४ वर्षांपूर्वीचा चित्रपट, जो अजूनही यूट्यूबवर करतोय ट्रेंड..

90s Cinema

(90s Cinema) ९० च्या दशकात बॉलिवूडने अनेक सुपरहिट चित्रपट दिले. ज्यांनी प्रेक्षकांच्या मनावर दीर्घकाळ अधिराज्य गाजवले. त्यापैकीच एक गाजलेला चित्रपट म्हणजे १९९२ साली प्रदर्शित झालेला 'बेटा'. आजही हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतोय आणि यूट्यूबवर ट्रेंड होत असल्याने त्याची लोकप्रियता कायम असल्याचे दिसून येत आहे. सुमारे २ तास ५१ मिनिटांचा हा चित्रपट त्या काळातील मोठ्या ब्लॉकबस्टर चित्रपटांपैकी एक ठरला होता.

अनिल कपूर आणि माधुरी दीक्षित यांची जोडी प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतली होती. या दोघांच्या केमिस्ट्रीमुळे चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर मोठा गाजावाजा केला. या चित्रपटाचे दिग्दर्शन इंदर कुमार यांनी केले होते. चित्रपटात अरुणा इराणी, अनुपम खेर आणि कुनिका यांच्याही महत्त्वाच्या भूमिका होत्या. या चित्रपटाची कथा प्रामुख्याने एका कुटुंबाभोवती फिरते. ज्यात सावत्र आई आणि मुलगा यांच्यातील नात्याची गुंतागुंत दाखवण्यात आली आहे.

कथेनुसार, अनिल कपूरने साकारलेली राजू ही भूमिका. तो श्रीमंत घरातील मुलगा असतो. त्याच्या आईचे लहानपणीच निधन होते आणि वडील दुसरे लग्न करतात. सावत्र आई (अरुणा इराणी) स्वतःच्या मुलाच्या भविष्यासाठी राजूला जाणीवपूर्वक अशिक्षित ठेवते आणि त्याला शेतीच्या कामात गुंतवून ठेवते. ती आपल्या मुलासाठी उच्च शिक्षणाची सोय करते, तर राजूसाठी अशिक्षित मुलगीच सून म्हणून आणण्याचा विचार करते. मात्र, परिस्थिती बदलते जेव्हा राजूला माधुरी दीक्षितच्या पात्रावर प्रेम होते. पुढे तो तिच्याशी लग्न करून तिला घरी आणतो. यानंतर सावत्र आईला हे मान्य नसल्याने ती त्यांच्या आयुष्यात अडथळे निर्माण करू लागते.

पुढे कथेत अनेक ट्विस्ट आणि वेगवेगळी वळणे येतात, जी प्रेक्षकांना खिळवून ठेवतात. या चित्रपटातील गाणीही प्रचंड गाजली होती आणि आजही ती तितक्याच आवडीने ऐकली जातात. सुमारे ३४ वर्षांनंतरही हा चित्रपट यूट्यूबवर ट्रेंड होत असल्याने त्याची लोकप्रियता अजूनही कायम आहे. 'आयएमडीबी'वर याचित्रपटाला ६. २ रेटिंग मिळाले आहे. बेटा हा चित्रपट ९० च्या दशकातील एक क्लासिक चित्रपट ठरला असून आजही प्रेक्षकांच्या मनात त्याचे विशेष स्थान आहे.

संबंधित सामग्री

 अमित साटम यांच्या आक्षेपानंतर मुंबई महापालिकेने हटवला दिया मिर्झाचा व्हिडीओ; अभिनेत्रीची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाली...

अमित साटम यांच्या आक्षेपानंतर मुंबई महापालिकेने हटवला दिया मिर्झाचा व्हिडीओ; अभिनेत्रीची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाली...

अमित साटम यांच्या आक्षेपानंतर मुंबई महापालिकेने हटवला दिया मिर्झाचा दिवाळी मोहिमेतील व्हिडीओ; अभिनेत्रीची सोशल मीडियावर प्रतिक्रिया.<br/><br/>

Nov 02, 2026
वाढदिवशी शाहरुखची चाहत्यांना खास भेट! ‘किंग’मधील ‘तू मिल जाए’ गाणं रिलीज

वाढदिवशी शाहरुखची चाहत्यांना खास भेट! ‘किंग’मधील ‘तू मिल जाए’ गाणं रिलीज

शाहरुखच्या वाढदिवशी ‘किंग’मधील ‘तू मिल जाए’ गाणं रिलीज! दीपिका पदुकोणसोबतची केमिस्ट्री आणि शर्टलेस लूक चर्चेत.<br/><br/>

Nov 02, 2026
सोनाली बेंद्रेचा कॅन्सरच्या प्रवासाबद्दल मोठा खुलासा; म्हणाली, ‘ज्यामुळे त्रास होतो, त्यावर प्रेम करणं कठीण असतं’

सोनाली बेंद्रेचा कॅन्सरच्या प्रवासाबद्दल मोठा खुलासा; म्हणाली, ‘ज्यामुळे त्रास होतो, त्यावर प्रेम करणं कठीण असतं’

सोनाली बेंद्रेने कॅन्सरच्या प्रवासाबद्दल मनमोकळेपणाने भाष्य केले. माधुरी दीक्षितच्या प्रश्नावर तिने स्वतःच्या शरीराचा स्वीकार करण्यामागचा दृष्टिकोन सांगितला.

Oct 13, 2026
माधुरी दीक्षित ‘कोण होणार करोडपती’च्या मंचावर; शोसाठी होकार देण्यामागचं कारण अखेर सांगितलं

माधुरी दीक्षित ‘कोण होणार करोडपती’च्या मंचावर; शोसाठी होकार देण्यामागचं कारण अखेर सांगितलं

बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री माधुरी दीक्षित आता ‘कोण होणार करोडपती’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Aug 27, 2026
‘गोल्डन मेलोडीज ऑफ बॉलिवूड’ची सुरेल मैफल; रसिक प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

‘गोल्डन मेलोडीज ऑफ बॉलिवूड’ची सुरेल मैफल; रसिक प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Golden Melodies of Bollywood: 'गोल्डन मेलोडीज ऑफ बॉलिवूड' हिंदी चित्रपटांचे सदाबहार गीत संकल्पना असलेल्या आयोजनात रसिक प्रेक्षकांचा उत्साहपूर्ण प्रतिसाद मिळाला.

Aug 13, 2026